How to win in New Year 2024 | 2024 या वर्षात कसे जिंकत राहाल? 8 पद्धती जाणून घ्या

Categories
Breaking News Commerce Education social देश/विदेश लाइफस्टाइल संपादकीय

How to win in New Year 2024 | 2024 या वर्षात कसे जिंकत राहाल? 8 पद्धती जाणून घ्या

How to win in New Year 2024 | उद्यापासून नवीन वर्ष (New Year) सुरु होईल. सरत्या वर्षाला आज निरोप देण्याची वेळ आहे. जुने मागे सारून आपल्याला नेहमी नवीन गोष्टींच्या स्वागतासाठी तयार असावं लागतं. सरत्या वर्षात तुम्ही यश मिळवले असेलच. आता नवीन वर्षात जिंकण्यासाठी तयार राहा. 2024 सालात जिंकण्यासाठी या 8 पायऱ्या जाणून घ्या. (How to win in New Year 2024)
1) सतत शिकत राहा (Embrace Continuous Learning)
 शिकणे कधीही थांबवू नका.  नवीन कौशल्य असो, छंद असो किंवा व्यावसायिक ज्ञान असो, सतत शिकण्याने तुमचे मन तीक्ष्ण राहते आणि नवीन दरवाजे उघडतात.
 २) माइंडफुलनेसचा सराव करा (Practice Mindfulness)
 सजगतेसाठी किंवा ध्यानासाठी दररोज वेळ काढा.  हे तुमचे मन स्वच्छ करण्यास, तणाव कमी करण्यास आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.  अगदी काही मिनिटे देखील मोठा फरक करू शकतात.
 3) स्पष्ट ध्येये सेट करा (Set Clear Goals)
 तुम्हाला काय साध्य करायचे आहे ते परिभाषित करा.  तुमची मोठी उद्दिष्टे छोट्या, आटोपशीर कार्यांमध्ये विभाजित करा.  हे त्यांना अधिक साध्य करण्यायोग्य बनवते आणि तुम्हाला प्रेरित ठेवते.
 ४) नियमित व्यायाम करा (Exercise Regularly)
 तुम्हाला आवडणारी शारीरिक क्रिया शोधा आणि त्यावर चिकटून रहा.  नियमित व्यायामामुळे तुमचा मूड, ऊर्जा पातळी आणि एकूणच आरोग्य वाढते.
 5) सकारात्मक नातेसंबंध जोपासा (Cultivate Positive Relationship)
 स्वतःला अशा लोकांसह वेढून घ्या जे तुम्हाला उत्थान आणि समर्थन देतात.  वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी सकारात्मक संबंध महत्त्वाचे आहेत.
 6) आर्थिक नियोजन (Financial Planning)
 तुमच्या वित्तावर नियंत्रण ठेवा.  सुज्ञपणे बजेट करा, भविष्यासाठी बचत करा आणि तुमच्या वाढीसाठी गुंतवणूक करा.  आर्थिक स्थिरता तुम्हाला स्वातंत्र्य आणि मानसिक शांती देते.
 7) परत द्या/ दान करा (Give Back)
 तुमच्या समुदायासाठी किंवा तुमच्यासाठी महत्त्वाच्या कारणांसाठी योगदान देण्याचे मार्ग शोधा.  परत देणे पूर्णत्व आणते आणि तुम्हाला इतरांशी जोडते.
 “तुम्ही तुमची संपत्ती शुद्ध करून त्यातील काही टक्के दर वर्षी दानधर्मासाठी द्या”
 8) उत्पन्नाचे अनेक स्त्रोत तयार करा (Create Multiple Source of Income)
 तुमच्याकडे ऑनलाइन उत्पन्नाचा स्रोत नाही म्हणजे, तुम्ही तुमच्या भल्यासाठी इंटरनेट वापरत नाही, असा त्याचा अर्थ होतोय.  सामग्री निर्माता, संलग्न विपणन, सल्लामसलत इत्यादीसारखे विविध मार्ग एक्सप्लोर करा. इंटरनेट चा वापर करून पैसे मिळवत राहा.

