NCP Youth | Girish Gurnani | कैसे लगे अच्छे दिन? – राष्ट्रवादी युवक ने जनतेला केला प्रश्न

Categories
Breaking News Political social पुणे
Spread the love

कैसे लगे अच्छे दिन? – राष्ट्रवादी युवक ने जनतेला केला प्रश्न

| शहरात अनेक ठिकाणी दिवाळी निमित्त सरकार ची केली पोलखोल

शहरात ठिकठिकाणी बॅनर बाजी करत युवक राष्ट्रवादी चे गिरीश गुरूनानी यांनी जनतेला दिवाळी निमित्त शुभेच्छा देतानाच जनतेला प्रश्न ही विचारला आहे. “कैसे लागे अच्छे दिन, लौटा दो हमारे बुरे दिन” असे वाक्य लिहत हे बॅनर जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच २०१४ व २०२२ च्या अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींचा तुलनात्मक तक्ता लावत युवक राष्ट्रवादी ने केंद्र शासित भाजपा सरकार च्या आर्थिक धोरणांवर आघात केला आहे.

या विषयी बोलत असताना युवक राष्ट्रवादी चे कोथरूड अध्यक्ष गिरीश गुरूनानी म्हणाले की केंद्र शासित भाजपा सरकार ने खरंच जनतेची दिवाळी गोड केली आहे का हे या किमतींकडे बघून जनतेनेच ठरवावे. सामान्य जनतेवर होत असलेल्या महागाईच्या माऱ्याला केवळ आणि केवळ केंद्रातील भाजपा सरकारच कारणीभूत असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. “आमदनी अठन्नी खर्चा रुपया” हे वाक्य लिहलेले फलक हातात धरत त्यांनी गृहिणींना ही कोलमडत असलेल्या बजेट बद्दल प्रश्न केला आहे. GST च्या माऱ्याने बेजार झालेल्या व्यापाऱ्यांच्या व्यथा मांडण्याचा ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. दुधाचे भाव २ – २ रुपयाने वाढवत वाढवत आता ५२₹ प्रती लिटर ला पोचले आहेत असे ही त्यांनी निक्षून सांगितले.

वरील सर्व बाबींचा विचार करून सामान्य जनतेने स्वतः ठरवावे की त्यांना हा महागाई चा राक्षस डोक्यावर बसवून नाचायचे आहे की मग येत्या निवडणुकीत सरकार ला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, असे आवाहन गुरूनानी यांनी केले. या आशयाचे बॅनर शहरातील महत्वाचे भाग जसे चांदणी चौक, कोथरूड पेट्रोल पंप, नळ स्टॉप, डेक्कन पेट्रोल पंप, ज्ञानेश्वर पादुका चौक,बालगंधर्व, तसेच बिग बाजार आणि डी मार्ट बाहेर ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने झळकावण्यात आले आहेत.

या वेळी राष्ट्रवादी युवक चे अमोल गायकवाड,श्रीकांत भालगरे,शशांक काळभोर,संकेत शिंदे,ऋषिकेश कडू,प्रीतम पायगुडे,ऋषिकेश शिंदे,रवी गाडे,तेजस बनकर ,आरव दिघे, अविनाश गायकवाड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.