PMC Care | Pune Municipal Corporation | पीएमसी केअर प्लॅटफॉर्म नव्या स्वरुपात | नागरिकांना एका क्लिकवर मिळणार सर्व सुविधा!

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Care | Pune Municipal Corporation | पीएमसी केअर प्लॅटफॉर्म नव्या स्वरुपात | नागरिकांना एका क्लिकवर मिळणार सर्व सुविधा!

PMC Care | Pune Municipal Corporation |  पुणे महानगरपालिकेकडून (PMC Pune) पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधा मोबाईल अॅप्लिकेशन आणि वेबपोर्टल यांच्या माध्यमातून आगामी काळात नागरिकांना उपलब्ध करून देणे करिता Citizen Engagement Platform – पीएमसी केअर (PMC Care) प्लॅटफॉर्म नव्या स्वरुपात विकसित करण्यात आलेले आहे. पुणे मनपाच्या विविध ऑनलाईन सेवा (Pune Municipal Corporation Online Services) सुविधांचा लाभ नागरिकांना घरबसल्या घेता येणार आहे. अशी माहिती महापालिकेच्या संगणक विभागाकडून (PMC IT Department) देण्यात आली. (PMC Care | Pune Municipal Corporation)

पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी / कर्मचारी (PMC Employees and officers) यांचेकरिता नव्याने विकसित केलेल्या Citizen Engagement Platform PMC CARE पोर्टल व मोबाईल अप्लिकेशनचे Beta Version उपलब्ध करून देण्यात आले आहे.  पुणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रीय सहभाग असावा व महानगरपालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधा मोबाईल अॅप्लिकेशन आणि वेबपोर्टल यांच्या माध्यमातून आगामी काळात नागरिकांना उपलब्ध करून देणे करिता Citizen Engagement Platform – पीएमसी केअर प्लॅटफॉर्म नव्या स्वरुपात विकसित करण्यात आलेले आहे. (Pune Municipal Corporation)

पुणे मनपाच्या विविध ऑनलाईन सेवा सुविधांचा लाभ नागरिकांना घरबसल्या घेता येणार आहे. या प्लॅटफॉर्म द्वारे तक्रार नोंदवणे, ऑनलाईन मिळकत कर भरणा, पाणीपट्टी भरणा, फेरीवाला देयक, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, विविध प्रमाणपत्रे, NOC, उद्यान तिकीट, निविदा, तसेच विविध परवाने / परवानगी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच नागरिकांना ब्लॉग्स लिहीणे, लेख, पुणे मनपाद्वारे राबविण्यात येणारे उपक्रम, प्रकल्प कार्यक्रमांची माहिती व आपल्या आसपासच्या ठिकाणांची माहितीहि या प्लॅटफॉर्मवरून केवळ एका क्लिकवर मिळणार आहे. (PMC online Services)
पुणे महानगरपालिकेचा Citizen Engagement Platform PMC CARE हा सर्व वयोगटांसाठी उपयुक्त राहील, असा विकसित करण्यात आलेला आहे. तसेच महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांचेकरिता PMC CARE प्लॅटफॉर्मद्वारे शासन निर्णय, परिपत्रके, नागरिकांमार्फत प्राप्त तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करणे, तसेच तक्रार डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. (PMC Pune News)
——
News Title | PMC Care | Pune Municipal Corporation | PMC Care Platform in new format | Citizens will get all facilities in one click!