Supriya Sule News Update | Chandrakant Patil | सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांची दिलगिरी 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र
Spread the love

सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांची दिलगिरी

: राज्य महिला आयोगाकडे व्यक्त केली दिलगिरी

पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्यामुळे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटलांना राज्यभरातून टीकेचा सामना करावा लागला. शिवाय राज्य महिला आयोगाने देखील पाटील यांच्याकडून खुलासा मागवला होता. यावर आता चंद्रकांत पाटलांनी आयोगाला आपला खुलासा सादर करत दिलगीरी व्यक्त केली आहे.

: महिला आयोगाला चंद्रकांत पाटील यांनी दिलेला खुलासा

आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap, सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे
लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही.
 माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो.

Leave a Reply