PMC Pune | Recruitment | कशी झाली पुणे महापालिका भरती प्रक्रिया? | जाणून घ्या सविस्तर!

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

कशी झाली पुणे महापालिका भरती प्रक्रिया? | जाणून घ्या सविस्तर!

| पारदर्शी कारभारामुळे सामान्य प्रशासन विभागाच्या कामाचे कौतुक

पुणे | पुणे महापालिकेकडून (PMC Pune) विविध रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया (Recruitment) राबवण्यात आली होती. सर्व पदासाठी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधी अधिकारी तसेच कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाचा समावेश आहे. सर्व उमेदवारांच्या नेमणुका देखील करण्यात आल्या आहेत. दरम्यान या अगोदर घेण्यात आलेल्या महापालीलेच्या सर्वच परीक्षेत काही ना काही अडचणी आल्या होत्या. मात्र ही प्रक्रिया कसल्याही अडथळा शिवाय पार पडली. शिवाय पारदर्शी कारभार केल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे कौतुक केले जात आहे.  (Pune Municipal corporation Recruitment)

पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट २ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने
भरणेसाठी जाहिरात क्र.१/३९८ दि. २०/०७/२०२२ अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. सदर
जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील होती. सदर जाहिरातीत रिक्त
पदांचा तपशिल पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव, वेतनश्रेणी, वयोमर्यादा परीक्षा शुल्क,
ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इ. तपशील नमुद केला होता. (PMC Pune)

सदर जाहिरातीत वर्ग २ मधील ४ पदे व वर्ग ३ मधील ४४८ पदाकरिता इच्छुक उमेदवारांकडुन
दि.२०/७/२०२२ पासुन ते दि. १०/८/२०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले.
• पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपुर, मुंबई, नवी मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या
शहरात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेण्यात आली.

• पुणे मनपाच्या एकुण ४४८ पदांकरिता एकुण प्राप्त अर्ज ८७०३६ त्यापैकी परिक्षेला उपस्थित उमेदवार
६७,३५९ इतके होते. (Pune municipal corporation)

• कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

एकुण ५ पदांसाठी २१३९ अर्ज प्राप्त झाले. सदर पदाची परिक्षा दि. २६/०९/२०२२ एका केंद्रावर आयोजित करण्यात आली. त्यासाठी पुणे मनपाच्या २४ निरिक्षकांची नेमणुक केली होती. सदर परीक्षा केंद्रावर एकुण २१३९ प्राप्त अर्ज उमेदवारांपैकी १४७९ उमेदवार उपस्थित होते. सदर पदासाठी १४७९ उमेदवारांचा परिक्षा निकाल दि. ०७/१०/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आला. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) या पदासाठी निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. निवड यादीतील ५ उमेदवारांना दि. ११/१०/२०२२ रोजी आज्ञापत्रक पारित करण्यात आले. सदर पदांसाठी १० उमेदवारांचा प्रतिक्षा यादीत समावेश करण्यात आलेला आहे.

• कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन)

एकुण ४ पदांसाठी १२५ अर्ज प्राप्त झाले. सदर पदाची परिक्षा दि. २६/०९/२०२२ एका केंद्रावर एका सत्रात आयोजित करण्यात आली. त्यासाठी एका निरिक्षकाची  नेमणुक केली होती. सदर परीक्षा केंद्रावर एकुण १२५ प्राप्त अर्ज उमेदवारांपैकी ९७ उमेदवार उपस्थित होते. सदर पदासाठी ९७ उमेदवारांचा परिक्षा निकाल दि. ०७/१०/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आला. कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. निवड यादीतील ४ उमेदवारांना दि. ११/१०/२०२२ रोजी आज्ञापत्रक पारित करण्यात आले. सदर पदासाठी ६ उमेदवारांचा प्रतिक्षा यादीत समावेश करण्यात आलेला आहे.

