Jayant Patil : आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही!  

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही!

: राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

पुणे : नवाब मलिक (Nawab Malik) यांना तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून (ED) अटक करण्यात आली होती. अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी सुद्धा राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. आता भाजपचे नेते आणि पदाधिकारी मलिकांच्या  राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आम्ही राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्टंच सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने पुणे शहरातील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पाटील म्हणाले, अनिल देशमुख यांच्याबाबत जे घडलं नाही, ते दाखवायचा प्रयत्न भाजपकडून  सुरू आहे. त्यामुळे आम्ही एक राजीनामा घेतला. ते रोज उठून एका मंत्र्यांमागे चौकशी करतील. अशा वेळी आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ असं नाही. आम्ही नवाब मालिकांचा राजीनामा घेणार नाही. आणि किरीट सोमय्या यांच्याबाबत आता तरी न बोललेलं बरं आहे. असंही ते यावेळी म्हणाले.

 महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना माहिती असून औरंगाबाद कोर्टाने देखील निर्णय दिला आहे. त्यामुळे जबाबदार पदावर असलेल्या राज्यपालांसारख्या व्यक्तीने अशा गोष्टी बोलणं टाळायला हवं, अशी वक्तव्ये करणं योग्य नसल्याचं जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान केंद्र सरकारने युक्रेन मधील वाचवण्यास उशीर केला असून त्यांनी मुलांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यावर लक्ष दिलं पाहिजे. दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता अनेक पालक आणि मुलांशी बोलणं सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Video : Congress, NCP women wing : Ukraine Students : युक्रेन मधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या महिलाकडून महामृत्युंजय मंत्राचा जप 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

युक्रेन मधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या महिलाकडून महामृत्युंजय मंत्राचा जप

पुणे : काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी पार्टी च्या महिलांनी खडकी येथील शिवमंदिरात युक्रेन येथे अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटके साठी आणि सुखरूप भारतात परत येण्यासाठी महाशिवरात्री च्या दिवशी महामृत्युंजय मंत्रा च्या जपा चे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी शिवमंदिरात वायुदल, स्थलदल, नौदल चे माजी अधिकारी ही उपस्थित होते, आमच्या समवेत प्रार्थने साठी हे सर्व माजी अधिकारी ही सहभागी झाले होते. यावेळी युक्रेन रूस चे युद्ध थांबून जगात शांतता स्थापित व्हावी, आणि आमचे सर्व भारतीय विद्यार्थी सुखरूप परत यावे म्हणून श्री भोलेनाथ भगवान यांना साकडे घतले.

यावेळी  महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता तिवारी. राष्ट्रवादी च्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे, पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आनंद ,शोभा पांनिकर, आरती साठे, सुनीता नेमुर्, कांता ढोणे, शुभांगी वखारे, सुंदरा ओव्हाळ, चिमटे, ज्योती परदेशी  शोभा अरुदे, संगीता अवळे.लावण्या शिंदे मनिषा सानप .लीना नांगरे, कांशा शिंदे. ह्या सर्व महिला आणि युवती उपस्थित होत्या.

 

Ukraine Students Return : युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी दिल्लीत दाखल

Categories
Breaking News देश/विदेश महाराष्ट्र

युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी दिल्लीत दाखल

: महाराष्ट्रातील 27 विद्यार्थी सुखरूप परतले

नवी दिल्ली : युध्दजन्य युक्रेनदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विशेष विमान आज मध्यरात्री, 3.30 वाजता दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्रातील 27 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. त्यांनतर दुसरेही विमान सकाळी ८ वाजता दाखल झाले.

सद्या युक्रेनमध्ये युध्द सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची ‘ऑपरेश गंगा’ मोहीम भारत सरकारने सुरु केली आहे. याअंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीने पाठविण्यात आलेल्या एयर इंडियाच्या ‘एआय-1942’ या विशेष विमानाने बुखारेस्ट (रोमानिया) येथून 250 विद्यार्थी आज मध्यरात्री दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.देशाच्या विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील 27 विद्यार्थी आहेत.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र सदनाच्यावतीने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहे. तसेच, या कक्षाच्यामाध्यमातून आवश्यक ते मार्गदर्शन व सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. व विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे सुखरुप स्वगृही पोहचविण्यात येत आहे.

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

विशेष विमानाने महाराष्ट्रातील आणखी 19 विद्यार्थी दिल्लीत

दरम्यान, एयर इंडियाचे ‘एआय-1940’ हे दुसरे विशेष विमान बुखारेस्ट (रोमानिया) येथून विद्यार्थ्यांना घेऊन आज रविवारी सकाळी 8.00 वाजता दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील 19 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.