Working procedure of special committees : विशेष समित्यांच्या कामकाजाची कार्यपद्धती आयुक्तच ठरवणार!

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

विशेष समित्यांच्या कामकाजाची कार्यपद्धती आयुक्तच ठरवणार

 : खाते प्रमुखांना नगरसचिव यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश

पुणे : महापालिकेचा कार्यकाल १४ मार्च ला संपुष्टात आला आहे. सरकारने आता महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. दरम्यान महापालिका अधिनियमानुसार विषय समित्यांच्या बैठका आयोजित करणे अनिवार्य आहे. या बैठका आता प्रशासनच घेणार आहे. याबाबत प्रभारी  नगरसचिव शिवाजी दौंडकर यांनी निर्देश जारी केले आहेत. मात्र या विशेष समित्यांच्या बैठका कशा चालवाव्यात याबाबतची कार्यपद्धती निश्चित नाही. ही कार्यपद्धती महापालिका आयुक्तच ठरवणार आहेत. अशी माहिती दौंडकर यांनी दिली.

:  काय आहेत प्रभारी नगरसचिव यांचे आदेश?

दिनांक १४ मार्च २०२२ रोजी पुणे महानगरपालिकेचा कार्यकाल संपुष्ठात आला असून महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांची प्रशासक म्हणून शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. नगरसचिव कार्यालयामार्फत मा.मुख्य सभा, मा.स्थायी समिती व मा.विशेष समित्या यांच्या सभांचे आयोजन, कार्यपत्रिका व ठराव तयार करणे, इतिवृत्त घेणे इत्यादी कामकाज करण्यात येते. सद्यस्थितीत महानगरपालिका व विविध समित्यांचा कार्यकाल संपुष्टात आला असल्याने सर्व खातेप्रमुख यांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.

१. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण २ मधील नियम १ अन्वये मा.मुख्य सभा ही २० तारखेच्या आंत भरविण्यात आली पाहिजे व नियम ३ (अ) अन्वये स्थायी समिती ही आठवड्यातून एकदा भरविण्यात यावी, अशी तरतुद विहित करण्यात आली आहे.
२. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३० अन्वये स्थापित विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला बालकल्याण समिती, क्रीडा समिती, शिक्षण समिती व नाव समिती यांच्या पाक्षिक सभा आयोजित करण्यात येतात.
३. उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या सर्व समित्यांकडे प्रचलित कार्यपध्दतीनुसार विविध प्रस्ताव (विषयपत्र) नगरसचिव कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात यावेत.
४. नगरसचिव कार्यालयामार्फत या प्रस्तावावर मा.महापालिका आयुक्त तथा प्रशासक, पुणे महानगरपालिका यांचे आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

Leave a Reply