PMC Pension Bill Clerk | बिल लेखनिक पेन्शन प्रकरणाचा स्वतःच्या स्तरावर करताहेत पाठपुरावा | अतिरिक्त आयुक्तांनी दिला प्रशासकीय कारवाईचा इशारा

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pension Bill Clerk | बिल लेखनिक पेन्शन प्रकरणाचा स्वतःच्या स्तरावर करताहेत पाठपुरावा | अतिरिक्त आयुक्तांनी दिला प्रशासकीय कारवाईचा इशारा

PMC Pension Bill Clerk  – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation (PMC) प्रशासनाकडील सेवानिवृत्त सेवकांचे पेन्शन प्रकरणे (PMC Retired Employees pension) चालवित असताना संबंधित बिल लेखनिक सदरचे पेन्शन प्रकरणे हातोहात ऑडीट अथवा इतर संबंधित विभागाकडे घेऊन जात असतात. तसेच परस्पर ऑडीट विभागाकडे मार्गदर्शन / त्रुटींची पुर्तता करण्यासाठी स्वतःच्या स्तरावर पाठपुरावा करत असतात. परिणामी यामध्ये वेळेचा अपव्यय होऊन कामकाजामध्ये कमालीची दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा बिल लेखनिकांवर कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade IAS) यांनी दिला आहे. (Pune PMC News)
 अतिरिक्त आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार एखादे पेन्शन प्रकरण किती वेळा फेर दुरुस्त / फेर सादर झाले, व कोणत्या स्तरावर त्रुटींची पुर्तता करण्यास विलंब लागला, याचा बोध होत नाही. त्यामुळे बिल लेखनिक यांना सूचीत करण्यात आले आहे की, यापुढे पेन्शन कामकाजामध्ये गतीमानता व सूसुत्रता आणण्याच्या दृष्टीने संबंधित बिल लेखनिक यांनी सदर पेन्शन प्रकरणांबाबत स्वतःच्या स्तरावर पाठपुरवा न करता, खात्यामार्फत पेन्शन प्रकरण ऑडीट विभागास जावक करावे. जेणेकरुन पेन्शन प्रकरणांची प्रत्येक टप्यावरील हालचालींच्या नोंदी राखता येईल.
तथापी बिल लेखनिकांनी ऑडीट विभागकडील (आवक व जावक स्वरुपात) लेखी नोंदी न ठेवल्यास व त्यामुळे पेन्शन प्रकणांत झालेल्या दिरंगाईस संबंधित बिल लेखनिकांस जबाबदार धरण्यात येऊन त्यांचेवर पुढील प्रशासकीय कारवाई प्रस्तवित करण्यात येईल. असा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे.

 Good news for PMC employees  | Salary and Pension will be received on the 1st of Month 

Categories
Breaking News Commerce PMC पुणे

 Good news for PMC employees  | Salary and Pension will be received on the 1st of Month

  |  A single system for wages and pensions

 PMC Pay Roll and Pension Software – (The Karbhari News Service) – Pune Municipal Corporation employees are given pay roll and pension through online system.  But this system is very old.  So the municipality has now developed a new software.  Through that, municipal employees will not have to wait for salary and pension.  It will now gain momentum.  Interestingly, the Education Department (PMC Education Department) has also been added to it now.  It was to be started from January.  But due to technical reasons, it will be started from May.  This information was given by Additional Commissioner Ravindra Binwade IAS.  (PMC HRMS Pay Roll and Pension System)
 Pay system was made in 2013 to pay salary and pension to Pune Municipal employees.  But this system is outdated.  This is causing some problems.  Also the then Board of Education has also been included in the Municipal Corporation.  Earlier there were separate systems for municipal employees and education department salaries.  Employees had to do a lot in this.  Also, the salary was not paid on time.  Also, if there are technical difficulties in paying the salary to some employees, all the employees have to wait for the salary.  But now all these problems will be removed in the new system.  (Pune Municipal Corporation)
  Both pay roll and pension will be brought into one system.  Due to this now we have to wait for the 10th date for the salary.  It doesn’t have to be seen.  Salary will be paid on 1st of every month.  Also today retired servants have to wait for pension, that problem will also be reduced and it will help to get pension at the earliest.  Jagtap said that Bank of Maharashtra has given good help to the Municipal Corporation under CSR to make this software.  The use of this system was started on an experimental basis.
 Binawade said that complete information of the officers and employees, pay scale and allowances given accordingly, information in the service book has been uploaded on the software.  The work of uploading information of pensioners has reached the final stage.  From the last three months, the administration started this software and old method of salary on trial basis.  The errors found in this have been fixed.  Bill Clark has also been trained on this new software.  Binawade informed that the administration has decided to pay the salary for the month of April in May through this software after the new financial year starts from April 1.
 Binawade said that the software has the facility for every employee to get information about his salary bill and service book even from his mobile phone.  For this, the employee will be provided login ID through Aadhaar number and Employee ID number.  Employees will have to submit their leave applications online.  Every employee will be able to understand the current status in the service book through this software.
 The retiring employee will get information about which documents to submit, NOC of which department to get, six months in advance.  They have to submit their pension cases online themselves.  Due to this, the delay in pension cases will be reduced and the way will be paved for getting pension from the next months after retirement.  Even after May, the previous two months salary system will be continued in parallel.  Binawade informed that training will be organized for all officers and employees.
 —

