PMC Vaccination | पुणे महानगरपालिकेच्या लस साठा साठविणेकरिता वॉक इन कुलर यंत्रणा कार्यरत 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे
Spread the love

PMC Vaccination | पुणे महानगरपालिकेच्या लस साठा साठविणेकरिता वॉक इन कुलर यंत्रणा कार्यरत

Pune – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ० ते ५ वयोगटातील मुलांची संख्या सुमारे ३ लाख इतकी असून त्यांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम अंतर्गत वयाच्या विविध टप्प्यावर वेगवेगळ्या लसी देण्यात येतात. जन्मता BCG, POLIO व HEPATITIS-B त्यानंतर ६,१०,१४ आठवडे पूर्ण केल्यानंतर PENTA, POLIO, ROTA, IPV, PCV त्यानंतर ९ महिने पूर्ण व १.५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर MR, VITAMIN – A,DPT- B इत्यादी लसी दिल्या जातात . बाळाचे ४.५ वर्ष पूर्ण झाल्यावर पुन्हा DPT व १०, १६ वर्षानंतर व गरोदर महिलांना TD या लसी देण्यात येतात.
 लसीच्या साठवणीसाठी मुख्य लसीकरण केंद्र नारायण पेठ येथे ५ आय एल आर उपलब्ध असून पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील ५४ दवाखाने व १९ प्रसूतिगृह यांना लसीचा पुरवठा करण्यात येतो.
आगामी काळात राज्य शासनामार्फत अॅडल्ट BCG, जापनीज इंसिफीलायटीस,MR लसीकरण यासारख्या मोहिमा नियोजित असल्याचे समजते याखेरीज विशेष इंद्रधनुष्य मोहीम, हज यात्रेकरूचे लसीकरण या सारख्या मोहिमा वेळोवेळी पार पाडाव्या लागतात.
 पुणे महानगरपालिकेत नवीन ३४ समाविष्ट गावांच्या अंतर्भावानंतर लसीकरणासाठी पुणे महानगरपालिकेच्या २९ नव्याने सुरु केलेल्या आरोग्य वर्धिनी केंद्रावर लाभार्थ्यांची गर्दी होताना दिसते. याकरिता पुणे महानगरपालिकेकडून ISO प्रमाणपत्र प्राप्त कंपनीकडून
२५,५०० लिटर्स क्षमतेचा वॉक इन कुलर बसविण्यात आला होता .
वॉक इन कुलरचा लस साठा करणेसाठी वापर करण्यापूर्वी शासनाच्या NCCRC येथील विशेषतज्ञाचे मार्गदर्शन घेवून व सदर वॉक इन कुलरच्या टेम्परेचर मपिंग सदर्भातील सर्व चाचण्या करून सातत्यपूर्ण टेम्परेचर मॅपिंग रेकॉर्डर व डिजिटल डिस्प्ले बसविण्यात आला उपकरणाला आवश्यक ते जनरेटर सेट व यु पी एस बॅकअप देण्यात आलेला आहे.
३ मार्च २०२४ रोजी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त  रविंद्र बिनवडे यांचे हस्ते सदर वॉक इन कुलर सुविधेचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी  राज्य शासनाकडील सहाय्यक संचालक आरोग्य सेवा तथा उप राज्य लसीकरण अधिकारी श्री डॉ. प्रवीण वेदपाठक, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मा श्री डॉ. भगवान पवार, उप आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रशांत बोठे,जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स मेडिकल ऑफिसर डॉ चेतन खाडे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ गोपाल उज्वणकर,वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश जगदाळे व डॉ. प्रदीप पवार, लसीकरण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.