How to Prevent Diabetes | जर तुम्हाला मधुमेह नसेल तर ते चांगलेच आहे | मात्र भविष्यात तो टाळण्यासाठी ही पावले उचला

Categories
Breaking News Education social आरोग्य देश/विदेश लाइफस्टाइल संपादकीय

How to Prevent Diabetes | जर तुम्हाला मधुमेह नसेल तर ते चांगलेच आहे | मात्र भविष्यात तो टाळण्यासाठी ही पावले उचला

How to Prevent Diabetes | आजकाल तिशी नंतरच्या बऱ्याच लोकांना मधुमेह (Diabetes) हा आजार जडला जातो. त्यासाठी बरीच कारणे आहेत. मधुमेह झाला असेल तर रोखता येऊ शकते. ज्यांना झाला नसेल, ही गोष्ट चांगलीच आहे. मात्र तो टाळला पाहिजे. त्यासाठी काही उपाय आम्ही सुचवत आहोत. त्यावर अंमल करा. मधुमेह तुमच्या जवळ देखील येणार नाही. (How to Prevent Diabetes)
 1) सर्व अल्ट्रा-प्रोसेस्ड जंक फूड बंद करा
 २) साखर कमीत कमी करा
 3) धान्य/बाजरी, गहू कमी करणे सुरू करा आणि क्लास 1 प्रोटीन किंवा संपूर्ण प्रथिने असलेले स्त्रोत वापरा
 4) काही प्रकारचे व्यायाम सुरू करा
 5) व्हिटॅमिन डी, बी12 आणि लोहासाठी प्रयोगशाळेच्या चाचण्या करा.  आवश्यक असल्यास सप्लिमेंट घ्या
 6) इन्सुलिनच्या प्रतिकाराचे मूल्यांकन करण्यासाठी एक चांगली वार्षिक तपासणी करा ज्यामध्ये फास्टिंग इन्सुलिन आणि पीपी इन्सुलिन (नेहमी जड जेवणा नंतर) समाविष्ट आहे.
 7) फॅटी लिव्हर तपासण्यासाठी स्कॅन करा
 8) झोपेला प्राधान्य द्या
 ९) बाहेर खाणे कमी करा
 10) बियाण्यांचे तेल वापरणे बंद.  तूप, लोणी किंवा खोबरेल तेल वापरा
 11) सर्वात चांगली युक्ती म्हणजे धान्य कमी करणे.
 मांस, मासे, अंडी, चिकन, पनीर, दही आणि काही प्रमाणात अधिक डाळी / मसूर खात चला.
If you don’t have diabetes then take some steps to prevent it:
1) Get off all ultra-processed junks
2) Minimize sugars
3) Start lowering grains/millets & replace with class 1  or complete protein sources.
4) Start some form of exercise
5) Get Lab tests for Vitamin D, B12 & Iron. Supplement if needed
6) Get a good annual check-up which includes fasting insulin & PP insulin (after the usual heavy lunch) to assess insulin resistance
7) Get a scan to check for fatty liver
8) Prioritize sleep
9) Minimize eating out
10) Get off seed oils. Use ghee, butter or coconut oil
11. Trick is to lower grains. Add meat fish eggs chicken paneer yogurt and also in some case more pulses / lentils

Special Article | Welcome to Indore : इंदौर हे देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर का आहे?

Categories
Breaking News cultural PMC social देश/विदेश पुणे संपादकीय

Special Article | Welcome to Indore : इंदौर हे देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर का आहे?