PMC HRMS Pay Roll and Pension Software | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | मे महिन्यापासून 1 तारखेलाच मिळणार वेतन! 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC HRMS Pay Roll and Pension Software | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | मे महिन्यापासून 1 तारखेलाच मिळणार वेतन!

 | वेतन आणि पेन्शन मिळण्यात येणार गती | वेतन आणि पेन्शन साठी एकच प्रणाली

PMC Pay Roll and Pension Software – (The Karbhari News Service) –  महापालिका (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना वेतन (Pay roll) आणि पेन्शन (Pension) हे ऑनलाईन प्रणाली द्वारे दिले जाते. मात्र ही सिस्टम फार जुनी झाली आहे. त्यामुळे महापालिका आता नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्या माध्यमातून महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शन साठी रखडत बसावे लागणार नाही. याला आता गती मिळणार आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभाग (PMC Education Department) देखील आता यामध्ये जोडण्यात आला आहे. जानेवारी पासून याची सुरुवात करण्यात येणार होती. मात्र तांत्रिक कारणामुळे याची सुरुवात मे महिन्यापासून केली जाणार आहे.  अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Ravindra Binwade IAS) यांनी दिली. (PMC HRMS Pay Roll and Pension System) 

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शन देण्यासाठी 2013 साली वेतन प्रणाली बनवण्यात आली होती. मात्र ही प्रणाली जुनी झाली आहे. यामुळे काही अडचणी निर्माण होत आहेत. तसेच तत्कालीन शिक्षण मंडळाचा देखील महापालिकेत समावेश झाला आहे. याआधी महापालिका कर्मचारी आणि शिक्षण विभाग वेतनासाठी स्वतंत्र प्रणाली होती. यामध्ये कर्मचाऱ्यांना खूप करावे लागायचे. शिवाय वेतन देखील वेळेवर होत नसायचे. तसेच काही कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात तांत्रिक अडचणी आल्या तर सगळ्याच कर्मचाऱ्यांना वेतनासाठी थांबावे लागत आहे. मात्र आता नवीन प्रणाली मध्ये या सगळ्या अडचणी दूर करण्यात येणार आहेत. (Pune Municipal Corporation)
 pay roll आणि pension  दोन्ही एकाच प्रणालीत आणले जाणार आहे. यामुळे आता वेतनासाठी जी 10 तारखेची वाट पाहावी लागते. ती पाहावी लागणार नाही. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेलाच वेतन मिळेल. तसेच आज पेन्शनसाठी सेवानिवृत्त सेवकांना रखडावे लागते, ती अडचण देखील कमी होणार असून लवकरात लवकर पेन्शन हातात मिळण्यास मदत होणार आहे. जगताप यांनी सांगितले कि, हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी महापालिकेला बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) ने सीएसआर (CSR) अंतर्गत चांगली मदत केली आहे. या प्रणालीचा वापर करण्यास  प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली होती.

