Education department | शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा | माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांची मागणी

Categories
Breaking News Education PMC पुणे

शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा

| माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांची मागणी

पुणे | नुकत्याच पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या. लवकरच इतर कर्मचाऱ्यांच्या पण बदल्या करण्यात येणार आहेत  महानगरपालिकेत वर्ग एक ते तीन मधील अधिकाऱ्यांच्या दर तीन वर्षांनी बदल्या कराव्या असा नियम आहे. तोच नियम शिक्षण  विभागात पण लावण्यात यावा आणि बदल्या करण्यात याव्यात. अशी मागणी माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
खर्डेकर यांच्या निवेदनानुसार पुणे मनपाच्या शिक्षण विभाग कार्यालयात वर्षानुवर्षे तेच ते अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. अनेक वर्षापासून एकाच विभागात काम करत असल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्यात सुद्धा उद्दामपणा आला आहे. तेथे छोट्या छोट्या कामांसाठी सुद्धा नागरिकांना खूप खेटे घालावे लागतात. कर्मचारी जागेवर नसतात. शिक्षकांची कामे, तसेच रिटायर झालेल्या शिक्षकांची पेन्शनची कामे , नागरिकांची कामे सुद्धा वेळेवर होत नाही त्यांना कार्यालयात खूप चकरा माराव्या लागतात.  पूर्वी शिक्षण मंडळ स्वतंत्र होते; परंतु दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेत शिक्षण मंडळ विलीन होऊन इतर समित्यांप्रमाणे  शिक्षण समिती झाली आहे. मात्र अद्यापही तेथील कर्मचाऱ्यांच्या  बदल्या केलेल्या नाहीयेत.
खर्डेकर यांनी पुढे म्हटले आहे कि मी शिक्षण समिती अध्यक्ष असताना अनेक नगरसेवक,   नागरिक, रिटायर शिक्षक माझ्याकडे कर्मचाऱ्यांविषयी तक्रारी घेऊन येत असत.  येथील कर्मचाऱ्यांचे बदल्या करा म्हणून मागणी करत असत. त्यानुसार आम्ही शिक्षण समितीने ठराव करून येथील कर्मचाऱ्यांच्या इतर मनपा च्या विभागाप्रमाणे वेगवेगळ्या खात्यात बदल्या करण्यात याव्या. असा ठराव देखील केला होता; मात्र अद्याप बदल्या झालेल्या नाहीत.
 महापालिका आयुक्त यांच्याकडे  मागणी आहे की शिक्षण विभागातील किमान ८०% कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतर खात्यात बदल्या करण्यात याव्यात. जेणेकरून तेथील अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपून नागरिकांची कामे वेळेवर होतील.
मंजुश्री संदीप खर्डेकर, माजी शिक्षण समिती अध्यक्ष

शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचा मार्ग मोकळा | समयोजन प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजूरी

Categories
Breaking News Education PMC पुणे

शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचा मार्ग मोकळा

| समयोजन प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजूरी

| जवळपास 450 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन

पुणे | राज्य सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त केले. सरकारच्या आदेशानुसार मंडळ हा एक महापालिकेचा विभाग करण्याचे ठरले. असे असले तरी महापालिकेत या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. वेतन श्रेणी पासून पदोन्नती पर्यंतच्या या अडचणी आहेत. दरम्यान महापालिका सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण विभागाच्या जवळपास 450 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा प्रस्ताव आयुक्त यांच्या समोर ठेवला होता. आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार आता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतील कुठल्याही विभागात होतील. शिवाय त्यांना पदोन्नती देखील मिळणार आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (PMC Education Department)
पुणे महानगरपालिकासेवा प्रवेश नियमावली २०१४ नुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे शिडी प्रमाणे त्यांना संधी मिळणार आहे. आज मितीस माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील ळांतील शिक्षकेतर सेवकांच्या बदल्या/बढत्या या पुणे महानगरपालिका आस्थापनेवर करण्यात येत नाही. तसेच त्या शिक्षकेतर सेवकांची सेवाज्येष्ठता ही स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे. पुणे मनपाकडील अन्य विभाग जसे मुख्यलेखापरीक्षण विभाग ,नगरसचिव कार्यालय,मुद्रणालय विभाग या कार्यालयाकडील सर्व संवर्गाच्या सेवकांच्या देखील सेवाजेष्ठता याद्या व रोस्टर स्वतंत्र ठेवण्यात आलेले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडील (तत्कालीन शिक्षण मंडळाकडील) सेवकांच्या सेवाज्येष्ठता यादी एकत्रित केल्यास पुणे महानगरपालिकेच्या मुळ संवर्गातील सेवकांच्या सेवाज्येष्ठतेवर परिणाम होऊन त्यास मूळ संवर्गातील सेवकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. तसेच सदर शिक्षकेतर सेवकांच्या सेवाजेष्ठता पुणे महानगरपालिका आस्थापनेत विलिन करावयाच्या झाल्यास मनपा आस्थापनेवरील मंजूर पद संख्येत बदल करावे लागतील . मनपा आस्थापनेवरील मंजूर पदांवर प्राथमिक शिक्षण विभागातील शिपाई, रखवालदार पदावरील रोजंदारी कर्मचारी सामावून घेण्याची मागणी देखील करण्याची शक्यता होती. या सर्व गोष्टी विचारात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने समायोजनाचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त यांच्या माध्यमातून महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवला होता. या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी नुकतीच मंजूरी दिली आहे. (Pune Municipal Corporation)
वर्ग 4 मधील जास्त कर्मचारी 
प्रस्तावानुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडील (तत्कालीन शिक्षण मंडळाकडील) स्वीय सहा. लघुलेखक (वर्ग-३), कनिष्ठ अभियंता (वर्ग-३), प्रशासन अधिकारी (वर्ग-२), अधिक्षक (वर्ग-३), उपअधिक्षक (वर्ग-३), वरिष्ठ लिपिक (वर्ग-३), लिपिक टंकलेखक (वर्ग- ३), शिपाई (वर्ग-४), रखवालदार (वर्ग-४), बिगारी (वर्ग-४) व माळी (वर्ग-४) या पदावरील शिक्षकेतर पदावरील सेवकांच्या सेवाजेष्ठ्ता पुणे मनपाव्या आस्थापनेवरील सेवकांमध्ये सेवाज्येष्ठता यादीमध्ये समाविष्ट करणे, पुणे मनपाकडील मंजूर पदे आणि प्राथमिक शिक्षण विभागाकडील मंजूर पदे, कार्यरत पदे एकत्रित करून एकच रोस्टर तयार करणे आणि सदर सेवकांच्या बदल्या मनपाच्या इतर खात्यामध्ये करणेबाबत समितीने एकमताने निर्णय घेतलेला आहे.  प्राथमिक शिक्षण विभागाकडील समावेशन करावयाचे पदावरील कर्मचारी पद निहाय संख्या जवळपास 450 आहे. यामध्ये वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांची संख्या 200 हून अधिक आहे.
आयुक्तांनी प्रस्तावाला मंजूरी दिल्याने आता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतील कुठल्याही विभागात होतील. शिवाय त्यांना पदोन्नती देखील मिळणार आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर येणाऱ्या हरकतींचा निपटारा करून बदल्या केल्या जातील.  अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे मात्र शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा गेल्या बऱ्याच वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Non teaching staff | Agitation | मनपा शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा शिक्षण विभागातील  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

पुणे महानगरपालिकेतील शिक्षण विभागाच्या चतुर्थ श्रेणी कामगार, बालवाडी शिक्षिका सेविका, रोजंदारी कर्मचारी यांच्या अनेक समस्या पालिकेच्या निदर्शनास आणून देखील सोडवल्या जात नाहीत. पगारातील वेतन वाढ असेल, दिवाळीचा बोनस जाहीर होऊन अजून देखील अनेक बालवाडी शिक्षिका- सेविकांना तो मिळालेला नाही. वारंवार पुणे महानगर पालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) च्या वतीने अधिकाऱ्यांसमोर प्रश्न मांडून देखील त्यांची सोडवणूक होत नसल्याने आज पुणे महानगर पालिकेच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.

शिक्षेतर कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचा हप्ता तात्काळ मिळावा, कर्मचाऱ्यांचे वेतन १५ तारखेनंतर करण्यात येते, तरी तो ५ तारखे पर्यंत करण्यात यावा. बालवाडी शिक्षिका व सेविकांना वेतनपावती देण्यात यावी, कोणत्याही खाजगी संस्थांचा बालवाडीमधील हस्तक्षेप थांबवा, तसेच बालवाडी शिक्षिका व सेविका यांना पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय अंशदायी सहायय योजनेचे लाभ मिळावेत, शिपाई व रखवालदार यांना पदोन्नती देण्यात यावी या मागण्यांकरिता आज आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये युनियन अध्यक्ष कॉ. उदय भट, जॉईंट सेक्रेटरी रोहिणी जाधव, जॉईंट सेक्रेटरी मधुकर नरसिंगे, झोन अध्यक्ष अजित मेंगे, सचिव ओंकार काळे, प्रकाश हुरकुडली, उपाध्यक्ष शोभा बनसोडे, भरत ठोंबरे, प्रकाश चव्हाण, दिलीप कांबळे, सिदार्थ प्रभुणे व बालवाडी शिक्षिका- सेविका व चतुर्थ श्रेणी कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Education department | PMC | शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कामगार संघटना करणार निदर्शने