 

Indore Municipal Corporation | (Author: Ganesh Mule) | काही शहरं तुम्हांला बघता क्षणी प्रेमात पाडतात. काही शहरांच्या प्रेमात तुम्ही आधीपासूनच असता. मला बघता क्षणी इंदौर शहरानं प्रेमात पाडलं. तर पुण्याच्या प्रेमात मी बऱ्याच वर्षांपासून आहे. मुंबईनं मात्र मला कधी प्रेमात पाडलं नाही. बघता क्षणी तर आधी भीतीच वाटली. एवढं सांगायचं कारण म्हणजे पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने आयोजित अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने नुकतंच इंदौर शहराला भेट दिली. दोन दिवस आणि दोन रात्रीत बऱ्यापैकी शहर फिरून घेतलं. देश के सबसे स्वच्छ शहर (The Cleanest City of India) में आपका स्वागत हैं. असं म्हणून इंदौर शहरात तुमचं प्रत्येक ठिकाणी स्वागत केलं जातं. (PMC | IMC)
शहरात रात्रीच उतरलो. उतरल्याबरोबर नजरेत भरली ती त्या शहराची स्वच्छता. खरं म्हणजे स्वच्छतेबाबत या शहरानं स्वतःची जेवढी branding आणि जाहिरात केलीय, तसंच ते आहे. जाहिरात आणि वास्तवता यात फरक असतो. मात्र इथं तसं काही दिसलं नाही. जशी जाहिरात अगदी तसंच शहर स्वच्छ आहे. रात्र आणि दिवसा देखील तशीच स्वच्छता. रस्ते देखील सुटसुटीत. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला शिवाय डिव्हायडर मध्ये देखील झाडांचं प्रमाण म्हणावं तेवढं चांगलं. त्यामुळे शहरात पाऊल ठेवल्याबरोबर शहरानं स्वच्छतेबाबत भ्रमनिरास केला नाही. रस्ते आणि परिसर तर स्वच्छ होताच. मात्र फ्लेक्स आणि होर्डिंग च्या बाबतीत देखील शहर स्वच्छ दिसलं. जमीन आणि आकाश असं दोन्हीवर देखील शहरानं स्वच्छता टिकवून ठेवलीय. जी इतर शहरात क्वचितच पाहायला मिळते.
मात्र शहराला सकाळी लवकर जाग येत नाही. सकाळी स्वच्छता कर्मचारी किंवा इतर दूध किंवा कामाचे लोकच तेवढे बाहेर दिसतात. दोन दिवसात जाणवलं कि शहर रात्री खूप वेळ जागं असतं. त्यामुळे कदाचित सकाळी जाग यायला उशीर होत असावा. हिंदी भाषिक असणारं हे शहर. सुखवस्तू असल्यासारखं. आहे त्यात समाधान मानण्याची लोकांची वृत्ती दिसून येतीय. फार महत्वाकांक्षा ठेऊन ऊर फुटेस्तोर धावपळ करायची नाही. आपल्या परंपरांना गालबोट लागू द्यायचं नाही. एवढी शांत वृत्ती लोकांची दिसून आली. युवकांमध्ये आक्रमकपणा दिसला पण तो तसा सगळीकडे असायचाच. बायका आणि पुरुष दोघेही दिसण्याबाबत अगदी सुंदर. गोरेगोमटे. देवी अहिल्याबाई आणि मल्हारराव होळकर जी परंपरा सोडून गेले ती अजूनही या लोकांनी जपल्यासारखी वाटते. इथल्या लोकांना आपल्या शहराविषयी प्रचंड अभिमान. त्यात स्वच्छतेच्या बाबतीत तर विचारायलाच नको. नुसता अभिमानच नाही तर लोक स्वच्छता टिकवण्यासाठी हातभार लावत असतात. एकतर लोक स्वतः कचरा करत नाहीत. आणि झाला तरी तात्काळ कचरा उचलण्याचं काम लोक करतात. मग ते दुकानदार असो कि सर्वसामान्य माणूस.  असं चित्र खूपच कमी शहरात दिसतं. असं असलं तरी शहराला महत्वाकांक्षेचे धुमारे फुटण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे शहरात उद्योग आणि आयटी सारख्या गोष्टीना चालना मिळेल आणि इथल्याच लोकांना रोजगार मिळेल.