बिनवडे यांनी सांगितले कि,  सॉफ्टवेअरवर कार्यरत अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संपुर्ण माहिती, वेतनश्रेणी आणि त्यानुसार देण्यात येणारे भत्ते, सर्व्हिस बुकमधील माहिती अपलोड करण्यात आली आहे. तर पेन्शनरांची माहिती अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मागील तीन महिन्यांपासून प्रशासनाने हे सॉफ्टवेअर आणि जुन्या पद्धतीने पगार करण्यास प्रायोगीक तत्वावर सुरूवात केली. यामध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. या नव्या सॉफ्टवेअरचे सर्व पगार बिल क्लार्कला प्रशिक्षणही देण्यात आले आहे. एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्याचे वेतन मे मध्ये या सॉफ्टवेअरद्वारे करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती बिनवडे यांनी दिली.

बिनवडे यांनी सांगितले, की प्रत्येक कर्मचार्‍याला मोबाईलवरूनही त्याच्या पगारबिलाची तसेच सर्व्हिस बुकची माहिती घेण्याची सुविधा या सॉफ्टवेअरमध्ये आहे. यासाठी कर्मचार्‍याला आधार क्रमांक आणि कर्मचारी आयडी क्रमांकाच्या माध्यमांतून लॉग इन आयडी उपलब्ध करून दिला जाणार आहे. कर्मचार्‍यांना यापुढील काळात रजेचे अर्जही ऑनलाईनच सादर करावे लागणार आहेत. सर्व्हिस बुकमधील सद्यस्थिती देखिल या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रत्येक कर्मचार्‍याला समजू शकणार आहे.

सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍याला सहा महिने अगोदरच कोणती कागदपत्र सादर करायची, कोणत्या विभागाच्या एनओसी घ्यायच्या आहेत याची माहिती मिळणार आहे. त्यांना स्वत: पेन्शनची प्रकरणे ऑनलाईन सादर करावी लागणार आहेत. त्यामुळे पेन्शन प्रकरणांचा विलंब कमी होणार असून निवृत्तीनंतरच्या पुढील महिन्यांपासून पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मे नंतरही दोन महिने पुर्वीची पगाराची पद्धत समांतरपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती बिनवडे यांनी दिली.

PMC Retired Employees Notional increment | 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तिवेतन निश्चित करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून परिपत्रक जारी !

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Retired Employees Notional increment | 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तिवेतन निश्चित करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून परिपत्रक जारी!

PMC Retired Employees Notional Increment – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या (Retired Employees) किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ (Notional Increment) विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन (PMC Pension) निश्चित करण्याबाबत राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. याचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. त्यानुसार पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) हा नियम लागू आहे. यावर अमल करून सेवकांना लाभ देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून नियमावली घोषित करण्यात आली आहे. त्याला स्थायी समिती (PMC Standing Committee) आणि मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार वित्त आणि लेखा विभागाकडून यावर अंमलबजावणी करण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.   (PMC Retired Employees Notional Increment)

३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा आता होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत  विविध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून निवेदने  संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागास प्राप्त होत आहेत. तसेच उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेला निर्णय विचारात घेऊन आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार सरकारच्या वित्त विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.  नियमावली पुणे महापालिकेस लागू असल्याने ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तिवेतन निश्चित करणेकरीता खालीलप्रमाणे कार्यवाही करणेत यावी. असे परिपत्रकात म्हटले आहे. (Latest News on Notional Increment)

