PMC Water Meter | अवास्तव पाणीवापर लपवण्यासाठी आयुक्त बंगला, महापौर बंगल्यावरच  पाणी मीटर्स बसवले नाहीत

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Water Meter | अवास्तव पाणीवापर लपवण्यासाठी आयुक्त बंगला, महापौर बंगल्यावरच  पाणी मीटर्स बसवले नाहीत

| विवेक वेलणकर यांचा आरोप

 

PMC Water Meter | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) सध्या समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत (Equal water supply scheme) घरोघरी मीटर बसवत आहे. मात्र अजूनही महापौर बंगला, महापालिका आयुक्त निवास, अतिरिक्त आयुक्तांची निवासस्थाने, कलेक्टर बंगला या ठिकाणी मीटर बसवले नसल्याचे उघड झाले आहे. या ठिकाणी अवास्तव पाणीवापर होतो. याबाबत पाणीपुरवठा विभागाची बहुतेक खात्री असावी म्हणून झाकली मूठ ठेवण्याच्या उद्देशाने अद्यापही पाणी मीटर बसवले गेले नाहीत. असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velnkar) यांनी केला आहे. तसेच मीटर बसवण्याची मागणी केली आहे. (PMC Pune Water Supply Department)

 

विवेक वेलणकर यांच्या निवेदनानुसार  पुणेकर पाण्याचा अति वापर करतात हा आरोप सातत्याने केला जातो. या पार्श्वभूमीवर ही पाणी मीटर ची योजना राबवली जात आहे. बसवलेल्या मीटर्स पैकी ज्या नागरीकांचा पाणीवापर दरडोई दर दिवशी १५० लिटर पेक्षा जास्त होत आहे. त्यांना कायदेशीर कारवाई च्या धमक्या देणाऱ्या  नोटीसा ही गेल्या वर्षी पाठवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये माहिती अधिकार दिनात समान पाणीपुरवठा कार्यालय प्रमुखांकडे महापौर बंगला, महापालिका आयुक्त निवास, अतिरिक्त आयुक्तांची निवासस्थाने, कलेक्टर बंगला या सर्व ठिकाणी दरडोई दर दिवशी किती पाणीवापर होतो याच्या माहितीसाठी गेलो असता त्यांनी महापालिकेच्या कोणत्याही प्राॅपर्टी मधे अजून पाणी मीटर्स बसवले नसल्याचे मला सांगितले होते.  लवकरच या ठिकाणी आम्ही पाणी मीटर बसवू असे सांगितले. मात्र परवा माहिती अधिकार दिनात परत एकदा याची माहिती मिळवण्यासाठी गेलो असता अजूनही महापौर बंगला , महापालिका आयुक्त निवास , अतिरिक्त आयुक्तांची निवासस्थाने, कलेक्टर बंगला या ठिकाणी मीटर बसवले नसल्याचे मला सांगितले गेले. या ठिकाणी अवास्तव पाणीवापर होतो याबाबत पाणीपुरवठा विभागाची बहुतेक खात्री असावी म्हणून झाकली मूठ ठेवण्याच्या उद्देशाने अद्यापही पाणी मीटर बसवले गेले नाहीत. असा आरोप वेलणकर यांनी केला आहे. (Pune Municipal Corporation)

———–

आता तरी पाणीपुरवठा विभाग पुण्यातील सर्वच सरकारी व निमसरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी पाणीमीटर बसवतील आणि त्यांचा पाणीवापर किती आहे हे दरमहा जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.

विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे.

——–