Recruitment News | नगर रचना विभागाच्या शिपाई पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

Recruitment News | नगर रचना विभागाच्या शिपाई पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी

|संकेतस्थळावरुन प्रवेशपत्रे डाऊनलोड करुन घेण्याचे आवाहन

 

Recruitment News | नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील १२५ रिक्त पदे ऑनलाईन परीक्षेद्वारे भरण्यासाठी टीसीएस या संस्थेच्या माध्यमातून २५ नोव्हेंबर रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यातील ५४ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आलेली असून उमेदवारांनी त्यांची प्रवेशपत्रे विभागाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करून घ्यावीत, असे आवाहन नगर रचना विभागाने केले आहे.

शिपाई पदाच्या परीक्षेची उद्घोषणा नगर रचना विभागाने यापूर्वीच त्यांच्या संकेतस्थळावर केली आहे. अर्ज सादर करतेवेळी सहायक पुरविण्याची मागणी केलेल्या दिव्यांग उमेदवारांना विभागातर्फे परीक्षा केंद्रावर सहायक उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

परीक्षेची प्रवेशपत्रे विभागाच्या संकेतस्थळावर उमेदवाराच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात आलेली असून ती प्रवेशपत्रे उमेदवारांनी त्वरित डाऊनलोड करुन सर्व उमेदवारांनी परीक्षेस उपस्थित राहण्याचे आवाहन, नगर रचना पुणे विभागाचे सहसंचालक तथा राज्यस्तरीय निवड समितीचे (गट ड) अध्यक्ष स. म. पवार यांनी केले आहे.

PCMC Recruitment | पिंपरी चिंचवड महापालिकेत 386 पदांसाठी भरती 

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

पिंपरी चिंचवड महापालिकेत 386 पदांसाठी भरती

पुणे | पिंपरी चिंचवड महापालिकेत विभिन्न विभागात ३८६ पदासाठी भरती करण्यात येणार आहे. याबाबतची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात  प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ‘ब’ व गट क’ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या विषयाची सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
३८६ पदांकरिता भरावयाच्या पदांची आरक्षणनिहाय संख्या (सामाजिक व समांतर आरक्षण) शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, क्योमयांदा, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पध्दत, अर्ज करण्याची मुदत, इतर आवश्यक अटी व शर्ती, सर्वसाधारण सूचना महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या
संकेतस्थळावरील भरती (Recruitment) या लिंकवर तसेच होमपेजवर आमच्या बद्दल (About) नोकरी विषयक (Recruitment) या मेनूमध्ये दिनांक १९/०८/२०२२ पासून पाहण्यास उपलब्ध होतील. असे जाहिरातीत म्हटले आहे.

या पदांसाठी असेल भरती

अतिरिक्त कायदा सल्लागार – 1
विधी अधिकारी  – 1
उप मुख्य अग्निशमन अधिकारी – 1
विभागीय अग्निशमन अधिकारी – 1
उद्यान अधीक्षक (वृक्ष)  – 1
सहाय्यक उद्यान अधीक्षक – 2
उद्यान निरीक्षक – 4
हॉटीकल्चर सुपरवायझर – 8
कोर्ट लिपिक – 2
अॅनिमल किपर – 2
समाजसेवक – 3
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 41
लिपिक – 213
आरोग्य निरीक्षक – 13
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 75
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 18

Pavitra Portal | पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरु

Categories
Breaking News Education पुणे महाराष्ट्र

पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरु

पुणे | राज्यातील शिक्षक पदांची भरती प्रक्रियेची कार्यवाही पवित्र प्रणालीमार्फत सुरु करण्यात आली आहे. सद्यस्थितीत 196 व्यवस्थापनांतील सुमारे 769 पदांसाठी एसईबीसी आरक्षणाच्या जागा इडब्लूएस/खुल्या प्रवर्गात रुपांतरीत करुन पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी 17 जुलै 2022 पर्यंत आपले प्रमाणपत्र अद्ययावत करावेत, असे शिक्षण उपसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे.

पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक भरतीसाठी 2 सप्टेंबर 2021 रोजी 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2 हजार 62 रिक्त पदांसाठी मुलाखतीसह पर्यायांतर्गत 3 हजार 902 पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. प्रमाणपत्र अद्ययावत केल्यानंतर उमेदवारांकडून उपलब्ध रोस्टर व विषय विचारात घेऊन त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध करुन देण्यात येईल.

एकूण 196 व्यवस्थापनाच्या सुमारे 769 रिक्त पदांसाठी 1:10 या मर्यादेत उमेदवार उपलब्ध करुन दिले जातील. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण असतील. उमेदवारांची अंतिम निवड 30 गुणांच्या आधारे आरक्षण व विषय विचारात घेऊन केली जाईल.