• सहाय्यक विधी अधिकारी

एकुण ४ पदांसाठी ६८० अर्ज प्राप्त झाले. सदर पदाची परिक्षा दि.०४/१०/२०२२ एका केंद्रावर एका सत्रात आयोजित करण्यात आली. त्यासाठी ७ निरिक्षकांची नेमणुक केली होती. सदर परीक्षा केंद्रांवर एकुण ६८० प्राप्त अर्ज उमेदवारांपैकी ४९९ उमेदवार उपस्थित होते. सदर पदासाठी ४९९ उमेदवारांचा परिक्षा निकाल दि. १८/१०/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आला. सहाय्यक विधी अधिकारी या पदासाठी निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. निवड यादीतील ४ उमेदवारांना दि. ११/१०/२०२२ रोजी आज्ञापत्रक पारित करण्यात आले. सदर पदासाठी ७ उमेदवारांचा प्रतिक्षा यादीत समावेश करण्यात आलेला आहे.

• कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

एकुण १३५ पदांसाठी १७२७३ अर्ज प्राप्त झाले. सदर पदाची परिक्षा दि.०३/१०/२०२२ रोजी १५ शहरातील ७३ केंद्रांवर एका सत्रात आयोजित करण्यात आली. त्यासाठी पुणे मनपाचे १५२ निरिक्षकांची नेमणुक केली होती. सदर पदासाठी १२७०२ उमेदवारांचा परिक्षा निकाल दि. १७/१०/२०२२ रोजी पुणे मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. निवड यादीतील १३५ उमेदवारांना दि. ३०/१२/२०२२ रोजी आज्ञापत्रक पारित करण्यात आले. सदर पदासाठी १३६ उमेदवारांचा प्रतिक्षा यादीत समावेश करण्यात आलेला आहे.

• सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक

एकुण १०० पदांसाठी ३१६३ अर्ज प्राप्त झाले. सदर पदाची परिक्षा दि.०४/१०/२०२२ एका शहरात ९ केंद्रांवर एका सत्रात आयोजित करण्यात आली. त्यासाठी पुणे मनपाचे ३६ निरिक्षकांची नेमणुक केली होती. सदर पदासाठी २४९१ उमेदवारांचा परिक्षा निकाल

दि. ३१/१०/२०२२ रोजी पुणे मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला. सहाय्यक अतिक्रमण
निरिक्षक या पदासाठी निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. निवड यादीतील ९७
उमेदवारांना दि.०४/०१/२०२३ रोजी आज्ञापत्रक पारित करण्यात आले. तसेच सदर पदासाठी ३
जागांसाठी (अनुसूचित जमाती २ जागा व विमुक्त जाती (अ) १ जागा) उमेदवार उपलब्ध झालेले
नाहीत. उर्वरित पदासाठी ४२ उमेदवारांचा प्रतिक्षा यादीत समावेश करण्यात आलेला आहे.
• लिपिक टंकलेखक एकुण २०० पदांसाठी ६३६५६ अर्ज प्राप्त झाले. सदर पदाची परिक्षा
दि. १०/१०/२०२२, दि. १२/१०/२०२२ आणि दि. १३/१०/२०२२ तीन दिवस १० शहरात ३८
केंद्रावर ६ सत्रात आयोजित करण्यात आली. त्यासाठी पुणे मनपाचे १८० निरिक्षकांची नेमणुक केली
होती. सदर पदासाठी ५००९६ उमेदवारांचा परिक्षा निकाल दि. १२/११/२०२२ रोजी पुणे मनपाच्या
संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला. लिपिक टंकलेखक या पदासाठी निवड यादी व प्रतिक्षा यादी
तयार करण्यात आली. निवड यादीतील २०० उमेदवारांना दि.०४/०१/२०२३ रोजी आज्ञापत्रक
पारित करण्यात आले. सदर पदासाठी ४१९ उमेदवारांचा प्रतिक्षा यादीत समावेश करण्यात आलेला
आहे.
● प्रत्येक पदनिहाय निकाल संकेतस्थळावर प्रसिध्द केलेनंतर पुणे महानगरपालिकेकडुन संभाव्य
पात्र/प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता वेळापत्रकानुसार बोलविण्यात आले.
उमेदवारांकडुन प्राप्त झालेल्या शैक्षणिक, अनुभव कागदपत्रांची आणि ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या
कागदपत्रांची छाननी करणेकरिता पुणे महानगरपालिकेतील विविध कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी वर्गाची नेमणुक करणेत आली.
● उपरोक्त सर्व पदांसाठी परीक्षा निकाल प्रसिध्द केलेनंतर पुणे महानगरपालिकेत मा. कर्मचारी निवड
समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत पदनिहाय उपलब्ध पदे व पद संख्या, रिक्त जागांचे
प्रवर्गनिहाय सामाजिक / समांतर आरक्षण याबाबत माहिती देण्यात येऊन प्रत्येक पदाचा निकाल,
उमेदवाराच्या कागदपत्रे पडताळणीचा नोंदी, आरक्षण, अंशकालीन / भुकंपग्रस्त / खेळाडु / माजी
सैनिक / महिला / दिव्यांग / अनाथ याबाबतची प्रमाणपत्रे यांची पडताळणी समितीने केली.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाकरिता कागदपत्रांच्या तपासणीकरिता बोलविण्यात आलेल्या
उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करताना दि. २१/१०/२०२२ रोजीच्या जाहीर प्रकटनामध्ये
अनुभवाबाबत नमूद केलेल्या कागदपत्रांपैकी उचित तर्कसंगत कागदपत्रे सादर केलेली आहेत त्यांची
शहानिशा करून त्या उमेदवारांचे नावापुढे पात्र/अपात्र करणेस शिफारस बाबत तपासणी पथकाचे
अभिप्राय विचारात घेणेत आले आहेत. त्याचप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेल्या अनुभव विषयक
प्रमाणपत्रांची ईमेलद्वारे पडताळणी करणेत आली.

