Audit : कोविड काळात ६७ (३) क अंतर्गत केलेल्या कामाचे होणार ऑडिट! 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

कोविड काळात ६७ (३) क अंतर्गत केलेल्या कामाचे होणार ऑडिट

: महापालिका प्रशासनाने सर्व खात्याकडून मागवली माहिती

पुणे : मार्च २०१९ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ६७ (३) क अंतर्गत कोव्हीड निर्मुलन संदर्भात खर्ची पडलेल्या टेंडर, बिलांची लेखापरीक्षणासाठी यादी उपलब्ध करून देण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने सर्व खाती आणि क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. या कामावरून आणि त्याच्या बिलावरून नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने तेव्हा कुठला निर्णय घेतला नव्हता. मात्र आता या सगळ्या बिलांचे ऑडिट होणार आहे.

: तातडीची बाब म्हणून कामे करून घेण्यात आली

कोव्हीड संसर्गाच्या कालावधीत कोव्हीड -१९ प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी मनपा प्रशासनाच्या विविध खात्यांमार्फत / विभागांमार्फत / परीमंडळ व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ६७ (३) क मधील तरतुदीस अनुसरून विविध स्वरूपाची कामे करून घेण्यात आली आहेत. कोव्हीड -१९ नियंत्रणासाठी माहे मार्च २०१९ ते माहे ऑक्टोबर २०२१ या कालावधीत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ६७ (३) क मधील तरतुदीस अनुसरून करण्यात आलेल्या कामांच्या यादीची मागणी लेखापरीक्षणासाठी मुख्य लेखापरीक्षक यांनी पत्रान्वये केली आहे. तरी माहे मार्च २०१९ ते माहे ऑक्टोबर २०२१ या कालावधीत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ६७ (३) क मधील तरतुदीस अनुसरून कोव्हीड -१९ चे
नियंत्रणासाठी आपले खात्यामार्फत / विभागामार्फत केलेल्या विविध कामांच्या खर्ची पडलेल्या बिलांची संपूर्ण तपशिलासह यादी मा.मुख्य लेखापरीक्षक कार्यालयास उपलब्ध करून द्यावी व त्याची एक प्रत या लेखा व वित्त विभागाकडे पाठविणेस सांगण्यात आले आहे.

Leave a Reply