Pune Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar | पुणेकरांनो सावधान.. खतरे में संविधान.. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या अशा घोषणा देत  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा एल्गार

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र
Spread the love

Pune Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar | पुणेकरांनो सावधान.. खतरे में संविधान.. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या अशा घोषणा देत  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा एल्गार

Pune Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar |  निर्भय बनो (Nirbhay Bano Pune) चे कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Journalist Nikhil Wagle), ॲड. असीम सरोदे (Aseem Sarode), विश्वंभर चौधरी (Vishwanbhar Chaudhari) यांच्यावर त्यांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap Pune NCP) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या (Pune Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) वतीने बालगंधर्व चौक (Balghandhrav Chowk pune) येथे आंदोलन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, मोदी सरकार चले जाव, पुणेकरांनो सावधान खतरे में है संविधान अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
The karbhari You tube video | https://youtu.be/td-03m-uCeE
प्रशांत जगताप म्हणाले कि, सरकारी आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या गुंडांनी पुण्यात केलेला लोकशाहीचा खून सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितला. “हा हल्ला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे कार्यकर्ते सरसावले तेव्हा गुंडांनी महिला, युवती कार्यकर्त्यांची मर्यादा न पाळता सर्वांवरच हल्ला केला.
“माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारांनी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी समृद्ध अशा पुण्यभूमीत, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुणे शहरात काल हुकूमशाहीची दहशत सर्वांनीच अनुभवली. सत्तेत असलेल्या महायुतीच्या तीनही पक्षांच्या गुंडांकडून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. जगताप पुढे म्हणाले, आपल्या डोळ्यांसमोर पुरोगामी विचारांवर प्राण घातक हल्ला होतो हे पाहून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वयं स्फूर्तीने त्यांना सुरक्षा पुरवली. यानंतर महायुतीच्या गुंडांनी आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला, महिला भगिनींवर युवती कार्यकर्त्यांवर निर्लज्जपणे हात उभारला. या दडपशाहीला न घाबरता यापुढेही पुणे शहरात जिथे अन्याय दिसेल तिथे  पवार साहेबांच्या विचारांचा सच्चा कार्यकर्ता न्यायासाठी उभा असेल.” असे ही प्रशांत जगताप म्हणाले.
या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रवींद्र माळवदकर, डॉ.शशिकांत कदम, उदय महाले, मयूर गायकवाड, रूपालीताई शिंदे, भक्त्ति कुंभार, पायल चव्हाण, ऋतुजा देशमुख, ज्योतीताई सूर्यवंशी, नीताताई गलांडे,आसिफ शेख, सुवर्णाताई माने, जावेद शेख, मंगलताई पवार यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह पुरोगामी विचारांवर निष्ठा असणारे सामान्य पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.