Pune Mahanagarpalika Bharti | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात 89 पदांसाठी भरती!

Categories
Breaking News Education PMC social पुणे

Pune Mahanagarpalika Bharti | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात 89 पदांसाठी भरती!

Pune Mahanagarpalika Bharti | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात (PMC Pune Health Department) 89 पदांसाठी भरती (PMC Pune Recruitment) करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून अनुभवी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून महापालिकेच्या संकेतस्थळावर (PMC Website) सर्व माहिती देण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Pune Mahanagarpalika Bharti)

पुणे महापालिकेच्या आरोग्य कार्यालयाअंतर्गत ६ महिने कालावधीकरिता एकवट वेतनावर करार पद्धतीने सेवा घ्यावयाची असल्याने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation recruitment)

या पदांसाठी होणार आहे भरती

1. वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) (वर्ग-२)
2. आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी (वर्ग-२)
3. फार्मासिस्ट (वर्ग-३)
4. व्यवस्थापक (स्टुअर्ड) (वर्ग-३)
5. सहाय्यक ( दवाखाना) (विविध काम करणारे सेवक) (वर्ग-३)

वरील नमूद केलेल्या पदांची शैक्षणिक अर्हता, अनुभव व सदर पदभरतीसाठी आवश्यक त्या अटी व
शर्ती पुणे महानगरपालिकेच्या pmc.gov.in या संकेतस्थळावर भरती (recruitment ) मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. (Pune Mahanagarpalika health department Bharti)

किती असणार वेतन?

1. वैद्यकीय अधिकारी  (वर्ग-२) – 60,000
2.  आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी (वर्ग-२) – 40,000
3. फार्मासिस्ट (वर्ग-३) – 23,000
4. व्यवस्थापक (स्टुअर्ड) (वर्ग-३) – 25,000
5. सहाय्यक  (वर्ग-३) – 21,100
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व अनुभवधारक उमेदवारांना अर्ज महापालिकेत उपस्थित राहून जमा करायचे आहेत.   वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) (वर्ग-२) आणि आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी (वर्ग-२) यांनी १५/०६/२०२३ रोजी सकाळी १० ते २ दुपारी ३ ते ६ या वेळेत तर   फार्मासिस्ट (वर्ग-३) व व्यवस्थापक (स्टुअर्ड) (वर्ग-३) यांनी १६/०६/२०२३ रोजी सकाळी १० ते २ दुपारी ३ ते ६ व सहाय्यक ( दवाखाना) (विविध काम करणारे सेवक) (वर्ग-३) यांनी १९/०६/२०२३ रोजी सकाळी १० ते २ दुपारी ३ ते ६ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे- ४११००५ येथे विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सह उपस्थित राहायचे आहे. (PMC Recruitment News)
उमेदवाराने सादर करावयाचा विहित नमुन्यातील अर्ज पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी सदरचा अर्ज www.pmc.gov.in या वेबसाईट वरून डाउनलोड करून भरून आणावे व कार्यालयात फॉर्म जमा करावे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation News)
—-
News Title | Pune Mahanagarpalika Bharti |  Recruitment for 89 posts in Health Department of Pune Municipal Corporation!

PMC Recruitment | पुणे महापालिका पद भरती | अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ | उमेदवार 13 एप्रिल पर्यंत करू शकतात अर्ज

