Big Breaking News : मोठी बातमी : गणेश  बिडकर  यांचे  सभागृह  नेते  पद  रद्द!

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

गणेश  बिडकर  यांचे  सभागृह  नेते  पद  रद्द

: पुण्यात भाजपाला मोठा धक्का 

पुणे : भाजपने स्विकृत नगरसेवक गणेश बीडकर (Ganesh Bidkar)  यांना देण्यात आलेले सभागृहनेते पद (House leader) उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे महापालिकेची मुदत अवघ्या दोन आठवड्यात संपणार असताना हा भाजपला( BJP)  मोठा धक्का बसला आहे.

गणेश बीडकर यांची महापालिकेच्या सभागृहनेते पदी निवड केल्याने याविरोधात काँग्रेसचे पुरस्कृत अपक्ष नगरसेवक रविंद्र धंगेकर ((Corporator Ravindra Dhangekar)  यांनी उच्च न्यायालयात मार्च २०२१ मध्ये याचिका दाखल केली होती. या न्यायमूर्ती ए.ए. सय्यद व एस. जी. दिघे यांच्या खंडपिठाने सप्टेंबर महिन्यात सुमारे २० तास याचिकवेर सुनावणी घेतली. तेव्हापासून याचा निर्णय प्रलंबित होता. त्यानंतर आज यावर सुनावणी झाली, अशी माहिती धंगेकर यांचे वकील कपील राठोड यांनी दिली.
स्विकृत नगरसेवकास सभागृहनेतेपद देता येत नाही, त्यामुळे बीडकर यांचे पद रद्द करावी आणि त्यांच्या काळात झालेले सर्व निर्णयही रद्द करावेत अशी मागणी केली होती. सुनावणीनंतर पद रद्द केल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. याची आॅर्डर दोन दिवसानंतर निघणार आहे, त्यानंतर बीडकर यांना यावर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी १० दिवसांची मुदत असेल, असे राठोड यांनी सांगितले. दरम्यान न्यायालयाची निकालाची प्रत आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करू असे बिडकर यांनी सांगितले.

Leave a Reply