Dhayari Narhe Road | धायरी, नऱ्हे परिसरातील तीन मुख्य रस्त्यांचा होणार विकास! 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Dhayari Narhe Road | धायरी, नऱ्हे परिसरातील तीन मुख्य रस्त्यांचा होणार विकास!

| 30 जुलै पर्यंत रस्त्यांचे काम पूर्ण होणार

Dhayari Narhe Road | पुणे | धायरी आणि नऱ्हे परिसरातील तीन मुख्य रस्त्यांचा विकास महापालिका पथ विभागाकडून केला जाणार आहे. त्याचे नियोजन तयार असून 30 जुलै पर्यंत हे काम पूर्ण होईल. अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी दिली. (Pune Municipal Corporation Latest News)
धायरी आणि नऱ्हे परिसरात रस्त्यांचा विकास झालेला नाही. त्यामुळे या उपनगरांमध्ये वाहतूक कोंडी आढळून येते. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या परिसरातील रस्ते विकसित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये 3 रस्त्यांचा समावेश आहे.
* अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या माहितीनुसार धायरेश्वर मंदिर ते राम मंदिर रस्ता विकसित केला जाणार आहे. अस्तित्वात हा रस्ता 8 मीटर रुंदीचा आहे. तो 15 मीटरचा केला जाणार आहे. याची लांबी ही 700 मीटर आहे.
* दुसरा रस्ता हा लोकमत कार्यालय ते सावित्री गार्डन रस्ता हा असणार आहे. 30 मीटर रुंदीचा हा डीपी रस्ता केला जाणार आहे. याची लांबी सुमारे 1200 मीटर आहे. हा रस्ता करण्यासाठी मुख्य कॅनॉल आणि बेबी कॅनॉल पुलाचे देखील काम करावे लागणार आहे.
* तिसरा विकसित होणारा रस्ता हा भूमकर चौक नऱ्हे ते पारी कंपनी धायरी या दरम्यान चा असेल. हा रस्ता धायरी ते नऱ्हे ते आंबेगाव चा वाहतुकीचा मुख्य रस्ता आहे. 1 किमी लांबीचा हा रस्ता असून हा रस्ता 18 मीटर रुंद केला जाणार आहे. सद्यस्थितीत हा 8-9 मीटरचा रस्ता आहे. हा काँक्रीटचा रस्ता करण्यात आला होता. आता त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे याचा विकास केला जाणार आहे.