Pay matrix | PMC | महापालिकेतील काही पदांना सुधारित पे मॅट्रिक्स!  | कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

महापालिकेतील काही पदांना सुधारित पे मॅट्रिक्स!

: कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली

पुणे : महापालिकेतील काही पदांना सातव्या वेतन आयोगानुसार पे मॅट्रिक्स लागू करण्यात आला नव्हता. यामुळे काही कर्मचारी आणि अधिकारी त्रस्त होते. शिवाय हे कर्मचारी सरकारकडे देखील पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यानुसार त्यांना सुधारित पे मॅट्रिक्स लागू करण्यात आला आहे. नुकतेच हे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये केमिस्ट, असिस्टंट केमिस्ट, आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, उपप्रमुख आरोग्य निरीक्षक, प्रमुख आरोग्य निरीक्षक या पदांचा समावेश आहे.

: आयुक्तांनी जारी केले आदेश

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी व सेवकांना  ७ वा वेतन आयोग लागू करणबाबत शासनाची मान्यता मिळाली आहे.  राज्य शासनाने महापालिकेतील केमिस्ट व असिस्टंट केमिस्ट पदांची वेतन संरचना सुधारित करणेस मान्यता दिलेली असल्याने सदर मान्यतेस अनुसरून ७ व्या वेतन आयोगातील समकक्ष पे मॅट्रिक्स सुधारित करणेबाबत  ठरावान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार केमिस्ट व असिस्टंट केमिस्ट या पदांना वेतनाचा लाभ देताना कार्यालयीन आदेशान्वये वेतन निश्चिती करणेत यावी तसेच या कार्यालयीन आदेशान्वये प्रत्यक्ष लाभ दि. ०४/०६/२०१९ पासून देण्यात यावा. तथापि आदेशामध्ये नमूद केलेनुसार वेतनातील कोणताही फरक न देता सुधारित वेतनश्रेणी देणेबाबत कार्यवाही करणेत यावी. तसेच पुणे महानगरपालिकेकडील आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, उप प्रमुख आरोग्य निरीक्षक व प्रमुख आरोग्य निरीक्षक या पदांसाठी ७ व्या वेतन आयोगानुसार  मान्यता दिलेल्या वेतन पे मॅट्रिक्स मध्ये अंशतः दुरुस्ती करून पे मॅट्रिक्स सुधारित करणेबाबत शासन आदेशान्वये मान्यता प्राप्त झाली आहे. सदर मान्यतेनुसार वरील परिच्छेद मध्ये नमूद पदांना  पे मॅट्रिक्स नुसार दि. ०१/०१/२०१६ ते  शासन आदेश दिनांकापर्यंत काल्पनिक वेतन निश्चिती करून वेतनाचा प्रत्यक्ष लाभ  आदेशाचे दिनांकापासून देणेबाबत कार्यवाही करणेत यावी. असे आयुक्तांनी म्हटले आहे.
केमिस्ट ला पूर्वी एस 13 वेतनश्रेणी होती ती आता एस 21 झाली आहे. असिस्टंट केमिस्ट ला एस 10 होती ती आता एस 16 करण्यात आली आहे. आरोग्य निरीक्षकाला एस 10 होती ती एस 13 करण्यात आली आहे. वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाला एस 13 होती ती आता एस 15 करण्यात आली आहे. उपप्रमुख आरोग्य निरीक्षकाला एस 14 पे मॅट्रिक्स होते ते एस 16 करण्यात आले आहे. तर प्रमुख आरोग्य निरीक्षकाची एस 15 ची बेतनश्रेणी वाढवून ती एस 17 करण्यात आली आहे.

Leave a Reply