– अशी आहे नियमावली

1.  ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांने त्यास १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारातघेऊन सेवानिवृत्तिवेतन निश्चित करणेबाबत वैयक्तीक अर्ज शेवटचे वेतनाचे खात्याकडे सादर करणे आवश्यक राहील.एकत्रितपणे केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येऊ नये.
2. जे महापालिका कर्मचारी ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत आणि ज्यांनी मागील १२ महिन्यांची अर्हताकारीसेवा केलेली आहे, अशाच सेवानिवृत्त सेवकांना या योजनेचा लाभ देण्यात यावा. अर्हताकारी सेवा म्हणजे महाराष्ट्रनागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम ३० ते ५८ नुसार निवृत्तिवेतनासाठी विचारात घेतली जाणारीसेवा होय.
3. अर्ज प्राप्त झाल्यानंतर शासन परिपत्रकानुसार व मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या वर नमूद
आदेशात नमूद केलेप्रमाणे संबंधित सेवकाचे सेवानिवृत्तिविषयक लाभ अनुज्ञेय करावेत. सदर लाभ सुधारित करण्यातआल्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकाच्या मागील ३ वर्षांची थकबाकी अथवा त्यांच्या सेवानिवृत्तिचा दिनांकयापैकी जे कमी असेल तितकी थकबाकी देण्यात यावी.
4. उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करीत असलेल्या कोणत्याही सेवानिवृत्ताचा अर्ज फेटाळण्यातयेऊ नये.
5. सदर खात्याने संबंधित सेवानिवृत्त सेवकांची प्रकरणे माहे जुलै महिन्याची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय करून
खातेस्तरावर खात्री करून प्रकरण सेवानिवृत्त सेवकाच्या मूळ अर्जासह पेन्शन विभागामार्फत मुख्य लेखापरिक्षक
विभागाकडे मान्यतेस्तव सादर करणे आवश्यक राहील.
6. सदर लाभ देतेवेळी महापालिकेस येणे रकमा नसलेबाबत खात्री करावी. येणे रकमा असल्यास महाराष्ट्र नागरी सेवानियम (निवृत्तीवेतन), १९८२ मधील नियम १३२ नुसार प्रथमतः उपदानाच्या रकमेतून तसेच आवश्यकतेनुसार नियम१३४, १३४अ नुसार सुधारित निवृत्तिवेतनापोटी देय थकबाकीच्या रकमेतून समायोजित करावयाच्या आहेत.
7.  कार्यवाही करणेकरीता आवश्यक नवीन संगणक प्रणाली अथवा सध्याचे संगणक प्रणालीमध्ये दूरुस्तीमाहिती व तंत्रज्ञान विभागाकडून करणेत यावी.
Pmc circular

 Relief for retired employees of Pune Municipal Corporation!  |  104 pension cases cleared in January

Categories
PMC पुणे

 Relief for retired employees of Pune Municipal Corporation!  |  104 pension cases cleared in January

 PMC Pension |  It was pointed out that the pension cases of the retired employees of Pune Municipal Corporation (PMC) were pending on a large scale due to various reasons.  A campaign was undertaken to remove them. According to this, the pension cases are being settled. In the month of January, 104 pension cases have been settled from different departments. This information was given by Chief Labor Officer Nitin Kenjale. (Pune PMC News)
 Pension (PMC Retired Employees Pension) is given to the eligible retired servants of the Municipal Corporation.  Some retired servants die, yet do not get pension.  Because of this, the heirs of the servants have to suffer.  There were complaints about this.  Also nearly 1000 cases were pending.  Earlier, various departments were advised to settle the pending pension cases in time.  But the pension cases were still pending.  Complaints were being received that retired servants/ heirs of deceased servants were being inconvenienced as account heads, pay slips/pension clerks were not taking serious note of this.  The additional commissioner also warned of action against the head of account and Bill Clark.  Accordingly, all departments have started working.  (Pune Municipal Corporation)
 : Now 366 pension cases Pending
 Regarding this, Nitin Kenjale said that we have settled the pension issue.  A total of 417 cases were pending.  104 cases out of which have been resolved in the month of January.  As our staff was engaged in Maratha survey work, the work was slow.  Now there are 55 new cases.  Recently, orders have been given to settle the cases by holding a meeting with the Clark people.  Kenjale said that the education department is also working fast now.  The department had 91 cases pending which has reduced to 76 now.  Health department has 27 pension cases and water supply department has 31 pension cases pending.  Education, Water Supply, Fire Department as well as Aundh Regional Office, Bibwewadi Regional Office have settled the maximum number of cases.
 ——
 Recently had a review meeting with Bill Clark regarding the pending pension issue.  All the departments are getting response regarding the settlement of pension cases.  We focus on solving cases.  Some cases remain pending due to inheritance disputes and other technical reasons.  But that too will be dealt with.
 – Nitin Kenjale, Chief Labor Officer, PMC
 —-

PMC  Pension | पुणे महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना दिलासा ! |  जानेवारीत 104  पेन्शन प्रकरणे मार्गी

Categories
PMC social पुणे

PMC  Pension | पुणे महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना दिलासा ! |  जानेवारीत 104  पेन्शन प्रकरणे मार्गी

