PMC HRMS Pay Roll and Pension Software | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | मे महिन्यापासून 1 तारखेलाच मिळणार वेतन! 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC HRMS Pay Roll and Pension Software | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | मे महिन्यापासून 1 तारखेलाच मिळणार वेतन!

 | वेतन आणि पेन्शन मिळण्यात येणार गती | वेतन आणि पेन्शन साठी एकच प्रणाली

PMC Pay Roll and Pension Software – (The Karbhari News Service) –  महापालिका (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना वेतन (Pay roll) आणि पेन्शन (Pension) हे ऑनलाईन प्रणाली द्वारे दिले जाते. मात्र ही सिस्टम फार जुनी झाली आहे. त्यामुळे महापालिका आता नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्या माध्यमातून महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शन साठी रखडत बसावे लागणार नाही. याला आता गती मिळणार आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभाग (PMC Education Department) देखील आता यामध्ये जोडण्यात आला आहे. जानेवारी पासून याची सुरुवात करण्यात येणार होती. मात्र तांत्रिक कारणामुळे याची सुरुवात मे महिन्यापासून केली जाणार आहे.  अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Ravindra Binwade IAS) यांनी दिली. (PMC HRMS Pay Roll and Pension System) 

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शन देण्यासाठी 2013 साली वेतन प्रणाली बनवण्यात आली होती. मात्र ही प्रणाली जुनी झाली आहे. यामुळे काही अडचणी निर्माण होत आहेत. तसेच तत्कालीन शिक्षण मंडळाचा देखील महापालिकेत समावेश झाला आहे. याआधी महापालिका कर्मचारी आणि शिक्षण विभाग वेतनासाठी स्वतंत्र प्रणाली होती. यामध्ये कर्मचाऱ्यांना खूप करावे लागायचे. शिवाय वेतन देखील वेळेवर होत नसायचे. तसेच काही कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात तांत्रिक अडचणी आल्या तर सगळ्याच कर्मचाऱ्यांना वेतनासाठी थांबावे लागत आहे. मात्र आता नवीन प्रणाली मध्ये या सगळ्या अडचणी दूर करण्यात येणार आहेत. (Pune Municipal Corporation)
 pay roll आणि pension  दोन्ही एकाच प्रणालीत आणले जाणार आहे. यामुळे आता वेतनासाठी जी 10 तारखेची वाट पाहावी लागते. ती पाहावी लागणार नाही. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेलाच वेतन मिळेल. तसेच आज पेन्शनसाठी सेवानिवृत्त सेवकांना रखडावे लागते, ती अडचण देखील कमी होणार असून लवकरात लवकर पेन्शन हातात मिळण्यास मदत होणार आहे. जगताप यांनी सांगितले कि, हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी महापालिकेला बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) ने सीएसआर (CSR) अंतर्गत चांगली मदत केली आहे. या प्रणालीचा वापर करण्यास  प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली होती.

बिनवडे यांनी सांगितले कि,  सॉफ्टवेअरवर कार्यरत अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संपुर्ण माहिती, वेतनश्रेणी आणि त्यानुसार देण्यात येणारे भत्ते, सर्व्हिस बुकमधील माहिती अपलोड करण्यात आली आहे. तर पेन्शनरांची माहिती अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मागील तीन महिन्यांपासून प्रशासनाने हे सॉफ्टवेअर आणि जुन्या पद्धतीने पगार करण्यास प्रायोगीक तत्वावर सुरूवात केली. यामध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. या नव्या सॉफ्टवेअरचे सर्व पगार बिल क्लार्कला प्रशिक्षणही देण्यात आले आहे. एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्याचे वेतन मे मध्ये या सॉफ्टवेअरद्वारे करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती बिनवडे यांनी दिली.

बिनवडे यांनी सांगितले, की प्रत्येक कर्मचार्‍याला मोबाईलवरूनही त्याच्या पगारबिलाची तसेच सर्व्हिस बुकची माहिती घेण्याची सुविधा या सॉफ्टवेअरमध्ये आहे. यासाठी कर्मचार्‍याला आधार क्रमांक आणि कर्मचारी आयडी क्रमांकाच्या माध्यमांतून लॉग इन आयडी उपलब्ध करून दिला जाणार आहे. कर्मचार्‍यांना यापुढील काळात रजेचे अर्जही ऑनलाईनच सादर करावे लागणार आहेत. सर्व्हिस बुकमधील सद्यस्थिती देखिल या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रत्येक कर्मचार्‍याला समजू शकणार आहे.

सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍याला सहा महिने अगोदरच कोणती कागदपत्र सादर करायची, कोणत्या विभागाच्या एनओसी घ्यायच्या आहेत याची माहिती मिळणार आहे. त्यांना स्वत: पेन्शनची प्रकरणे ऑनलाईन सादर करावी लागणार आहेत. त्यामुळे पेन्शन प्रकरणांचा विलंब कमी होणार असून निवृत्तीनंतरच्या पुढील महिन्यांपासून पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मे नंतरही दोन महिने पुर्वीची पगाराची पद्धत समांतरपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती बिनवडे यांनी दिली.