दुसरी महत्वाची नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे इथल्या व्यवस्थेत राजकीय हस्तक्षेप मात्र खूप कमी दिसतोय. हे सर्वांच्याच बोलण्यातून दिसून येत होतं. आणि वास्तव परिस्थिती देखील तशीच दिसून आली. इंदौर महापालिकेचा आयुक्त हा इथला प्रमुख आहे. म्हणजे पोलिसांपेक्षाही जास्त अधिकार. पोलिसांना कमी आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना इथली लोकं जास्त घाबरतात. ही देखील विरळ अशी गोष्ट आहे. 30 लाख लोकसंख्येचं शहर. जिथे दररोज 850-900 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यासाठी महापालिकेच्या एकूण 20 हजार कर्मचाऱ्यांपैकी 10 हजार कर्मचारी हे घनकचरा विभागाचं काम करतात. घनकचरा विभागानं कचरा प्रक्रियांचे बरेच प्रोजेक्ट हाती घेतले आहेत. विज निर्मिती पासून ते CNG गॅस निर्माण करण्याचं काम कचऱ्यापासून होताना दिसतंय. जेवढा कचरा तयार होतोय त्यापेक्षा जास्त क्षमतेचे प्रकल्प इंदौर महानगरपालिकेकडे आहेत. ही महापालिकेची जमेची बाजू असल्याने महापालिका गेली पाच वर्ष देशात स्वच्छतेचा पहिला क्रमांक पटकावत आलीय. महापालिकेचं काम देखील याबाबतीत खरंच वाखाणण्याजोगं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे इंदौर महापालिकेनं शहरातील लोकांना स्वच्छता राखण्याची सवय लावलीय.
अर्थातच या झाल्या शहराच्या जमेच्या बाजू. काही गोष्टीत मात्र सुधारणेला नक्कीच वाव आहे. कारण शहर स्वच्छ दिसत असलं तरी ओव्हरहेड केबलनं मात्र शहराला विद्रुप करून टाकलंय. याबाबत महापालिकेला Duct करून underground cabling करायला हवंय. वाहतूक देखील फार सुरळीत आहे असं नाही. त्यावर देखील काम होऊ शकतं. तसंच शहरातून दोन नद्या वाहतात. मात्र त्यांचं देखील प्रदूषण दिसून येतं. जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून पाणी शुद्ध करून नदीत सोडलं जातं असं महापालिका सांगत असली तरी त्यावर विश्वास बसत नाही.
असं असलं तरीही पुणे आणि इंदौर या शहरांची तुलना मात्र होऊ शकत नाही. कारण सर्वच बाबतीत ही शहरं वेगळी आहेत. इंदौर छोटं तर पुणे हे 70 लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेलं शहर. पत्रकार म्हणून पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) काम करत असताना लक्षात आलं कि  इंदौर पेक्षा जास्त काम पुणे महापालिका आपल्या शहरात करतीय. कचरा प्रकल्प देखील भरपूर आहेत. मात्र जाहिरात करण्यात पुणे महापालिका मागं पडतीय. होर्डिंग बाबत देखील महापालिकेकडून म्हणाव्या तशा उपाययोजना होत नाहीत. पुण्याकडं जसं देशभरातील लोकांचा ओढा असतो तसा तो इंदौर (Indore Municipal Corporation) कडे नक्कीच नाही. त्यामुळे तुलना हा विषय दोन्ही महापालिकेत येऊच शकत नाही. मात्र इंदौर महापालिकेने जसं पुणे महापालिकेकडून काही गोष्टी शिकून घेतल्या तशा पुणे महापालिकेला देखील बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकता येतील. सर्वात महत्वाचं म्हणजे पुणेकरांनी महापालिकेच्या उपक्रमात सहभागी व्हायला हवीय. त्यांना साथ द्यायला हवीय. तसंच महापालिकेच्या इतर विभागानी देखील घनकचरा विभागाला साथ द्यायला हवीय. असं झालं तर महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्या नेतृत्वात नक्कीच पुणे महापालिका देखील स्वच्छते बाबत देशात पहिला क्रमांक पटकावेल. तशी आशा करायला काही हरकत नाही.
——-

