Education department | PMC | शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कामगार संघटना करणार निदर्शने

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कामगार संघटना करणार निदर्शने

पुणे | महापालिकेच्या शिक्षण विभागातील  कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. मात्र वारंवार मागणी करूनही या मागण्या पूर्ण होत नाहीत. यामुळे कामगार संघटनेकडून 9 मार्च ला महापालिका भवन येथे निदर्शने करण्यात येणार आहेत.
संघटनेच्या माहितीनुसार आपल्या कायदेशीर हक्काचे रक्षण व शिक्षण विभाग प्राथमिक मधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी, बालवाडी शिक्षिका सेविका, रोजंदारी कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता आता सज्ज होण्याची वेळ आली आहे.
 प्रलंबित प्रश्नाकरीता शिक्षण विभागाचा प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत लेखी, तोंडी तसेच वेळोवेळी बैठका घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी आपण अग्रेसर आहोत. अनेक वेळा निवेदन देऊन, आंदोलने करून देखील शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी तसेच पुणे महानगर पालिका अति.आयुक्त (ज) यांच्याकडून आपल्या प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने गुरुवार  ९ मार्च २०२३ रोजी पुणे महानगरपालिकेसमोर दुपारी ३ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.