कागदपत्रे छाननीकरिता बोलावलेल्या तसेच काही उमेदवारांच्या पात्रतेबद्दल काही अर्जदारांकडून प्राप्त
झालेल्या तक्रारीचे अनुषंगाने उचित तपासणी करून पडताळणी पथकाने निर्णय घेतले आहेत.
त्यादृष्टीने पथकाने कागदपत्रांची पडताळणी केली असून, त्यांनी पूर्ण तपासणीअंती शिफारसी केलेल्या
आहेत.
• तपासणी पथक निवड समिती यांनी उमेदवाराने सादर केलेल्या कागदपत्रांची सर्वतोपरी खातरजमा
करून पडताळणी करणेत आली आहे. तसेच सर्व तर्कसंगत शक्यतांचा व त्यांचे व्यवहारिकतेचा परामर्श
घेऊन उमेदवाराचे अनुभवविषयी सिद्धतेचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार उमेदवाराने दिलेल्या
दस्तऐवजाचे आधारे अनुभव ग्राह्य धरणेचा अथवा नाकारणेचा निर्णय घेणेत आला आहे. तपासणी
पथकाचे अभिप्राय अंतिम करून मा.कर्मचारी निवड समितीने सदर शिफारशीनुसार निवड व प्रतिक्षा
यादी तयार केलेली आहे.
• नियुक्तीपूर्वी याबाबत संबंधित उमेदवारांकडून अनुभव दाखला व इतर दाखल कागदपत्रांच्या वैधता व
सत्यतेबाबत प्रतिज्ञापत्र घ्यावे व त्या प्रतिज्ञापत्रात उमेदवाराने सादर केलेल्या कागदपत्राच्या सत्यतेची
जबाबदारी त्यांचेवर ठेऊन कोणतीही कागदपत्रे खोटी आढळल्यास त्याचेवर फौजदारी स्वरुपाची
कारवाई होणेस ते पात्र असतील तसेच त्यांना नोकरीवरून कमी करून ते इतरत्र नोकरीस पात्र
असणार नाहीत अशी अट आज्ञापत्रकात टाकण्यात आली आहे.
उपरोक्त सर्व पदांसाठी उमेदवारांची अपात्रतेची प्रमुख कारणे वैध कागदपत्रे नसणे, अपूर्ण कागदपत्रे,
विहीत शैक्षणिक अर्हता नाही, तीन वर्षाचा अनुभव सिध्द न होणे, आरक्षण प्रवर्गानुसार प्रकल्पग्रस्त,
खेळाडू, अंशकालीन सक्षम दाखला नसणे इत्यादि आहेत.