Recruitment News | नगर रचना विभागाच्या शिपाई पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

Recruitment News | नगर रचना विभागाच्या शिपाई पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी

|संकेतस्थळावरुन प्रवेशपत्रे डाऊनलोड करुन घेण्याचे आवाहन

 

Recruitment News | नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील १२५ रिक्त पदे ऑनलाईन परीक्षेद्वारे भरण्यासाठी टीसीएस या संस्थेच्या माध्यमातून २५ नोव्हेंबर रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यातील ५४ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आलेली असून उमेदवारांनी त्यांची प्रवेशपत्रे विभागाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करून घ्यावीत, असे आवाहन नगर रचना विभागाने केले आहे.

शिपाई पदाच्या परीक्षेची उद्घोषणा नगर रचना विभागाने यापूर्वीच त्यांच्या संकेतस्थळावर केली आहे. अर्ज सादर करतेवेळी सहायक पुरविण्याची मागणी केलेल्या दिव्यांग उमेदवारांना विभागातर्फे परीक्षा केंद्रावर सहायक उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

परीक्षेची प्रवेशपत्रे विभागाच्या संकेतस्थळावर उमेदवाराच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात आलेली असून ती प्रवेशपत्रे उमेदवारांनी त्वरित डाऊनलोड करुन सर्व उमेदवारांनी परीक्षेस उपस्थित राहण्याचे आवाहन, नगर रचना पुणे विभागाचे सहसंचालक तथा राज्यस्तरीय निवड समितीचे (गट ड) अध्यक्ष स. म. पवार यांनी केले आहे.

The Karbhari 2nd Anniversary | The karbhari च्या वाचकांना दुसऱ्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Categories
cultural social पुणे संपादकीय

The Karbhari 2nd Anniversary | The karbhari च्या वाचकांना दुसऱ्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपली The Karbhari वृत्तसंस्था आज दोन वर्षाची झाली. आपण आता तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहोत. वाचकांच्या म्हणजे तुमच्या प्रेमाशिवाय ही वाटचाल अशक्य आहे. तुम्ही दाखवलेला विश्वास हाच The karbhari चा आत्मा आहे. आपल्यासाठी ना कुठला सत्ताधारी, ना प्रशासन , ना कुणी उद्योजक, ना राजकारणी, आपला कारभारी. लोक हेच आपले कारभारी. कुठलेही कारभारीपण न मिरवता, आपण सरकारच्या, प्रशासनाच्या कारभारावर लक्ष ठेवतो आहोत. हे केवळ आणि केवळ वाचकांच्या भरवश्यामुळे शक्य झाले आहे.
        शक्य तेवढ्या संतुलित आणि समतोल बातम्या देण्याचा, सकारात्मक बातम्या देण्याचा आपला पहिल्यापासूनच प्रयत्न राहिला आहे. हाच अजेंडा आपण आगामी काळात देखील अबाधित ठेवणार आहोत. वाचकांचे प्रेम आणि त्यांनी दाखवलेला विश्वास हीच The Karbhari ची खरी ताकद आहे. आपण नेहमी सामान्य लोकांच्या बाजूने उभे राहण्याचा प्रयत्न केला. हे करताना आपण कधीही प्रशासन किंवा सत्ताधाऱ्यांवर चुकीच्या पद्धतीने आसूड ओढले नाहीत. आपण नेहमी समतोल (Balance) साधला. याच आपल्या कौशल्यामुळे कितीतरी नवीन लोक आपल्याशी जुडले गेले. आगामी काळात अजून जुडतील.
     प्रत्येक वर्धापनदिन हा त्या संस्थेला काहीतरी शिकवत असतो. नवीन काहीतरी शिकवू पाहत असतो. आपणही प्रामाणिकपणे ते शिकण्याचा प्रयत्न करतो आहोत. गेल्या दोन वर्षात आपण दिलेल्या बातम्यांमुळे आपण थोड्या तरी लोकांना न्याय देऊ शकलो याचा आनंद आहे. आपल्या बातम्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एवढेच नाही तर आपल्या प्रेमापोटी आपले चोखंदळ वाचक शुद्धलेखनातील चुका देखील सांगत असतात. त्यांचे मनापासून आभार. कारण अशा गोष्टीतून शिकतच आपली संस्था बळकट होणार आहे. आता तिसऱ्या वर्षात पदार्पण करताना आपली जबाबदारी अजून वाढली आहे. आपल्या अधिकाराचा वापर करत असताना आपल्याला आपली कर्तव्ये देखील लक्षात ठेऊन काम करायचे आहे. त्यासाठी तुमची साथ महत्वाची आहे. तुमचा विश्वास सार्थ ठरवण्याचा, तुमच्या भरवशाच्या कसोटीवर उतरण्याचा  आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील.
पुनःश्च तुम्हां सर्वांना शुभेच्छा!
——-
संपादक 
The Karbhari 

