Pune Drug Racket | Shivensena UBT | अमली पदार्थ व गुटख्याच्या विळख्यातून पुण्याला सोडवा | पुणे पोलिस आयुक्तांना शिवसेनेचे (UBT) निवेदन 

Categories
Breaking News Political social पुणे
Spread the love

Pune Drug Racket | Shivensena UBT | अमली पदार्थ व गुटख्याच्या विळख्यातून पुण्याला सोडवा | पुणे पोलिस आयुक्तांना शिवसेनेचे (UBT) निवेदन

 

Pune Drug Racket | Shivsena UBT | अमली पदार्थ व गुटख्याच्या (Pune Drug) विळख्यातून पुण्याला सोडवा, अशी मागणी शिवसेना पुणे (Shivsena Pune UBT) च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पुणे पोलिस आयुक्तांना (CP Pune) निवेदन देण्यात आले आहे.

शिवसेनेच्या निवेदनानुसार  पुणे शहर विद्येचे माहेर घर म्हणून परिचित आहे, त्यासोबत भारतातील महत्वाचे आय टी हब म्हणून ही बघितले जाते. या शहरात तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, या तरुण पिढीला ड्रग, गांजा , गुटखा , या सारख्या अमली पदार्थ सेवन करण्यासाठी पुणे शहरात सहज उपलब्ध होत आहे. हे मागील काही शहरातील घटनांमधून निदर्शनास आले आहे. पुणे पोलीसांनी ड्रग्ज व्यावसायिकाला पकडल्यामुळे खूप मोठ रॅकेट हाती लागले आहे. त्याची पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. जे कोणी छोटे मोठे उत्पादक, व्यावसायिक, हितसंबंधित व्यक्ति अथवा राजकीय वरदहस्त ठेवलेले नेते या रॅकेटमधे सहभागी असतील त्या प्रत्येकावर कारवाई करून त्याचा तपास निष्पक्षपातीपणे व्हावा. अशी मागणी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही करत आहोत . यामुळे पुणे शहर पोलिसांचा नावलौकिक जागतिक पातळीवर उंचावला जाईल.

तसेच अत्यंत महत्वाचे पुणे शहरात शाळा महाविद्यालयांच्या जवळ, वस्ती भागात अनेक पान टपऱ्यांमध्ये , दुकानांमध्ये तसेच काही व्यक्तींकडे आरोग्याला घातक गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत आणि सर्रास पणे विकल्या जात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा पुण्यात सहज उपलब्ध होऊन सर्रास पणे विकला जात आहे. आमच्या माहितीप्रमाणे रोज 20 कोटी रू चा गुटखा पुण्यात आणला जातो. बिनदिक्कतपणे त्याची विक्री होते आणि त्याचे सेवन केले जाते. कॅन्सरचे प्रमाण याच कारणाने दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस प्रशासनाचा यावर वचक असावा, असे आपणास सूचित करावयाचे आहे. सध्या तरी असे दिसते कि याचे मोठे उदाहरण ससून हाॅस्पिटल मधील ड्रग्ज रॅकेट हे आहे ,

यावेळी बोलताना संजय मोरे म्हणाले शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहरातील तरुणांच्या आरोग्य , शिक्षण विषयात गांभीर्याने लक्ष देत असून आपण तत्पर यावर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना सामान्य पुणेकरांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून सदर गुटखा भरलेल्या गाड्या अडवून संपूर्ण गुटख्याची होळी करून आम्ही जनआंदोलन घेण्यासही मागे पुढे पाहणार नाही .

यावेळी शिष्टमंडळात पुणे शहरप्रमुख संजय मोरे ,गजानन थरकुडे ,विधानसभाप्रमुख विशाल धनवडे, उत्तम भुजबळ, राजेश मोरे, अनंत घरत, मकरंद पेठकर उपस्थित होते.