Road Testing | PMC Pune | पुणे महानगरपालिकेमार्फत केले जातेय रस्त्याचे परीक्षण!

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

पुणे महानगरपालिकेमार्फत केले जातेय रस्त्याचे परीक्षण!

पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal corporation) पथ विभागामार्फत (Road Department) शहरातील १०९.८ किलोमीटर लांबीचे रस्त्याची कामे फेज -१ तसेच ४२ किलोमीटर लांबीचे रस्त्याची कामे फेज-२ अंतर्गत काढण्यात आली आहेत. या रस्त्याची कामे सुचवताना मनपामार्फत अद्यावत पद्धतीचा तांत्रिक परिक्षणाचा (Technical Testing) वापर केला गेला आहे. यामध्ये प्रामुख्याने FWD ( फॉलिंग वेट डिप्लेक्टोमीटर) या नवीन पद्धतीच्या रस्ते तपासणी यंत्राचा वापर केला आहे. या FWD यंत्राद्वारे डांबरी रस्त्याचे सध्या स्थितीमधील क्षमता तसेच वापरलेल्या थराची क्षमता तपासून त्यावरील नवीन थराची जाडी ठरविण्यात येते. तसेच रस्त्याचे उर्वरित आयुर्मान देखील काही प्रमाणात काढता येते.अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.

याचबरोबर रस्त्याची राईड क्वालिटी तपासणे करिता मनपा मार्फत बंप इंटिग्रेटर या यंत्राचा वापर करून रस्त्याची कामापूर्वीची स्थिती आणि कामानंतरची स्थिती याची सांगड घातली जाणार आहे. IRC चे मानांकनानुसार रस्त्याची राईड कॉलिटी राखण्यात यामुळे शक्य होणार आहे. तसेच काँक्रीट व्हाईट टॉपिंगचे काम करता IRC नुसार बेन्कलमन बीम या यंत्राचा वापर करून रस्त्याची वाहक क्षमता तपासून पुढील ट्रीटमेंट ठरवल्या जाणार आहेत. (PMC Pune)

या तांत्रिक परिक्षणाचे प्रशिक्षण मनपा पथ विभागाच्या अभियंत्यांना देण्यात आले आहे .अशा प्रकारचे प्रशिक्षण मनपा पथ विभागाच्या अभियंत्यांना देऊन रस्त्याचे कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते सुधारण्याचा मनपाचा मानस आहे. असे ही दांडगे यांनी सांगितले. (PMC Pune Road Dept)