Integrated Double-Decker Flyover | विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलास महापालिकेचा समान पाणीपुरवठा प्रकल्प ठरतोय अडथळा

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Integrated Double-Decker Flyover | विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलास महापालिकेचा समान पाणीपुरवठा प्रकल्प ठरतोय अडथळा

| PMRDA कडून तक्रार करत काम लवकर करण्याची मागणी

Integrated Double-Decker Flyover | पुणे मनपा मार्फत (Pune Municipal Corporation) समान पाणीपुरवठा योजने (Equal Water Project) अंतर्गत गणेशखिंड (Ganeshkhind Road Pune) रस्त्यावर अपूर्ण  १२०० मिमी व्यासाची पाण्याची पाईप लाईन टाकणेचे काम सुरु आहे. मात्र यामुळे मेट्रो सह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या (Integrated Double Decker Flyover) पाषाण बाजूकडील उड्डाणपूल खांबाच्या व रॅम्पच्या बांधकामामध्ये अस्तित्वातील चालू १२०० मिमी व्यासाची पाण्याची पाईप लाईन अडथळा ठरत आहे. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण करावे. अशी मागणी PMRDA प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (PMRDA) मार्फत प्रगतीत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे मेट्रो सह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे (Double Decker Flyover in University Chowk) बांधकाम प्रगतीत आहे. एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम १५ ऑगस्ट २०२४ पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना प्राधिकरणास प्राप्त आहेत. त्यानुसार एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाय योजनांबाबत उपमुख्यमंत्री यांनी PMRDA ला सूचना दिलेल्या आहेत.

मेट्रो सह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या पाषाण बाजूकडील उड्डाणपूल खांबाच्या व रॅम्पच्या बांधकामामध्ये अस्तित्वातील चालू १२०० मिमी व्यासाची पाण्याची पाईप लाईन अडथळा ठरत आहे. यापूर्वी गणेशखिंड रस्त्याचे, विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चौक या २४० मी लांबीमध्ये पुणे मनपा विकास आराखड्यानुसार रुंदीकरण करणे या कामा अंतर्गत पाणीपुरवठा  विभागामार्फत विद्यापीठ चौक येथे मॉडर्न कॉलेज परिसरातील रस्ता रुंदीकरणासाठी उपलब्ध झालेल्या जागेतून १२०० मिमी व्यासाची पाण्याची पाईप लाईन टाकणेचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा  विभागामार्फत करण्यात आलेले आहे. तथापि, सदर पाण्याची लाईन गणेश गल्ली, गणेशखिंड रस्ता येथे जोडण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
तरी, गणेशखिंड रस्त्यावरील गणेश गल्ली येथील १२०० मिमी व्यासाची पाण्याची पाईप लाईन टाकणेचे उर्वरित काम लवकर सुरु करावे.  जेणेकरून सदर काम पूर्ण झालेनंतर मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे पाषाण बाजूकडील उड्डाणपूल खांबाचे व रॅम्पचे काम सुरु करणे शक्य होईल. असे PMRDA प्रशासनाकडून पुणे महापालिकेला आदेश देण्यात आले आहेत.
——
News Title | Integrated Double-Decker Flyover | Municipal Corporation’s common water supply project is becoming an obstacle to the double-storeyed flyover at Vidyapeeth Chowk