PMC | शालेय पोषण आहार देण्याची संधी महिला बचत गटांना मिळणार का?  | महापालिका मागवणार expression of interest 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

 शालेय पोषण आहार देण्याची संधी महिला बचत गटांना मिळणार का?

: महापालिका मागवणार expression of interest

पुणे | 13 ऑगस्ट पासून पासून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मनपा, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत तयार आहाराचा पुरवठा करणेसाठी स्वारस्याची अभिव्यक्ती प्रकियेव्दारे संस्थांची निवड
करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका expression of interest मागवणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान आता तरी यात महिला बचत गटांना संधी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे आदेशान्वये, अति.महापालिका आयुक्त (वि), पुणे महानगरपालिका यांचे अध्यक्षतेखाली 14/06/2022 रोजी शालेय पोषण आहार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये शासनाचे दि. 13 मे 2022 रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनूसार महानगरपालिका क्षेत्रातील शालये पोषण आहार योजनेस पात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणेकरीता केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांची निवड करणेसाठी स्वारस्याची अभिव्यक्ती (Expression of Interest) प्रक्रिया राबविणेस मान्यता देणेत आली आहे.
त्यानुसार दि. 23 जून 2022 रोजी वर्तमानपत्रामध्ये सविस्तर जाहिरात प्रसिध्द करणेत येणार असून,अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. 12/07/2022 पर्यंत आहे. यासाठी आवश्यक ती सर्व माहिती (अटी-शर्ती, कागदपत्रे, निवडीचे निकष, पात्रता इ.) mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तरी जास्तीत जास्त बचतगट / स्वयंसेवी संस्था / अशासकीय संस्था यांनी सदर प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका यांचेकडून करण्यात येत आहे.