Bonus deposited | PMC Pune | महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खात्यावर बोनस जमा | बिल क्लार्क, संगणक आणि वित्त व लेखा विभागाची महत्वाची भूमिका

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खात्यावर बोनस जमा | बिल क्लार्क, संगणक आणि वित्त व लेखा विभागाची महत्वाची भूमिका

पुणे|महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार याचे परिपत्रक जारी करण्यात आले होते. मंगळवार पासून महापालिका कर्मचाऱ्याच्या खात्यावर बोनस ची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जशी बिले तयार होतील, तशा पद्धतीने रक्कम देण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. यामध्ये सर्व विभागाचे बिल क्लार्क, संगणक आणि वित्त व लेखा विभागाची महत्वाची भूमिका राहिली आहे. बोनस मिळाल्यामुळे मात्र महापालिका कर्मचारी आनंदी आहेत. तसेच कर्मचारी प्रशासनाचेही आभार वक्त करत आहेत.

महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी बोनस अर्थात सानुग्रह अनुदान आणि बक्षिसी दिली जाते.यंदा सन २०२१-२०२२ च्या मूळ वेतन + महागाई भत्ता यावर ८.३३% + १९,०००/- इतके सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक निघत नव्हते. ‘कारभारी’ वृत्तसंस्थेने या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्यानुसार या प्रस्तावावर महापालिका आयुक्तांची स्वाक्षरी झाल्या नतर तात्काळ वित्त व लेखा विभागाने बोनस बाबतचे परिपत्रक जारी केले.

पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवक (रोजंदारी कामगारांसह) आणि माध्यमिक व तांत्रिक शिक्षण
विभागातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना शिक्षण मंडळाकडील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना तसेच बालवाडी शिक्षण सेविका, शिक्षक, शिक्षण सेवक सन २०२१-२०२२ च्या मुळ वेतन + महागाई भत्ता यावर ८.३३% + विहीत दराने सानुग्रह अनुदान आदा करणेबाबत  मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार  मान्यतेनुसार सदरचे कार्यालय परिपत्रक प्रसृत करण्यात आले होते.

यामध्ये 18 ऑक्टोबर पर्यंत बिले तपासून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सानुग्रह अनुदान वेळेत आदा करणेसाठी पगार बिल ऑडीट विभागाकडील सर्व ऑडिटर सेवकांनी शनिवार व रविवार रोजी कामावर उपस्थित राहून सन २०२१- २०२२ या वर्षाची सानुग्रह अनुदान बिलांची तपासणी करण्यात यावी. असे आदेश वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांनी दिलेहोते. त्यानुसार आता महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यात सुरुवात झाली आहे. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये अनादांचे वातावरण आहे.