Ganesh Utsav Meeting | PMC Pune | पुणे महापालिकेची गणेश मंडळासोबत 28 ऑगस्ट ला संयुक्त बैठक

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Ganesh Utsav Meeting | PMC Pune | पुणे महापालिकेची गणेश मंडळासोबत 28 ऑगस्ट ला संयुक्त बैठक

Ganesh Utsav Meeting | PMC Pune |  यावर्षीचा पुणे शहरातील गणेशोत्सव (Pune Ganesh Utsav) 19 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. त्यानुषंगाने नियोजनाकरिता शहरातील गणेशोत्सव मंडळे (Ganesh Mandal), पोलीस विभाग (Pune Police) यांची संयुक्त बैठक 28 ऑगस्ट  रोजी पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) आयोजित केली आहे. (Ganesh Utsav Meeting | PMC Pune)

पुणे शहरात मागील वर्षी अंदाजे २३०० गणेशोत्सव मंडळानी पुणे महानगरपालिकेकडून मंडप उभारणीकरिता परवानग्या घेतल्या होत्या. मागील वर्षापासून पुढील ५ वर्षाच्या कालावधीकरिता सन २०१९ चे सालामध्ये देण्यात आलेल्या उत्सव मंडप, स्वागत कमानी व रनिंग मंडप इत्यादी परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. शहरातील गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीच्या परवानग्या व उत्सव कमान व रनिंग मंडप (पोलीस विभागाचे परवानगीनुसार) या पुणे मनपाकडून मोफत दिल्याजात आहेत. असे महापालिकेकडून सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation News)
महापालिका प्रशासनानुसार शहरातील या पूर्वीच्या गणेशोत्सव मंडळांच्या परवानग्या पुढील ५ वर्षाकरिता ग्राह्य धरण्यात येणार असल्याने परवानगी करिता एक खिडकी योजना राबविण्याची आवश्यकता नाही. परंतु त्याबाबत गणेशोत्सव मंडळांच्या संयुक्त बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. पुणे शहराच्या नवीन हद्दीत अथवा जुन्या शहरात नव्याने परवानगी घेणाऱ्या मंडळांना संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून आवश्यक परवानग्या दिल्या जातील. (Pune News)

शहरात गणेश मूर्ती विक्री करणेकरिता मनपा मोकळ्या जागा, तसेच वाहतुकीला अडथळा न ठरणाऱ्या रस्ते पदपथावरील काही जागा व्यावसायिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ध्वनी प्रदुषणाबाबत शासनाने ठरवून दिलेल्या सूचना/बंधने यांचे पालन करणे सर्व गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक राहणार असून त्यावर पोलीस विभागाचे नियंत्रण राहील.  महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देणेची कार्यवाही शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार जिल्हाधिकारी यांचे
स्तरावर पुणे शहरात केली जाईल. (Ganesh Utsav Meeting)
गणेशोत्सव कालावधीत शहरातील स्थानिक रहिवाशी/नागरिकांना विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे तक्रारी करणेकरिता सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून पुणे मनपातर्फे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अशा तक्रारींचे निवारण करणेची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. गणेशोत्सव कालावधीत ध्वनीप्रदूषण, पर्यावरण नियंत्रण तसेच इतर बाबींविषयी शासनाकडून यापूर्वी आलेले आदेश/सूचना व यानंतर वेळोवेळी येणाऱ्या आदेशांचे गणेश मंडळांना पालन करणेबाबत सूचना दिल्या जातील. असे ही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
——-
News Title | Ganesh Utsav Meeting | PMC Pune | Joint meeting of Pune Municipal Corporation with Ganesh Mandal on 28th August