PMC recruitment | पुणे महापालिका भरती | लिपिक पदासाठी आता विद्यापीठाची पदवी आवश्यक! 

Categories
Breaking News Education PMC पुणे
Spread the love

महापालिका भरती | लिपिक पदासाठी आता विद्यापीठाची पदवी आवश्यक

| पूर्वी 10 वी उत्तीर्ण असलेल्यांना देता येत होती परीक्षा

पुणे | महापालिकेत (PMC Pune) लिपिक पदासाठी भरती (Clerk recruitment criteria) करताना उमेदवारांना 10 वी उत्तीर्ण असण्याची अट ठेवण्यात आली होती. आतापर्यंत याच पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मात्र आता शैक्षणिक अर्हतेत सुधारणा करण्यात आली आहे. लिपिक पदासाठी आता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (University Degree) आवश्यक आहे. याबाबतचा सुधारणेचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे. सरकारला पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने (Standing Committee) मान्यता दिली आहे. (PMC Pune)

पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियमावली २०१४ मध्ये “लिपिक
टंकलेखक”, वर्ग ३ या पदांची विहित करण्यात आलेली शैक्षणिक अर्हता ही एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता असे नमूद आहे. त्यानुसार आजत्यागात पुणे महानगरपालिकेमध्ये लिपिक टंकलेखक या पदाची नियुक्ती करण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation)

तथापि शासकीय कामांमध्ये सध्या कर्मचाऱ्यांवर कामाची जबाबदारी वाढलेली आहे व महाराष्ट्र शासन व
महानगपालिका यामध्ये संगणकाद्वारे मोठ्या प्रमाणावर कामकाज करण्यात येते. त्यामुळे एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे हे अत्यंत जिकरीचे होत आहे. तसेच लिपिक टंकलेखक या पदासाठी एस. एस. सी. परीक्षा ही शैक्षणिक अर्हता असल्याने पदोन्नती ने उच्च पदावर काम करताना अडचणी येत आहेत. त्यामूळे लिपिक टंकलेखक ह्या पदाची एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता याऐवजी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
त्यामुळे पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मध्ये “लिपिक टंकलेखक”, वर्ग ३ या पदांच्या विहित करण्यात आलेली नेमणुकीची पद्धत, टक्केवारी व शैक्षणिक अर्हतेबाबत  दुरुस्तीचा प्रस्ताव सुचविण्यात आला आहे. या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे. मुख्य सभेची मान्यता मिळल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला जाईल. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (PMC Recruitment)