Hadapsar-Wagholi-Manjari Road | हडपसर-मांजरी-वाघोली रस्त्यासाठी सिरम कडून 26 कोटींचा निधी | रस्त्याला विलू पुनावाला यांचे नाव देण्याबाबत सरकारची शिफारस

Categories
Breaking News PMC social पुणे

 हडपसर-मांजरी-वाघोली रस्त्यासाठी सिरम कडून 26 कोटींचा निधी

| रस्त्याला विलू पुनावाला यांचे नाव देण्याबाबत सरकारची शिफारस

पुणे |  पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील हडपसर-मांजरी-वाघोली रस्त्याच्या काँक्रिटीकिरण आणि चौपदरीकरणासाठी सिरम इन्स्टिटयूट ने 26 कोटींचा निधी अदा केला आहे. दरम्यान संस्थेकडून मागणी करण्यात आली होती कि या रस्त्यास विलू पुनावाला यांचे नाव देण्यात यावे. आता हा रस्ता मनपा हद्दीत येतो. त्यामुळे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हे नाव देण्याबाबत शिफारस केली आहे. तसेच हद्दीतील रस्ता देखील हस्तांतरित करून घेण्याबाबत महापालिकेला सांगितले आहे.  त्यानुसार महापालिकेला कार्यवाही करावी लागणार आहे.
  रस्त्याची कि.मी ० /०० ते ० / ७०० ही लांबी या पुर्वीच महानगरपालिकेच्या हददीत समाविष्ट झालेली आहे. सद संपुर्ण मांजरी गाव महानगरपालिका हद्दमध्ये समाविष्ट झाल्याने आता या रस्त्याची कि.मी ५/५०० पर्यंतची लांबी (मुळा-मुठा नदीपर्यंत) महानगरपालिका हद्दीमध्ये येते. सदर रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कि मी ०/७०० ते २/८०० चे चौपदरीकरणाचे काम करण्यात आले आहे. व कि मी २/८०० चे ५/५०० पर्यंत च्या लांबीचे चौपदरीकरणाचे काम PMRDA मार्फत सुरु आहे. कि मी २/८०० मध्ये मौजे. मांजरी येथे रेल्वे गेट येथे सा. बां. विभागामार्फत रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रगतीत आहे व कि मी ५/५०० येथे मुळा -मुठा नदीवर नवीन पुलाचे काम प्रगतीत आहे.
मांजरी गाव महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झाल्याने नागरिकांकडून महानगरपालिका स्तरीय सुविधांची
जसे की Street Light, रस्ते साफसफाई इ. मागणी होते. सा बां विभागाकडे ग्रामीण भागातील रस्ते असल्या कारणामुळे या प्रकारच्या सुविधा सहसा पुरविल्या जात नाहीत.
सदर रस्त्याची कि मी ०/७०० ते ५/५०० ही लांबी महापालिकेने हस्तांतरीत करुन घ्यावी. तसेच सदर रस्त्याच्या कि मी ० / ७०० ते २/८०० या लांबीच्या चौपदरीकरणासाठी व काँक्रीटीकरणासाठी मे सिरम इन्स्टीटयुट यांचे कडून जवळपास २६ कोटी निधी उपलब्ध करण्यात आला होता. या रस्त्यास विलू पुनावाला यांचे नाव देणेबाबत सिरम इंन्स्टिट्युट कडून विनंती करण्यात आली. . मुख्य अभियंता, सा. बां. प्रादेशिक विभाग, पुणे यांचे कडून सदर बाबतचा प्रस्ताव
शासनास सादर करण्यात आला आहे. अदयापपर्यंत शासनाकडून सदर बाबत निर्णय अप्राप्त आहे. सदर रस्त्याच्या विकसनासाठी सिरम इन्स्टीटयुट चे योगदान पाहता सदर रस्त्यास विलू पुनावाला यांचे नाव देण्याची शिफारस करण्यात येत आहे. असे ही पत्रात म्हटले आहे.