Categories
Breaking News Education PMC social पुणे

पुणे महापालिका पद भरती |  अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ

| उमेदवार 13 एप्रिल पर्यंत करू शकतात अर्ज

| पुणे महापालिकेत एकूण 320 पदांसाठी भरतीकरण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  इच्छुक उमेदवाराना 28 मार्च पर्यंत अर्ज करण्यासाठी कालावधी देण्यात आला होता. दरम्यान या प्रक्रियेला खूप अल्प प्रतिसाद मिळाला आहे. कारण एवढ्या कालावधीत महापालिकेकडे फक्त 4 हजाराच्या आसपास अर्ज आले. महापालिकेला जेवढा प्रतिसाद अपेक्षित होता तेवढा तो मिळताना दिसला नाही. त्यामुळे अर्ज वाढण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवार 13 एप्रिल पर्यंत अर्ज करू शकतात. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
याअगोदर महापालिकेने 448 पदांची भरती केली होती. हा दुसरा टप्पा आहे.  पुणे महानगरपालिका पद भरतीची जाहिरात  6/3/2023 अन्वये देण्यात आली असून उमेदवारांना अर्ज सादर करणेकरिता 28/3/2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि सदर जाहिरातीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज सादर करणेकरिता 13/4/2023 अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे. शासनाचे प्रचलित आदेश, वेळोवेळी केलेल्या सुधारणा या पद भरतीस नियमाप्रमाणे लागु राहतील. असे महापालिकेने म्हटले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात आली आहे. वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग-२ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 13/04/2023 पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी
https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर  online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments या
लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहेत.

PMC Pune Recruitment | पुणे महापालिकेत 320 पदांसाठी भरती! | 8 ते 28 मार्च पर्यंत करू शकता अर्ज

Categories
Breaking News Education PMC social पुणे महाराष्ट्र

पुणे महापालिकेत 320 पदांसाठी भरती!

|  8 ते 28 मार्च पर्यंत करू शकता अर्ज

| सरळसेवा पद्धतीने होणार भरती

पुणे | पुणे महापालिकेत एकूण 320 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २ आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  इच्छुक उमेदवार यासाठी 8 मार्च ते 28 मार्च पर्यंत अर्ज करू शकतात. याअगोदर महापालिकेने 448 पदांची भरती केली होती. हा दुसरा टप्पा आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरात क्र. १/१३६२ नुसार वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग-२ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०८/०३/२०२३ पासुन ते दिनांक २८/०३/२०२३ पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी
https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर दिनांक २८/०३/२०२३ रोजीचे२३:५९ वाजे पर्यंत online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा
शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments या
लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहेत.
| ही आहेत पदे

१) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) (८ पदे)
२) वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी (२० पदे)
३) उप संचालक (प्राणी संग्रहालय) (१ पद)
४) पशु वैदयकीय अधिकारी (२ पदे)
५) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक (२०
पदे)
६) कनिष्ठ अभियंता (विद्युत) (१० पदे)
७) आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर (४० पदे)
८) वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर (३ पदे)
९) औषध निर्माता (१५ पदे)
१०) पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (१ पद),
११) अग्निशामक विमोचक / फायरमन (२०० पदे)

राज्य सरकारच्या नियमानुसार गट ब आणि क मधील पदांसाठी ( फायरमन/ अग्निशमन विमोचन पदा व्यतिरिक्त) परीक्षेसाठी सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. तर अभियांत्रिकी विषयाशी संबंधित प्रश्न पदवी/पदविका परीक्षेच्या दर्जासमान राहतील. प्रति प्रश्न 2. गुण प्रमाणे १०० प्रश्नांचे एकूण २०० गुणांकरिता होणाऱ्या परीक्षेसाठी एकत्रितपणे १२० मिनिटांचा कालावधी अनुज्ञेय राहील. भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे गुणांकन तक्ता तयार करण्यात आला असून. प्रश्नपत्रिकेची संख्या – एक (प्रत्येक पदासाठी) एकूण गुण -२०० असणार आहे. तसेच नियम २ (५)(३) नुसार अग्निशमन-विमोचन / फायरमन या पदाकरिता परिक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुध्दीमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. ६० प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरुपाचे असून प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील. (एकुण गुण १२०) परीक्षेसाठी एकत्रितपणे ७५ मिनिटांचा कालावधी अनुज्ञेय राहील. तसेच ८० गुणांची व्यावसायिक चाचणी (शारीरिक पडताळणी) असेल, याबाबत स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करणेत येईल.

शासनाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब
(अराजपत्रित) गट-क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया TCS-ION (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व IBPS (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनींमार्फत राबविणेबाबत सूचित केले आहे. शासन निर्णय  नुसार शासनाने TCS-ION (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व IBPS (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबविताना प्रति उमेदवार आकारावयाचे परीक्षा शुल्क निश्चित केले आहे. तथापि, पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील टप्पा क्र. १ मधील रिक्त ४४८ पदे भरणेची संपूर्ण प्रक्रिया IBPS संस्थेमार्फत राबविण्यात आली होती. सदर भरती प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील
टप्पा क्र. २ मधील रिक्त ३२० पदे IBPS संस्थेमार्फत भरणे उचित ठरेल. सदर पदभरती प्रक्रीयेच्या अनुषंगाने खुला प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी र.रु. १०००/- व मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी र.रु. ९००/- परीक्षेचे प्रवेशशुल्क निश्चित करण्यात आले आहे. सदरचे प्रवेशशुल्क हे ऑनलाईन स्वीकारण्यात येणार असून, बँक ऑफ महाराष्ट्र, पी.एम.सी शाखा, (१४३०), शिवाजीनगर, पुणे येथील खाते क्रमांक ६००३९६३६६४७ वर जमा करण्यात येणार आहे.
ही आहे वेबसाईट

PMC Pune Recruitment | पोटनिवडणूक संपल्यानंतर पुणे महापालिकेच्या भरतीची जाहिरात!  | जवळपास 300 विविध पदांसाठी होणार भरती 

Categories
Breaking News Education PMC social पुणे

पोटनिवडणूक संपल्यानंतर पुणे महापालिकेच्या भरतीची जाहिरात!

| जवळपास 300 विविध पदांसाठी होणार भरती

पुणे | होतकरू आणि गरजू युवकांना पुणे महापालिकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. महापालिकेत दुसऱ्या टप्प्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. कसबा पेठ पोटनिवडणूक संपल्यानंतर जवळपास 300 पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. (PMC pune Recruitment)
पुणे महापालिकेकडून पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. जवळपास 448 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये सहायक विधी अधिकारी, सहायक अतिक्रमण निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, लिपिक अशा विविध पदांचा समावेश होता. विशेष म्हणजे खूप पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया घेण्यात आली आणि उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या देखील देण्यात आल्या. यामुळे पुणे महापालिका प्रशासनाचे कौतुक देखील होत आहे. यामुळे महापालिकेवरील विश्वास देखील वाढला आहे. (Pune Municipal corproation)
दरम्यान महापालिकेत अजूनही काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यावर बोजा येत आहे. म्हणून महापालिका प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया राबवण्याचे मनावर घेतले आणि त्यानुसार काम सुरु केले. या टप्प्यात जवळपास 300 पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये अग्निशमन विभागातील जास्त जागा आहेत. कारण सरकारने या विभागात भरती करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यानुसार जवळपास 200 फायरमॅन ची भरती करण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य विभाग आणि इतर विभागात देखील उमेदवार घेण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून याबाबतचे रोस्टर तपासून त्याची राज्य सरकार कडून देखील मंजुरी घेतली आहे. फक्त याची जाहिरात प्रसिद्ध होणे बाकी आहे. पोटनिवडणूक संपल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.   (PMC Recruitment)

PMC Pune | Recruitment | कशी झाली पुणे महापालिका भरती प्रक्रिया? | जाणून घ्या सविस्तर!

Categories
Breaking News PMC पुणे

कशी झाली पुणे महापालिका भरती प्रक्रिया? | जाणून घ्या सविस्तर!

| पारदर्शी कारभारामुळे सामान्य प्रशासन विभागाच्या कामाचे कौतुक

पुणे | पुणे महापालिकेकडून (PMC Pune) विविध रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया (Recruitment) राबवण्यात आली होती. सर्व पदासाठी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधी अधिकारी तसेच कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाचा समावेश आहे. सर्व उमेदवारांच्या नेमणुका देखील करण्यात आल्या आहेत. दरम्यान या अगोदर घेण्यात आलेल्या महापालीलेच्या सर्वच परीक्षेत काही ना काही अडचणी आल्या होत्या. मात्र ही प्रक्रिया कसल्याही अडथळा शिवाय पार पडली. शिवाय पारदर्शी कारभार केल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे कौतुक केले जात आहे.  (Pune Municipal corporation Recruitment)

पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट २ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने
भरणेसाठी जाहिरात क्र.१/३९८ दि. २०/०७/२०२२ अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. सदर
जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील होती. सदर जाहिरातीत रिक्त
पदांचा तपशिल पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव, वेतनश्रेणी, वयोमर्यादा परीक्षा शुल्क,
ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इ. तपशील नमुद केला होता. (PMC Pune)

सदर जाहिरातीत वर्ग २ मधील ४ पदे व वर्ग ३ मधील ४४८ पदाकरिता इच्छुक उमेदवारांकडुन
दि.२०/७/२०२२ पासुन ते दि. १०/८/२०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले.
• पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपुर, मुंबई, नवी मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या
शहरात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेण्यात आली.

• पुणे मनपाच्या एकुण ४४८ पदांकरिता एकुण प्राप्त अर्ज ८७०३६ त्यापैकी परिक्षेला उपस्थित उमेदवार
६७,३५९ इतके होते. (Pune municipal corporation)

• कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

एकुण ५ पदांसाठी २१३९ अर्ज प्राप्त झाले. सदर पदाची परिक्षा दि. २६/०९/२०२२ एका केंद्रावर आयोजित करण्यात आली. त्यासाठी पुणे मनपाच्या २४ निरिक्षकांची नेमणुक केली होती. सदर परीक्षा केंद्रावर एकुण २१३९ प्राप्त अर्ज उमेदवारांपैकी १४७९ उमेदवार उपस्थित होते. सदर पदासाठी १४७९ उमेदवारांचा परिक्षा निकाल दि. ०७/१०/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आला. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) या पदासाठी निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. निवड यादीतील ५ उमेदवारांना दि. ११/१०/२०२२ रोजी आज्ञापत्रक पारित करण्यात आले. सदर पदांसाठी १० उमेदवारांचा प्रतिक्षा यादीत समावेश करण्यात आलेला आहे.

• कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन)

एकुण ४ पदांसाठी १२५ अर्ज प्राप्त झाले. सदर पदाची परिक्षा दि. २६/०९/२०२२ एका केंद्रावर एका सत्रात आयोजित करण्यात आली. त्यासाठी एका निरिक्षकाची  नेमणुक केली होती. सदर परीक्षा केंद्रावर एकुण १२५ प्राप्त अर्ज उमेदवारांपैकी ९७ उमेदवार उपस्थित होते. सदर पदासाठी ९७ उमेदवारांचा परिक्षा निकाल दि. ०७/१०/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आला. कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. निवड यादीतील ४ उमेदवारांना दि. ११/१०/२०२२ रोजी आज्ञापत्रक पारित करण्यात आले. सदर पदासाठी ६ उमेदवारांचा प्रतिक्षा यादीत समावेश करण्यात आलेला आहे.

• सहाय्यक विधी अधिकारी

एकुण ४ पदांसाठी ६८० अर्ज प्राप्त झाले. सदर पदाची परिक्षा दि.०४/१०/२०२२ एका केंद्रावर एका सत्रात आयोजित करण्यात आली. त्यासाठी ७ निरिक्षकांची नेमणुक केली होती. सदर परीक्षा केंद्रांवर एकुण ६८० प्राप्त अर्ज उमेदवारांपैकी ४९९ उमेदवार उपस्थित होते. सदर पदासाठी ४९९ उमेदवारांचा परिक्षा निकाल दि. १८/१०/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आला. सहाय्यक विधी अधिकारी या पदासाठी निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. निवड यादीतील ४ उमेदवारांना दि. ११/१०/२०२२ रोजी आज्ञापत्रक पारित करण्यात आले. सदर पदासाठी ७ उमेदवारांचा प्रतिक्षा यादीत समावेश करण्यात आलेला आहे.

• कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

एकुण १३५ पदांसाठी १७२७३ अर्ज प्राप्त झाले. सदर पदाची परिक्षा दि.०३/१०/२०२२ रोजी १५ शहरातील ७३ केंद्रांवर एका सत्रात आयोजित करण्यात आली. त्यासाठी पुणे मनपाचे १५२ निरिक्षकांची नेमणुक केली होती. सदर पदासाठी १२७०२ उमेदवारांचा परिक्षा निकाल दि. १७/१०/२०२२ रोजी पुणे मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. निवड यादीतील १३५ उमेदवारांना दि. ३०/१२/२०२२ रोजी आज्ञापत्रक पारित करण्यात आले. सदर पदासाठी १३६ उमेदवारांचा प्रतिक्षा यादीत समावेश करण्यात आलेला आहे.

• सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक

एकुण १०० पदांसाठी ३१६३ अर्ज प्राप्त झाले. सदर पदाची परिक्षा दि.०४/१०/२०२२ एका शहरात ९ केंद्रांवर एका सत्रात आयोजित करण्यात आली. त्यासाठी पुणे मनपाचे ३६ निरिक्षकांची नेमणुक केली होती. सदर पदासाठी २४९१ उमेदवारांचा परिक्षा निकाल

दि. ३१/१०/२०२२ रोजी पुणे मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला. सहाय्यक अतिक्रमण
निरिक्षक या पदासाठी निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. निवड यादीतील ९७
उमेदवारांना दि.०४/०१/२०२३ रोजी आज्ञापत्रक पारित करण्यात आले. तसेच सदर पदासाठी ३
जागांसाठी (अनुसूचित जमाती २ जागा व विमुक्त जाती (अ) १ जागा) उमेदवार उपलब्ध झालेले
नाहीत. उर्वरित पदासाठी ४२ उमेदवारांचा प्रतिक्षा यादीत समावेश करण्यात आलेला आहे.
• लिपिक टंकलेखक एकुण २०० पदांसाठी ६३६५६ अर्ज प्राप्त झाले. सदर पदाची परिक्षा
दि. १०/१०/२०२२, दि. १२/१०/२०२२ आणि दि. १३/१०/२०२२ तीन दिवस १० शहरात ३८
केंद्रावर ६ सत्रात आयोजित करण्यात आली. त्यासाठी पुणे मनपाचे १८० निरिक्षकांची नेमणुक केली
होती. सदर पदासाठी ५००९६ उमेदवारांचा परिक्षा निकाल दि. १२/११/२०२२ रोजी पुणे मनपाच्या
संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला. लिपिक टंकलेखक या पदासाठी निवड यादी व प्रतिक्षा यादी
तयार करण्यात आली. निवड यादीतील २०० उमेदवारांना दि.०४/०१/२०२३ रोजी आज्ञापत्रक
पारित करण्यात आले. सदर पदासाठी ४१९ उमेदवारांचा प्रतिक्षा यादीत समावेश करण्यात आलेला
आहे.
● प्रत्येक पदनिहाय निकाल संकेतस्थळावर प्रसिध्द केलेनंतर पुणे महानगरपालिकेकडुन संभाव्य
पात्र/प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता वेळापत्रकानुसार बोलविण्यात आले.
उमेदवारांकडुन प्राप्त झालेल्या शैक्षणिक, अनुभव कागदपत्रांची आणि ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या
कागदपत्रांची छाननी करणेकरिता पुणे महानगरपालिकेतील विविध कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी वर्गाची नेमणुक करणेत आली.
● उपरोक्त सर्व पदांसाठी परीक्षा निकाल प्रसिध्द केलेनंतर पुणे महानगरपालिकेत मा. कर्मचारी निवड
समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत पदनिहाय उपलब्ध पदे व पद संख्या, रिक्त जागांचे
प्रवर्गनिहाय सामाजिक / समांतर आरक्षण याबाबत माहिती देण्यात येऊन प्रत्येक पदाचा निकाल,
उमेदवाराच्या कागदपत्रे पडताळणीचा नोंदी, आरक्षण, अंशकालीन / भुकंपग्रस्त / खेळाडु / माजी
सैनिक / महिला / दिव्यांग / अनाथ याबाबतची प्रमाणपत्रे यांची पडताळणी समितीने केली.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाकरिता कागदपत्रांच्या तपासणीकरिता बोलविण्यात आलेल्या
उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करताना दि. २१/१०/२०२२ रोजीच्या जाहीर प्रकटनामध्ये
अनुभवाबाबत नमूद केलेल्या कागदपत्रांपैकी उचित तर्कसंगत कागदपत्रे सादर केलेली आहेत त्यांची
शहानिशा करून त्या उमेदवारांचे नावापुढे पात्र/अपात्र करणेस शिफारस बाबत तपासणी पथकाचे
अभिप्राय विचारात घेणेत आले आहेत. त्याचप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेल्या अनुभव विषयक
प्रमाणपत्रांची ईमेलद्वारे पडताळणी करणेत आली.

