Durability Certificate | महापालिका कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दिले जाणार स्थायित्व प्रमाणपत्र | कालबद्ध पदोन्नती आणि इतर गोष्टीसाठी होणार फायदा

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

महापालिका कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दिले जाणार स्थायित्व प्रमाणपत्र

| कालबद्ध पदोन्नती आणि इतर गोष्टीसाठी होणार फायदा

पुणे | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आतापर्यंत स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेत महापालिका आयुक्तांनी हे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व खात्याना याबाबतची माहिती संकलित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. (PMC Pune Employees)
मंजूर पदावर हंगामी/अस्थायी नियुक्ती केली कि तीन वर्षांनी सर्व अटींची पूर्तता झाली की परिविक्षाधीन कालावधी समाधान कारक असल्याचा अहवाल खात्याकडून आल्यावर त्या कर्मचाऱ्याला स्थायी सेवेतील कायम नियुक्तीचे पत्र द्यायचे असते. पदोन्नतीच्या पदावर पण हा नियम लागू आहे. आत्ता पर्यंत कोणत्याही सेवकांना हे दिलेलं नाही. (Durability certificate)
पण खाती दोन वर्षे सेवा झाल्यावर अहवाल सादर करत नाहीत.  त्यामुळे आता सेवेत असलेले वर्ग 1ते4 मधील सर्व 100% अधिकारी कर्मचारी स्थायी प्रमाणपत्रांचे अभावी अस्थायी/हंगामी सेवेतच  आहेत असे समजले जाते. (Pune Municipal Corporation)
दरम्यान पदोन्नती व 10/20/30 वर्षांच्या सुधारीत अश्वासित प्रगती योजना लाभासाठी स्थायी सेवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.  वित्त संस्था गृहकर्ज व इतर कर्ज मंजूर करताना स्थायीत्व प्रमाणपत्रांची मागणी करत असतात. त्यामुळे या प्रमाणपत्राचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे. दरम्यान खाते प्रमुखांना याबाबतची कार्यवाही 31 डिसेंबर पूर्वी करावी लागणार असून आधी अतिरिक्त आयुक्तांची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यानंतर आयुक्ताकडे प्रस्ताव पाठवला जाईल. (PMC Pune)