PMC  Pension |  पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) सेवानिवृत्त सेवकांची पेन्शन प्रकरणे (PMC Pension Cases) मोठ्या प्रमाणावर विविध कारणास्तव प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत होते. मात्र याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेत खाते प्रमुख आणि बील क्लार्क यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तसेच पेन्शन प्रकरणे निकाली काढण्यासाठी एक मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार पेन्शन प्रकरणे मार्गी लागत आहेत. जानेवारी महिन्यात 104 पेन्शन प्रकरणे वेगवेगळ्या खात्याकडून निकाली काढण्यात आली आहेत. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी  नितीन केंजळे यांनी दिली. (Pune PMC News)
महापालिकेच्या पात्र सेवानिवृत्त सेवकांना पेन्शन (PMC Retired Employees Pension) दिली जाते. काही सेवानिवृत्त सेवकांचा मृत्यू होतो, तरीही पेन्शन मिळत नाही. यामुळे सेवकांच्या वारसांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत तक्रारी येत होत्या. तसेच जवळपास 1000 प्रकरणे प्रलम्बित होती. प्रलंबित पेन्शन प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी यापूर्वी विविध विभागांना सुचित करण्यात आले होते. परंतु अद्यापी पेन्शन प्रकरणे प्रलंबित होती. याबबात खातेप्रमुख, पगारपत्रक / पेन्शन लेखनिक हे गांभिर्याने दखल घेत नसल्याने सेवानिवृत्त सेवकांची/ मयत सेवकांच्या वारसांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे खाते प्रमुख आणि बिल क्लार्क यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील अतिरिक्त आयुक्तांनी देखील दिला होता. त्यानुसार सर्व विभाग कामाला लागले आहेत. (Pune Municipal Corporation)
: आता 366 पेन्शन प्रकरणे शिल्लक 
याबाबत नितीन केंजळे यांनी सांगितले कि, आम्ही पेन्शन प्रकरणाचा निपटारा करत आणला आहे. एकूण 417 प्रकरणे प्रलंबित होती. त्यातील 104 प्रकरणे जानेवारी महिन्यात मार्गी लावली आहेत. मराठा सर्वेक्षण कामात आमचे कर्मचारी गुंतले असल्याने कामात वेग नव्हता. आता नवीन 55 प्रकरणे आली आहेत. याबाबत नुकतीच क्लार्क लोकांसोबत बैठक घेऊन प्रकरणे निकाली काढण्याबाबत आदेश दिले आहेत. केंजळे यांनी सांगितले कि, शिक्षण विभागाकडून देखील आता वेगाने काम होत आहे. विभागाकडे 91 प्रकरणे प्रलंबित होती ती कमी होऊन आता 76 राहिली आहेत. आरोग्य विभागाकडे 27 तर पाणीपुरवठा विभागाकडे 31 पेन्शन प्रकरणे प्रलंबित आहेत. शिक्षण, पाणीपुरवठा, अग्निशमन विभाग तसेच औंध क्षेत्रीय कार्यालय, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय यांनी सर्वात जास्त प्रकरणे निकाली काढली आहेत.
——
प्रलंबित पेन्शन प्रकरणाबाबत नुकतीच बील क्लार्क सोबत आढावा बैठक घेतली. पेन्शन प्रकरणे मार्गी लावण्याबाबत सर्व विभागांचा प्रतिसाद मिळतोय. प्रकरणे निकाली काढण्यावर आमचा भर आहे. काही प्रकरणे वारस वाद आणि इतर तांत्रिक कारणाने प्रलम्बित राहत आहेत. मात्र त्याचा देखील निपटारा केला जाईल.
नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी 
—-

PMC administration has announced regulations regarding Retired employees Notional increment 

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे

PMC administration has announced regulations regarding Retired employees Notional increment

