Shivaji Nagar to Hinjewadi Metro | शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार |मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार

|मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची व्यापक बैठक बोलावली जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले. तसेच शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पूर्तता प्राधान्याने केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

मंत्री केसरकर यांनी सांगितले की, शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची २३.३ किलोमीटर लांबी आहे. संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वानुसार हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. या कामास सुरुवात झाली असून प्रकल्प कालावधी ४० महिने आहे. या प्रकल्पातील एकात्मिक उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एकेरी मार्ग करणे, नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन करणे, सायकल ट्रॅक आणि फुटपाथ काढून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहेत.

पुणे मुंबई महामार्गावरील चांदणी चौकातील पुलाचे कामही लवकरच पूर्ण केले जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सदस्य भीमराव तापकीर यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

याबाबत सदस्य सिध्दार्थ शिरोळे, राहुल कुल, भीमराव तापकीर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Wadgaon Budruk : PMC : वडगाव बुद्रुक मधील प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही : स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने

Categories
PMC Political पुणे

वडगाव बुद्रुक मधील प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही

– स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिले आश्वासन

पुणे : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीच्या काळात पुणे महानगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्यास प्रथम प्राधान्य देत ५५० कोटी पेक्षा जास्त निधी खर्च केला आहे . त्यातूनही कितीही संकटे आली तरीही आवश्यक त्या सर्व विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून वडगाव बुद्रुक परिसरात सुरु असलेल्या सर्व प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही प्रभाग क्र. ३३ अ वडगाव बुद्रुक येथील सर्वे नं. ४१ आणि ४२ मधील डी .पी. रस्ते विकसित करणे या कामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आमदार भीमराव अण्णा तापकीर होते . आपल्या मनोगतात आमदार तापकीर म्हणाले की , नगरसेवक हरिदास चरवड अतिशय चांगले काम करीत आहेत , प्रचंड पाठपुरावा करून कामे मार्गी लावणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्ये आहे. भविष्यातही नागरिकांनी त्यांच्याबरोबर रहावे अशी विनंती त्यांनी केली .

नवनिर्वाचित पी. एम.आर.डी ए . सदस्य नगरसेवक हरिदास चरवड यांच्या निधीतून होत असलेल्या या कामासाठी दीड कोटी निधी खर्च करण्यात येणार आहे . यावेळी नगरसेविका नीता दांगट, राजश्री नवले , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव , शिवाजीआप्पा येवले, अनंतदादा दांगट, अप्पासाहेब पोळेकर, बाळासाहेब पोरे,सुरेश कोळेकर , ह .भ .प .रामदास चरवड, , शहाजी वांजळे, संजय पवळे , चंद्रकांत लोखंडे , लक्ष्मण खाडे , संदीप चरवड, कल्पेश ओसवाल, सिद्धेश पाटील, सचिन मणेरे, दत्तात्रय भरेकर, राजेंद्र गिरमे, अर्जुन शिंदे, भिवाजी वाकचौरे, पै. अनंता बनकर, अनंता भोईर, सचिन पोळेकर, सागर पोळेकर,गणेश टकले,लेले काका, बाळासाहेब कंगले , गुरुनाथ साळुंखे,राहुल खाटपे, नामदेव यादव,नवनाथ टाक,विठ्ठल खुटेकर,सुरज शेडगे ,शिवनारायण बंग, विजय खोल्लम,महेश वाघ,दत्तात्रय मारणे,हरिष घोलप, हेमंत अग्रवाल , गणपत शिंदे, रोहित पळशीकर, अमित देशमुख,विनोद डागा,सूर्यकांत साठे चंद्रकांत पवळे,केदारनाना जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते .