Water issue : PMC : शहरातील पाणी समस्येवर पुणे महापालिकेने केला खुलासा

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love
शहरातील पाणी समस्येवर पुणे महापालिकेने केला खुलासा
पुणे : शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून पाण्याबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच पाण्यावरून शहराचे राजकारण देखील तापले आहे. त्यावर आता पुणे महापालिकेने आपली बाजू मांडत खुलासा केला आहे.
: असे आहे स्पष्टीकरण

पुणे शहरामध्ये काही भागांमध्ये एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्याने, त्यानंतर दोन दिवस पाण्याच्या मागणीमध्ये वाढ होऊन, सदर भागातील पाणी पुरवठयावर काही प्रमाणात परिणाम होतो व पारिपुरवठा पुर्ववत होण्यासाठी सुमारे तीन दिवसांचा कालावधी लागतो. काही भागांमध्ये स्थानिक अडचणींमुळे (उदा: पाण्याची लाईन लिकेज किंवा लाईन मध्ये अडथळा निर्माण होणे इ.) देखील पाणी पुरवठयाचा दाब कमी होणे, पाणी कमी वेळ मिळणे इ. तक्रारी उद्भवतात. तसेच काही सोसायटया किंवा इमारतींच्या नळजोडा मध्ये अडथळा निर्माण होऊन देखील त्यांचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. सद्यस्थितीत उन्हाळा सुरु झाल्यामुळे पाण्याची मागणी वाढून
पाण्याच्या प्रेशर मध्ये घट होत असल्याचे दिसून येते. पुणे महानगरपालिके मार्फत समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत पाणी पुरवठयाच्या नेटवर्कचे काम सन २०१८ मध्ये सुरु करण्यात आले आहे. सदर योजने अंतर्गत शहराचे (नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावां व्यतिरिक्त) १४१ विभाग (झोन) प्रस्तावित असून, ५३ विभागांमधील काम बहुतांश पूर्ण झालेले आहे. सदर योजनेचा कालावधी ५ वर्षांचा असून, सदर कामाचा वेग कोव्हिड १९ मुळे मंदावला होता. तथापि सद्यस्थितीत कामाचा वेग वाढविण्यात आला असून, सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

: नागरिकांना महापालिकेकडून आवाहन
वाढते तापमान व उपलब्ध पाणी साठा याचा विचार करता नागरीकांना आवाहन करण्यात येते की, नागरीकांनी पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा. गाडया धुणे, सोसायटयांमधील जिने, पार्किंग इ. धुणे, रस्त्यावर सडा टाकणे अशा स्वरुपाच्या कामांना पिण्याचे शुध्द केलेले पाणी वापरु नये.
: तक्रारीसाठी हेल्पलाईन नंबर
पाणीपुरवठयाबाबतची तक्रार नागरीकांनी फोन क्रमांक २५५०१३८३ या क्रमांकावर सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या दरम्यान नोंदवावी.

Leave a Reply