 PMC Retired Employees Notional Increment |  A circular has been issued by the state government regarding determination of PMC Pension for the retired employees of Pune Municipal Corporation (PMC) on 30th June or about to retire taking into consideration the Notional Increment on the next 1st July.  The employees are going to get good benefits. Accordingly, this rule is applicable to the Pune Municipal Corporation. By implementing this, the municipal administration has declared a regulation to provide benefits to the employees. The proposal in this regard has been placed before the PMC Standing Committee. (PMC Retired)  Employees Notional Increment)
 The administrative department of the concerned Ministry receives representations from various retired employees regarding the determination of retirement pay for the employees who retired on June 30 or who are about to retire on July 1.  are  Also, the matter of issuing the order taking into account the judgment given by the High Court, Bench, Aurangabad, was under the consideration of the Government.  Accordingly, the finance department of the government has issued a circular in this regard.  (Latest News on Notional Increment)
 Retired employees, taking into account notional increase in pay as on 01 July, their service pension
 “The State Government employees who have retired on 30th June and who have applied to the respective offices for revision of the previous 12 months’ service, should be informed by the Administrative Departments of all the Ministries to the Heads of Departments in their respective offices. Also, after revision of the said benefits, they should submit their applications within 3 days of the date of application.  years of arrears or the date of their retirement whichever is less.”  As this is applicable to Pune Municipal Corporation, the following steps should be taken to determine the retirement pay of the employees who retired on June 30, taking into consideration the notional salary increase on July 1.  It is said in the proposal.
 – Such is the regulation
 1. Employees retiring/retiring on 30th June will be required to submit their individual application to the Department of Last Pay for determination of retirement pay taking into account notional increment on 1st July.  Applications made jointly should not be considered.
 2. Municipal employees who have retired on 30th June and who have completed last 12 months of qualifying service should be given the benefit of this scheme.  Qualifying service means service considered for pension under Rules 30 to 58 of the Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982.
 3. After receiving the application as per the Government Circular and Hon.  High Court, Bench Aurangabad mentioned above
 Retirement benefits of the servant concerned shall be admissible as mentioned in the order.  After revising the said benefit, the arrears of the previous 3 years from the date of application or the date of their retirement, whichever is less, should be paid.
 4. The application of any retiree who fulfills the guidelines laid down by the High Court should not be rejected.
 5. The said Department shall consider the cases of concerned retired servants by allowing notional pay increment for the month of July
 Account level verification of the case along with the original application of the retired servant through the Chief Auditor through the Pension Department
 It will be necessary to submit the approval form to the department.
 6. While giving the said benefit, it should be ensured that there is no amount coming to the Municipal Corporation.  If any, the amount is to be adjusted firstly from the amount of gratuity as per rule 132 of the Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982 and also from the arrears payable towards revised pension as per rule 134, 134A as required.
 7. Necessary new computer system or repair of existing computer system should be done by Information and Technology Department.

PMC Retired Employees Notional increment | 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तिवेतन निश्चित करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून नियमावली जाहीर! 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Retired Employees Notional increment | 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तिवेतन निश्चित करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून नियमावली जाहीर!

PMC Retired Employees Notional Increment | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या (Retired Employees) किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ (Notional Increment) विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन (PMC Pension) निश्चित करण्याबाबत राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. याचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. त्यानुसार पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) हा नियम लागू आहे. यावर अमल करून सेवकांना लाभ देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून नियमावली घोषित करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे.  (PMC Retired Employees Notional Increment)

३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा आता होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत  विविध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून निवेदने  संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागास प्राप्त होत होते. तसेच उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेला निर्णय विचारात घेऊन आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार सरकारच्या वित्त विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. (Latest News on Notional Increment)

 

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ०१ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन, त्यांचे सेवा निवृत्तिवेतन “जे राज्य शासकीय कर्मचारी ३० जून रोजी सेवनिवृत्त झाले आहेत व ज्यांनी मागील १२ महिन्यांची अहंताकारी सेवा सुधारित करण्यासाठी संबंधित कार्यालयांकडे अर्ज करण्याबाबत सर्व संबंधित सेवानिवृत्तांना आवाहन करण्याबाबत सर्वbमंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनिस्तकार्यालयातील विभागप्रमुखांना कळवावे. तसेच सदर लाभ सुधारित करण्यात आल्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकाच्या मागील ३ वर्षांची थकबाकी अथवा त्यांच्या सेवानिवृत्तिचा दिनांक यापैकी जे कमी असेल तितकी थकबाकी देण्यात यावी.” ही  पुणे महापालिकेस लागू असल्याने ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तिवेतन निश्चित करणेकरीता खालीलप्रमाणे कार्यवाही करणेत यावी. असे प्रस्तावात म्हटले आहे.
अशी आहे नियमावली 

