PMRDA Draft DP | PMRDA च्या प्रारूप विकास योजनेसाठी एक वर्षाची मुदतवाढ

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र
Spread the love

PMRDA Draft DP | PMRDA च्या प्रारूप विकास योजनेसाठी एक वर्षाची मुदतवाढ

| विविध शहरांतील प्राधिकरणांना मुदतवाढ

 

PMRDA Draft DP | प्रारुप विकास योजनांसाठी (Draft DP) प्राधिकरणांना मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting Decision) घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम-१९६६ च्या कलम २६ (१) मध्ये महानगरपालिका किंवा नियोजन प्राधिकरण असा मजकूर टाकण्यात येईल व अध्यादेश प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करण्यात येईल. (PMRDA Draft DP)

सध्या पुणे महानगर प्रदेशाची विकास योजना (PMRDA Draft DP) तयार करण्याची कार्यवाही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरु आहे. महानगर प्रदेशाची लोकसंख्या १७ लाख १२ हजार एवढी असून ६ हजार ९०० चौ. कि.मी. क्षेत्र आहे. इतर नगर परिषदांप्रमाणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास प्रारुप विकास योजनेस मुदतवाढ देण्यासाठी ६ महिन्याचा कालावधी अपुरा पडतो. राज्यातील नाशिक (Nashik), औरंगाबाद (Aurangabad), कोल्हापूर (Kolhapur), नागपूर (Nagpur) या शहरांकरिता देखील विकास प्राधिकरणे असून महानगरांची विकास योजना तयार करताना त्यांना देखील कालावधी कमी पडू शकतो ही बाब विचारात घेऊन विकास योजना तयार करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. (PMRDA News)


News Title | One year extension for draft development plan of PMRDA | Extension of time to authorities in various cities