Balasahebanchi Shivsena | कसबा पोटनिवडणूक | महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पूर्ण ताकद लावणार 

Categories
Breaking News Political पुणे
Spread the love

कसबा पोटनिवडणूक | महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पूर्ण ताकद लावणार

| शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांचे बैठकीत आश्वासन

पुणे | कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा अजेंडा हा हिंदुत्वाचा आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचा पक्ष पूर्ण ताकद लावणार आहे. असे आश्वासन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी महायुतीच्या बैठकीत दिले. तसेच निवडणुकीत आपण स्वतः उभे आहोत, असे समजून काम करा, असा सल्ला देखील त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. (city president Nana Bhangire)
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पाडली. निवडणुकीतील प्रचाराचे या बैठकीत नियोजन करण्यात आले. यावेळी आपले मत व्यक्त करताना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी पक्षाची पूर्ण ताकद लावणार असल्याचा निर्धार केला. यावेळी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, किरण साळी आदी नेते उपस्थित होते. (Balasahebanchi Shivsena)
भानगिरे पुढे म्हणाले, या निवडणुकीत आपण स्वतः उमेदवार आहोत, असे समजून सर्वांनी काम करायचे आहे. त्यासाठी कुठलाही मानपान न ठेवता आणि कुणाच्या मेसेजची वाट न पाहता उत्साहाने काम करायचे आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. आम्ही आमच्या स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. त्या माध्यमातून आम्ही तळागाळापर्यंत पोचतो आहोत. तसेच पदयात्रा, पत्रक वाटप अशी कामे करत घरोघरी पोचतो आहोत. पुढे ही जाणार आहोत. भानगिरे म्हणाले, कालच मुख्यमंत्र्यांनी मला प्रचाराच्या नियोजनाबाबत फोन करून मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पक्षाने ताकद लावून काम करायचे आहे. कारण आपला हिंदुत्वाचा अजेंडा आहे. त्यानुसार आम्ही काम करणार आहोत. कसबा मतदारसंघ हा गिरीश बापट, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा आहे. तो तसाच भाजपच्या हातात ठेवण्यासाठी आपल्या सर्वाना उत्साहाने काम करायचे आहे.
नाना भानगिरे पुढे म्हणाले, समन्वय ठेऊन आम्ही कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहोत. तसेच पीएमपी कर्मचाऱ्याच्या सातव्या वेतन आयोगासाठी आपण प्रयत्न केले होते. ते मतदार देखील आपल्याला सहकार्य करणार आहेत. अशा सर्वच घटकांशी आम्ही संपर्क ठेऊन आहोत. आमचे सर्वच कार्यकर्ते मन लावून आणि पूर्ण ताकदीने काम करतील, असा विश्वास यावेळी भानगिरे यांनी दिला. (Balasahebanchi Shivsena)