1.  ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांने त्यास १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तिवेतन निश्चित करणेबाबत वैयक्तीक अर्ज शेवटचे वेतनाचे खात्याकडे सादर करणे आवश्यक राहील. एकत्रितपणे केलेल्या अर्जाचा विचार करण्यात येऊ नये.
2. जे महापालिका कर्मचारी ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत आणि ज्यांनी मागील १२ महिन्यांची अर्हताकारी सेवा केलेली आहे, अशाच सेवानिवृत्त सेवकांना या योजनेचा लाभ देण्यात यावा. अर्हताकारी सेवा म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम ३० ते ५८ नुसार निवृत्तिवेतनासाठी विचारात घेतली जाणारी सेवा होय.
3. अर्ज प्राप्त झाल्यानंतर शासन परिपत्रकानुसार व मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या वर नमूद आदेशात नमूद केलेप्रमाणे संबंधित सेवकाचे सेवानिवृत्तिविषयक लाभ अनुज्ञेय करावेत. सदर लाभ सुधारित करण्यात आल्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकाच्या मागील ३ वर्षांची थकबाकी अथवा त्यांच्या सेवानिवृत्तिचा दिनांक यापैकी जे कमी असेल तितकी थकबाकी देण्यात यावी.
4. उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करीत असलेल्या कोणत्याही सेवानिवृत्ताचा अर्ज फेटाळण्यात येऊ नये.
5. सदर खात्याने संबंधित सेवानिवृत्त सेवकांची प्रकरणे माहे जुलै महिन्याची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय करून खातेस्तरावर खात्री करून प्रकरण सेवानिवृत्त सेवकाच्या मूळ अर्जासह पेन्शन विभागामार्फत मुख्य लेखापरिक्षक
विभागाकडे मान्यतेस्तव सादर करणे आवश्यक राहील.
6. सदर लाभ देतेवेळी महापालिकेस येणे रकमा नसलेबाबत खात्री करावी. येणे रकमा असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम (निवृत्तीवेतन), १९८२ मधील नियम १३२ नुसार प्रथमतः उपदानाच्या रकमेतून तसेच आवश्यकतेनुसार नियम १३४, १३४अ नुसार सुधारित निवृत्तिवेतनापोटी देय थकबाकीच्या रकमेतून समायोजित करावयाच्या आहेत.

7.  कार्यवाही करणेकरीता आवश्यक नवीन संगणक प्रणाली अथवा सध्याचे संगणक प्रणालीमध्ये दूरुस्ती माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून करणेत यावी.

PMC Pension Cases | पेन्शन प्रकरण प्रलंबित ठेवणाऱ्या बिल क्लार्क ची आता खैर नाही! | अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचा आता बिल क्लार्क कडे मोर्चा

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pension Cases | पेन्शन प्रकरण प्रलंबित ठेवणाऱ्या बिल क्लार्क ची आता खैर नाही!

| अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचा आता बिल क्लार्क कडे मोर्चा

PMC Pension Cases | पुणे | महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांची (PMC Retired Employees) पेन्शन प्रकरणे (PMC Pension Cases) प्रलंबित राहत असल्याची बाब प्रशासनाने चांगलीच गंभीरपणे घेतली आहे. मागील आढावा बैठकी वेळी विभाग प्रमुखांना धारेवर धरल्यानंतर आता आता अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade IAS) यांनी आपला मोर्चा बिल क्लार्क (Bill Clerk) कडे वळवला आहे. प्रत्येक बिल क्लार्क कडे किती पेन्शनची प्रकरणे प्रलंबित आहेत, याची माहिती देण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहेत. त्यासाठी 26 डिसेंबर ची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता बिल क्लार्क ना कामचुकारपणा करता येणार नाही. (Pune Municipal Corporation)
पुणे महापालिकेतून दरवर्षी शेकडो कर्मचारी निवृत्त होतात. या कर्मचाऱ्यांना हक्काची पेन्शन असते. यावर ते आपला उदरनिर्वाह करू शकतात. मात्र पेन्शन प्रकरणे प्रलंबित राहिल्याने या कर्मचाऱ्यांना महापालिकेत वारंवार चकरा माराव्या लागतात. संबंधित विभागाचे विभाग प्रमुख आणि तिथला पगार लेखनिक अर्थात बिल क्लार्क देखील पेन्शन प्रकरणाची दखल घेत नव्हता. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रकरण तसेच पडून राहते. खासकरून बिल क्लार्क च्या उदासीनतेमुळे प्रकरण पडून राहते. याबाबत अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. अतिरिक्त आयुक्तांकडून आता दर महिन्याला पेन्शन प्रकरणाचा आढावा घेतला जातो. मागील वेळी अतिरिक्त आयुक्तांनी विभाग प्रमुखांना धारेवर धरले होते. तेव्हापासून प्रकरणे मार्गी लागण्याचा वेग वाढला होता. (PMC Pune News)
दरम्यान अतिरिक्त आयुक्तांनी सोमवारी प्रलम्बित प्रकरणाचा आढावा घेतला. यावेळी 10 पेक्षा जास्त प्रकरणे पप्रलंबित असणाऱ्या खात्यांच्या विभाग प्रमुखांना बोलावण्यात आले होते. यावेळी दिसून आले कि शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग अशा विभागाची जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत. अतिरिक्त आयुक्तांनी बैठकीत आदेश दिले कि प्रत्येक बिल क्लार्क कडे किती प्रकरणे प्रलंबित आहेत, त्याची माहिती सादर करावी. त्यासाठी 26 डिसेंबर चा कालावधी देण्यात आला आहे.

