Latest News on Water cuts in Pune | आता 18 मे पासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचे पाणी बंद राहणार 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Latest News on Water cuts in Pune | आता 18 मे पासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचे पाणी बंद राहणार

– महापालिका प्रशासनाचा निर्णय

Latest News on Water cuts in Pune | पुणेकरांना आगामी काळात पाणी जपून वापरावे लागणार आहे. कारण अल निनो (El-Nino) वादळाच्या धर्तीवर पाणी बचत करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) घेण्यात आला आहे. त्यानुसार आता 18 मे पासून दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. जून महिन्यात पुन्हा आढावा घेण्यात येईल आणि कपात सुरु ठेवायची अथवा बंद करायची याचा निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर )chief engineer Anirudh Pawaskar) यांनी दिली. Latest news on punes water supply
अलनिनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यासोबतच आवश्यक तिथे पाणी कपात करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने आराखडा केला आहे. दरम्यान पुण्यात पाणीकपात लागू होणार का? झाली तर एक दिवसाआड पाणीमिळणार? कि आठवड्यातून एक दिवस कपात होणार? याबाबतचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत होणार होता. त्यानुसार ही बैठक झाली.  पाणीकपात करण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. Latest news on water cuts in Pune city
याबाबत पावसकर यांनी सांगितले कि, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सद्यस्थितीत 9.70 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. मागील वर्षी पेक्षा अर्धा टीएमसी ने पाणी कमी आहे. उन्हाची तीव्रता वाढत आहे. तसेच अल निनो वादळाचे संकट असणार आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे पाणी बचत करणे आवश्यक आहे. तसेच कपात करण्याबाबत राज्य सरकारने देखील आदेश दिले होते. त्यानुसार 18 मे म्हणजे पुढील गुरुवार पासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जून महिन्यात पावसाचा अंदाज घेऊन आढावा घेण्यात येईल. त्यानंतर पाणी कपात बाबत निर्णय घेण्यात येईल. Pune Municipal Corporation (PMC) 
 
पुणेकरांची होणार तारांबळ 
 
दरम्यान शहरात असे काही भाग आहेत ज्या ठिकाणी एका दिवशी पाणी बंद ठेवल्यानंतर पुढील तीन दिवस पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नागरिक त्रासून जातात. अशा भागात प्रशासन कशा पद्धतीने नियोजन करणार, हा कळीचा मुद्दा आहे. (Pune water cut News) 
—-
Latest News on Water cuts in Pune | Now from May 18, water will be shut off in the entire city of Pune every Thursday. Decision of pune civic body