Categories
Breaking News PMC पुणे

शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कामगार संघटना करणार निदर्शने

पुणे | महापालिकेच्या शिक्षण विभागातील  कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. मात्र वारंवार मागणी करूनही या मागण्या पूर्ण होत नाहीत. यामुळे कामगार संघटनेकडून 9 मार्च ला महापालिका भवन येथे निदर्शने करण्यात येणार आहेत.
संघटनेच्या माहितीनुसार आपल्या कायदेशीर हक्काचे रक्षण व शिक्षण विभाग प्राथमिक मधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी, बालवाडी शिक्षिका सेविका, रोजंदारी कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता आता सज्ज होण्याची वेळ आली आहे.
 प्रलंबित प्रश्नाकरीता शिक्षण विभागाचा प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत लेखी, तोंडी तसेच वेळोवेळी बैठका घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी आपण अग्रेसर आहोत. अनेक वेळा निवेदन देऊन, आंदोलने करून देखील शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी तसेच पुणे महानगर पालिका अति.आयुक्त (ज) यांच्याकडून आपल्या प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने गुरुवार  ९ मार्च २०२३ रोजी पुणे महानगरपालिकेसमोर दुपारी ३ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.

7th Pay Commission | शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा पहिला हफ्ता मिळता मिळेना!

Categories
Breaking News Education PMC पुणे

शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा पहिला हफ्ता मिळता मिळेना!

पुणे | शिक्षण मंडळ बरखास्त करून शिक्षण विभाग हा पुणे महापालिकेचा भाग झाला खरा, मात्र अजून तरी ते कागदावरच आहे. महापालिका कर्मचाऱ्या प्रमाणे शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना अजून लाभ मिळणे सुरु झाले नाही. कारण महापालिका कर्मचाऱ्यांना आता येत्या काही दिवसात सातव्या वेतन आयोग फरकातील दुसरा हफ्ता मिळेल. मात्र शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना अजून पहिला हफ्ता देखील मिळालेला नाही. शिक्षण विभागाच्या प्रमुखांकडून याचा पाठपुरावा अपेक्षित आहे. मात्र तो ही होताना दिसत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्य सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त करून शिक्षण विभाग हा महापालिकेचा एक विभाग करा, असे म्हटले होते. मात्र त्यावर अजूनही अंमल झालेला दिसत नाही. त्यामुळे विभागातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती देखील रखडली आहे. दरम्यान सातव्या वेतन आयोगातील फरकाचा पहिला हफ्ता देखील या कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. शिक्षण विभागाचे प्राथमिक आणि माध्यमिक चे शिक्षक आणि शिक्षकेतर असे एकूण 4800 च्या आसपास कर्मचारी आहेत. यामध्ये शिक्षकांची संख्या जास्त आहे. वेतन आयोग लागू होताना देखील शिक्षकांना लवकर लागू झाला. मात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बरीच वाट पाहावी लागली. जानेवारी 2022 पासून आयोग लागू झाला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना 6 वर्षांचा फरक मिळणे अपेक्षित आहे. तो समान पाच हफ्त्यात मिळणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना 5 वर्षाचे 5 हफ्ते आहेत. त्यातील पहिला हफ्ता मिळाला आहे. मात्र शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना पहिला हफ्ता अजून मिळालेला नाही.
यामध्ये बिल क्लार्क ची कमी असणे, संगणक आणि सांख्यिकी विभागाकडून प्रतिसाद मिळत नाही. अशा कारणाने विलंब होत आहे. तसेच शिक्षण विभागाच्या प्रमुखांकडून देखील याबाबत पाठपुरावा होत नाही. शिवाय कर्मचारी संघटना देखील याबाबत पुढे येताना दिसत नाहीत. यामुळे कर्मचारी मात्र चांगलेच निराश झाले आहेत.