PMC Retired Employees | Pension | पुणे महानगरपालिकेच्या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक सेवकासाठी महत्वाची बातमी!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Retired Employees | Pension | पुणे महानगरपालिकेच्या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक  सेवकासाठी महत्वाची बातमी!

PMC Retired Employees | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) सर्व निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक (Retired Employees) यांना मुख्य लेखा व वित्त विभागाकडून (PMC Chief Account and Finance Department) आवाहन करण्यात आले आहे की, सर्व निवृत्तीवेतनधारकांनी तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी त्यांचे हयातीचे दाखल्यासह पुनर्नियुक्तीचे दाखले  १६-११-२०२३ ते. १५-१२-२०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत स्वतःचे निवृत्तीवेतन जमा होणाऱ्या बँकेमार्फत अथवा निवृत्तीवेतन विभाग, मुख्य लेखा व वित्त विभाग,  येथे समक्ष उपस्थित राहून सादर करावयाचे आहे. दाखले सादर केल्याशिवाय पेन्शन (Pension) दिली जाणार नाही. असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (PMC Pune)

याबाबत महापालिकेकडून जाहीर प्रकटन देण्यात आले आहे. त्यानुसार पुणे महापालिकेच्या सेवेमधून निवृत्त होणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम (निवृत्तीवेतन), १९८२ मधील तरतुदीनुसार निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन आदा करण्यात येते. महाराष्ट्र कोषागार  नियम, १९६८ मधील नियम क्र. ३३२ व ३३५ मध्ये निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी वर्षातून एकदा हयातीचे दाखले/ हयातीचे प्रमाणपत्र महापालिकेकडे सादर करणे अनिवार्य आहे. विहीत मुदतीत हयातीचे दाखले सादर न केल्यास त्यापुढील महिन्यांचे निवृत्तीवेतनाचे प्रदान हे हयातीचे दाखले सादर केल्यानंतरच केले गेले पाहिजे, असे स्पष्ट केले आहे. सबब महापालिकेच्या सर्व निवृत्तीवेतनधारकांनी तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी त्यांचे हयातीचे दाखल्यासह पुनर्नियुक्तीचे दाखले पुणे महापालिकेस सादर करणे आवश्यक आहे. सदरील कामकाजासाठी पुणे अर्बन सहकारी बँक, जनता सहकारी बँक, पुणे तसेच बँक ऑफ महाराष्ट्र यांना प्राधिकृत करण्यात आले  आहे. (PMC Pune News)

पुढे म्हटले आहे कि तरी पुणे महापालिकेच्या सर्व निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना आवाहन करण्यात येते की, सर्व निवृत्तीवेतनधारकांनी तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी त्यांचे हयातीचे दाखल्यासह पुनर्नियुक्तीचे दाखले  १६-११-२०२३ ते. १५-१२-२०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत स्वतःचे निवृत्तीवेतन जमा होणाऱ्या बँकेमार्फत अथवा निवृत्तीवेतन विभाग, मुख्य लेखा व वित्त विभाग, पुणे महानगरपालिका येथे समक्ष उपस्थित राहून सादर करावयाचे आहे. सदरील मुदतीत उपरोक्तप्रमाणे दाखले सादर न केल्यास त्यापुढील महिन्यांचे निवृत्तीवेतनाचे प्रदान हयातीचे दाखले सादर केल्यानंतरच करण्यात येईल. (Pune Municipal Corporation News)
——