कागदपत्रे छाननीकरिता बोलावलेल्या तसेच काही उमेदवारांच्या पात्रतेबद्दल काही अर्जदारांकडून प्राप्त
झालेल्या तक्रारीचे अनुषंगाने उचित तपासणी करून पडताळणी पथकाने निर्णय घेतले आहेत.
त्यादृष्टीने पथकाने कागदपत्रांची पडताळणी केली असून, त्यांनी पूर्ण तपासणीअंती शिफारसी केलेल्या
आहेत.
• तपासणी पथक निवड समिती यांनी उमेदवाराने सादर केलेल्या कागदपत्रांची सर्वतोपरी खातरजमा
करून पडताळणी करणेत आली आहे. तसेच सर्व तर्कसंगत शक्यतांचा व त्यांचे व्यवहारिकतेचा परामर्श
घेऊन उमेदवाराचे अनुभवविषयी सिद्धतेचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार उमेदवाराने दिलेल्या
दस्तऐवजाचे आधारे अनुभव ग्राह्य धरणेचा अथवा नाकारणेचा निर्णय घेणेत आला आहे. तपासणी
पथकाचे अभिप्राय अंतिम करून मा.कर्मचारी निवड समितीने सदर शिफारशीनुसार निवड व प्रतिक्षा
यादी तयार केलेली आहे.
• नियुक्तीपूर्वी याबाबत संबंधित उमेदवारांकडून अनुभव दाखला व इतर दाखल कागदपत्रांच्या वैधता व
सत्यतेबाबत प्रतिज्ञापत्र घ्यावे व त्या प्रतिज्ञापत्रात उमेदवाराने सादर केलेल्या कागदपत्राच्या सत्यतेची
जबाबदारी त्यांचेवर ठेऊन कोणतीही कागदपत्रे खोटी आढळल्यास त्याचेवर फौजदारी स्वरुपाची
कारवाई होणेस ते पात्र असतील तसेच त्यांना नोकरीवरून कमी करून ते इतरत्र नोकरीस पात्र
असणार नाहीत अशी अट आज्ञापत्रकात टाकण्यात आली आहे.
उपरोक्त सर्व पदांसाठी उमेदवारांची अपात्रतेची प्रमुख कारणे वैध कागदपत्रे नसणे, अपूर्ण कागदपत्रे,
विहीत शैक्षणिक अर्हता नाही, तीन वर्षाचा अनुभव सिध्द न होणे, आरक्षण प्रवर्गानुसार प्रकल्पग्रस्त,
खेळाडू, अंशकालीन सक्षम दाखला नसणे इत्यादि आहेत.

Assistant Encroachment Inspectors | पुणे महापालिकेकडून भरती केलेल्या ९७ सहायक अतिक्रमण निरीक्षकांच्या नेमणुका

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महापालिकेकडून भरती केलेल्या ९७ सहायक अतिक्रमण निरीक्षकांच्या नेमणुका

पुणे | पुणे महापालिकेकडून (PMC Pune) विविध रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया (Recruitment) राबवण्यात आली होती. सर्व पदासाठी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधी अधिकारी तसेच कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाचा समावेश आहे.  महापालिका प्रशासनाने याआधी कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), लिपिकांच्या आणि सहायक विधी अधिकाऱ्यांच्या हंगामी नेमणुका देखील केल्या आहेत. दरम्यान काल महापालिकेकडून ९७ सहायक अतिक्रमण निरीक्षकांच्या हंगामी नेमणुका केल्या आहेत. नुकतेच महापालिका प्रशासनाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation)

पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी 26 सप्टेंबर ला परीक्षा घेण्यात आली. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला परीक्षा घेण्यात आली. 4 ऑक्टोबर ला सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा झाली. तर कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर झाल्या. (PMC Pune)

निकाल घोषित केल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नेमणुका करणे देखील सुरु करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने याआधी कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), लिपिकांच्या आणि सहायक विधी अधिकाऱ्यांच्या हंगामी नेमणुका देखील केल्या आहेत. दरम्यान काल महापालिकेकडून ९७ सहायक अतिक्रमण निरीक्षकांच्या हंगामी नेमणुका केल्या आहेत. नुकतेच महापालिका प्रशासनाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

इथे यादी पहा 

Assistant encroachment inspectors

PMC recruitment | पुणे महापालिका भरती | लिपिक पदासाठी आता विद्यापीठाची पदवी आवश्यक! 

Categories
Breaking News Education PMC पुणे

महापालिका भरती | लिपिक पदासाठी आता विद्यापीठाची पदवी आवश्यक

| पूर्वी 10 वी उत्तीर्ण असलेल्यांना देता येत होती परीक्षा

पुणे | महापालिकेत (PMC Pune) लिपिक पदासाठी भरती (Clerk recruitment criteria) करताना उमेदवारांना 10 वी उत्तीर्ण असण्याची अट ठेवण्यात आली होती. आतापर्यंत याच पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मात्र आता शैक्षणिक अर्हतेत सुधारणा करण्यात आली आहे. लिपिक पदासाठी आता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (University Degree) आवश्यक आहे. याबाबतचा सुधारणेचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे. सरकारला पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने (Standing Committee) मान्यता दिली आहे. (PMC Pune)

पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियमावली २०१४ मध्ये “लिपिक
टंकलेखक”, वर्ग ३ या पदांची विहित करण्यात आलेली शैक्षणिक अर्हता ही एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता असे नमूद आहे. त्यानुसार आजत्यागात पुणे महानगरपालिकेमध्ये लिपिक टंकलेखक या पदाची नियुक्ती करण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation)

तथापि शासकीय कामांमध्ये सध्या कर्मचाऱ्यांवर कामाची जबाबदारी वाढलेली आहे व महाराष्ट्र शासन व
महानगपालिका यामध्ये संगणकाद्वारे मोठ्या प्रमाणावर कामकाज करण्यात येते. त्यामुळे एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे हे अत्यंत जिकरीचे होत आहे. तसेच लिपिक टंकलेखक या पदासाठी एस. एस. सी. परीक्षा ही शैक्षणिक अर्हता असल्याने पदोन्नती ने उच्च पदावर काम करताना अडचणी येत आहेत. त्यामूळे लिपिक टंकलेखक ह्या पदाची एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता याऐवजी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
त्यामुळे पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मध्ये “लिपिक टंकलेखक”, वर्ग ३ या पदांच्या विहित करण्यात आलेली नेमणुकीची पद्धत, टक्केवारी व शैक्षणिक अर्हतेबाबत  दुरुस्तीचा प्रस्ताव सुचविण्यात आला आहे. या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे. मुख्य सभेची मान्यता मिळल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला जाईल. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (PMC Recruitment)

Recruitment | PMC Pune | पुणे महापालिका भरती | महापालिकेकडून नवीन उमेदवारांच्या हंगामी नेमणुका! | आता लिपिक पदाच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महापालिका भरती | महापालिकेकडून नवीन उमेदवारांच्या हंगामी नेमणुका!

| आता लिपिक पदाच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा

पुणे | पुणे महापालिकेकडून विविध रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सर्व पदासाठी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधी अधिकारी तसेच कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाचा समावेश आहे. लिपिक पद सोडले तर सर्व पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिवाय शुक्रवारी महापालिका प्रशासनाने कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) आणि सहायक विधी अधिकाऱ्यांच्या हंगामी नेमणुका देखील केल्या आहेत. नुकतेच या बाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र आता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना लिपिक पदाच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा आहे. प्रशासनाकडून सांगण्यात आले होते कि या आठवड्यात निकाल लागेल. मात्र अजून हा निकला लांबला आहे.

पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी 26 सप्टेंबर ला परीक्षा घेण्यात आली. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला परीक्षा घेण्यात आली. 4 ऑक्टोबर ला सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा झाली. तर कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर झाल्या. लिपिक पद सोडले तर सर्व पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिवाय शुक्रवारी महापालिका प्रशासनाने कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) आणि सहायक विधी अधिकाऱ्यांच्या हंगामी नेमणुका देखील केल्या आहेत. नुकतेच या बाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

| हे आहेत नेमणूक केलेले अधिकारी

| सहायक विधी अधिकारी

१.प्राजक्ता भुतडा

२. विनया बोरसे

३. निलेश बडगुजर

४. हर्षवर्धन सूर्यवंशी

| कनिष्ट अभियंता (वाहतूक नियोजन)

१. सौरभ चौधरी

२. रश्मी देशमुख

३. प्रज्वल मेंढे

४. वीरपाल गिरसे

| कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

१. अर्जुन माने

२. शुभम धायगुडे

३. अक्षय लडकत

४. चेतन शेंडे

५. दिव्या शिंदे

PMC Recruitment Exam Result | पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | ३१ ऑक्टोबर ला कागदपत्रांची छाननी 

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | ३१ ऑक्टोबर ला कागदपत्रांची छाननी

जाणून घ्या सविस्तर

पुणे महापालिकेत विविध खात्यात विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अर्ज मागवले होते. त्यानुसार परीक्षा घेण्यात येत आहेत. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला परीक्षा घेण्यात आली. याचा निकाल घोषित करण्यात आला आहे. महापालिकेच्या वेबसाईट वर याची यादी देण्यात आली आहे.

याबाबत उपायुक्त सचिन इथापे यांनी सांगितले कि वेबसाईट वर निकालाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराला मिळालेले मार्क आणि topers ची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार मेरीट मध्ये पात्र होणाऱ्या सदर यादीमधील उमेदवारांनी दि. ३१/१०/२०२२ सकाळी ११:०० वाजता, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे.

पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी 26 सप्टेंबर ला परीक्षा घेण्यात आली.  कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला परीक्षा घेण्यात आली. 4 ऑक्टोबर ला सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा झाली. तर कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर झाल्या.

दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदांसाठी झालेल्या परीक्षेचा निकाल व कागदपत्र पडताळणीस पात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.

लिंक

https://pmc.gov.in/recruitment/recruitmentmr.html

https://pmc.gov.in/sites/default/files/JE_Civil_Doc_Veri_List.pdf

https://pmc.gov.in/sites/default/files/JE_Civil_General_Merit_List.pdf

PMC Recruitment Exam Result | पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या या परीक्षांचे निकाल जाहीर | १७ ऑक्टोबर ला कागदपत्रांची छाननी  | जाणून घ्या सविस्तर 

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या या परीक्षांचे निकाल जाहीर | १७ ऑक्टोबर ला कागदपत्रांची छाननी  | जाणून घ्या सविस्तर

पुणे महापालिकेत विविध खात्यात विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अर्ज मागवले होते. त्यानुसार परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यामधील कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी 26 सप्टेंबर ला परीक्षा घेण्यात आली. याचा निकाल घोषित करण्यात आला आहे. महापालिकेच्या वेबसाईट वर याची यादी देण्यात आली आहे.

याबाबत उपायुक्त सचिन इथापे यांनी सांगितले कि वेबसाईट वर निकालाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराला मिळालेले मार्क आणि topers ची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार मेरीट मध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारांना १७ ऑक्टोबर ला कागदपत्रांची छाननी करण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी 26 सप्टेंबर ला परीक्षा घेण्यात आली.  कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला परीक्षा घेण्यात आली. 4 ऑक्टोबर ला सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा झाली. तर कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर ला होणार आहेत.

दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) व कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदांसाठी झालेल्या परीक्षेचा निकाल व कागदपत्र पडताळणीस पात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.