Property tax | मिळकतकराच्या बिलांचे वाटप १ एप्रिल ऐवजी १ मे पासून | प्रथम सहामाहीच्या शास्तीचा कालावधी 1 महिना वाढणार

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

मिळकतकराच्या बिलांचे वाटप १ एप्रिल ऐवजी १ मे पासून

| प्रथम सहामाहीच्या शास्तीचा कालावधी 1 महिना वाढणार 

महापालिकेने (PMC Pune) आर्थिक  वर्ष (२०२३-२४) मिळकतकराच्या बिलांचे वाटप १ एप्रिल ऐवजी १ मे पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ४० टक्के सवलत काढण्यात आल्यानंतर आकारणी झालेल्या मिळकतींची बिले भरण्यासही ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे एप्रिल महिन्यात या थकबाकीदारांवर कुठल्याही दंडाची आकारणी केली जाणार नाही. ही रक्कम मे महिन्यापासून आकारली जाईल. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
– महापालिकेकडून हे निर्णय घेण्यात आले

१. पुणे महानगरपालिका हद्दीतील कर आकारणी व कर संकलन विभागाच्या दप्तरी नोंद असलेल्या मिळकतीना प्रतिवर्षी ०१ एप्रिल पासून देण्यात येणारे मागणी देयकांची मुदत एक महिना वाढवण्यात येणार.
२. प्रतिवर्षी दि. ०१ एप्रिल पासून ते ३१ मे पर्यंत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १९४० – अ अन्वये सर्वसाधारण करात देण्यात येणारी ५% किंवा १०% सवलतीचा कालावधी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे देयक दिल्यानंतर त्यापुढील दोन महिने वाढवणार.
३. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कराधान नियम प्रकरण ८ मधील कलम ४१ नुसार पहिल्या सहामाही कराची रक्कम बिल दिल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत न भरल्यास
प्रथम सहामाहीस दरमहा २% शास्ती आकारण्यात येते, वर नमूद केलेल्या वस्तुस्थितीमुळे प्रथम सहामाहीस आकारावयाच्या २% शास्तीचा कालावधी एक महिना वाढवण्यात येणार.