PMC  Pension | पुणे महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना दिलासा ! |  जानेवारीत 104  पेन्शन प्रकरणे मार्गी

Categories
PMC social पुणे
Spread the love

PMC  Pension | पुणे महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना दिलासा ! |  जानेवारीत 104  पेन्शन प्रकरणे मार्गी

PMC  Pension |  पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) सेवानिवृत्त सेवकांची पेन्शन प्रकरणे (PMC Pension Cases) मोठ्या प्रमाणावर विविध कारणास्तव प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत होते. मात्र याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेत खाते प्रमुख आणि बील क्लार्क यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तसेच पेन्शन प्रकरणे निकाली काढण्यासाठी एक मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार पेन्शन प्रकरणे मार्गी लागत आहेत. जानेवारी महिन्यात 104 पेन्शन प्रकरणे वेगवेगळ्या खात्याकडून निकाली काढण्यात आली आहेत. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी  नितीन केंजळे यांनी दिली. (Pune PMC News)
महापालिकेच्या पात्र सेवानिवृत्त सेवकांना पेन्शन (PMC Retired Employees Pension) दिली जाते. काही सेवानिवृत्त सेवकांचा मृत्यू होतो, तरीही पेन्शन मिळत नाही. यामुळे सेवकांच्या वारसांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत तक्रारी येत होत्या. तसेच जवळपास 1000 प्रकरणे प्रलम्बित होती. प्रलंबित पेन्शन प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी यापूर्वी विविध विभागांना सुचित करण्यात आले होते. परंतु अद्यापी पेन्शन प्रकरणे प्रलंबित होती. याबबात खातेप्रमुख, पगारपत्रक / पेन्शन लेखनिक हे गांभिर्याने दखल घेत नसल्याने सेवानिवृत्त सेवकांची/ मयत सेवकांच्या वारसांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे खाते प्रमुख आणि बिल क्लार्क यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील अतिरिक्त आयुक्तांनी देखील दिला होता. त्यानुसार सर्व विभाग कामाला लागले आहेत. (Pune Municipal Corporation)
: आता 366 पेन्शन प्रकरणे शिल्लक 
याबाबत नितीन केंजळे यांनी सांगितले कि, आम्ही पेन्शन प्रकरणाचा निपटारा करत आणला आहे. एकूण 417 प्रकरणे प्रलंबित होती. त्यातील 104 प्रकरणे जानेवारी महिन्यात मार्गी लावली आहेत. मराठा सर्वेक्षण कामात आमचे कर्मचारी गुंतले असल्याने कामात वेग नव्हता. आता नवीन 55 प्रकरणे आली आहेत. याबाबत नुकतीच क्लार्क लोकांसोबत बैठक घेऊन प्रकरणे निकाली काढण्याबाबत आदेश दिले आहेत. केंजळे यांनी सांगितले कि, शिक्षण विभागाकडून देखील आता वेगाने काम होत आहे. विभागाकडे 91 प्रकरणे प्रलंबित होती ती कमी होऊन आता 76 राहिली आहेत. आरोग्य विभागाकडे 27 तर पाणीपुरवठा विभागाकडे 31 पेन्शन प्रकरणे प्रलंबित आहेत. शिक्षण, पाणीपुरवठा, अग्निशमन विभाग तसेच औंध क्षेत्रीय कार्यालय, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय यांनी सर्वात जास्त प्रकरणे निकाली काढली आहेत.
——
प्रलंबित पेन्शन प्रकरणाबाबत नुकतीच बील क्लार्क सोबत आढावा बैठक घेतली. पेन्शन प्रकरणे मार्गी लावण्याबाबत सर्व विभागांचा प्रतिसाद मिळतोय. प्रकरणे निकाली काढण्यावर आमचा भर आहे. काही प्रकरणे वारस वाद आणि इतर तांत्रिक कारणाने प्रलम्बित राहत आहेत. मात्र त्याचा देखील निपटारा केला जाईल.
नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी 
—-