2000 Rupees Note | RBI | पुणे राष्ट्रवादी च्या वतीने RBI कार्यालयाच्या बाहेर २००० च्या नोटांना श्रद्धांजली 

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश पुणे
Spread the love

2000 Rupees Note | RBI | पुणे राष्ट्रवादी च्या वतीने RBI कार्यालयाच्या बाहेर २००० च्या नोटांना श्रद्धांजली

2000 Rupees Note | RBI | १९ मे २०२३ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) ने अचानकपणे माहितीपत्रक जारी करत दोन हजार रुपयांच्या नोटा (2000 Rupees Note) चलनातून कमी करत असल्याचे सांगितले. आणि पुन्हा एकदा संपूर्ण भारतीय नागरिकांकरिता दुसरी नोटबंदी जाहीर करत नोटा बदलून घेण्याच्या त्रासदायक कार्याचा प्रारंभ करण्यात आला. असा आरोप करत आणि याच्या विरोधात पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP Pune Agitation) च्या वतीने पुण्यात RBI च्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. (RBI  on 2000 Rupees Note)

“मुळात मोदी सरकारने (Modi Government) ८ नोव्हेंबर २०१६ रोजी काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटबंदी करुन पाचशे व हजार रूपयांच्या नोटा बंद केल्या होत्या, मात्र त्याचवेळी पहिल्यांदाच दोन हजार रूपयांची नोट चलनात आणली व आज जवळजवळ सहा वर्षांनंतर ती नोटही चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला व ही नोट देशाच्या अर्थव्यवस्थेकरीता किती पोषक आहे हे भाजपचे समर्थक गेली अनेक वर्षे घसा फोडून सांगत आहेत, मात्र आज त्या सर्वांना मोदींनी तोंडावर पाडले आहे. कुठलीही माहिती न घेता केवळ प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने देशातील अर्थव्यवस्थेमध्ये जाणीवपूर्वक असे बदल मोदी सरकारने केले आहेत. आजवर नोटबंदीचा काय फायदा झाला हे कुठल्याही स्तरावर केंद्र सरकारला सिद्ध करता आलेले नाही, असे असताना पुन्हा ही दुसरी नोटबंदी जाहीर झाल्याने पहिल्या नोटबंदीचे फायदे सांगणाऱ्या मोदी भक्तांना शोकअनावर झाला आहे. भक्तांच्या ह्या दुःखात सहभागी होण्याकरीता आज ह्या नोटेचा श्रध्दांजली कार्यक्रम करण्यात आल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City president Prashant Jagtap) यांनी सांगितले.

या वेळी
“परत द्या परत द्या , नोटेतील चिप परत द्या “
“चांगभल चांगभल नोटबंदीच्या नावाने चांगभल “
“यु टर्न सरकार… मोदी सरकार “
“नोटबंदी कशाला कसबा कर्नाटच्या बदला ध्यायला “
अश्या प्रकारच्या घोषणा  देण्यात आल्या (NCP Pune agitation)

या शोकसभेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख , बाळासाहेब बोडके , अजिंक्य पालकर , मूणालीनी वाणी , सुषमा सातपुते , महेश हंडे , शालिनी जगताप , कुलदिप शर्मा , शुभम माताळे व इतर प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


News Title |2000 Rupees Note | RBI | Tribute to 2000 notes outside RBI office on behalf of Pune NCP