Annasaheb Waghire College | शिक्षकांची रिक्त पदे भरल्यानंतरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करा” | माजी कुलगुरू डॉ.आर. एस माळी यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

“शिक्षकांची रिक्त पदे भरल्यानंतरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करा”

| माजी कुलगुरू डॉ. आर. एस माळी यांचे प्रतिपादन

आज महाविद्यालये,विद्यापीठे यांची संख्या वाढली,पण गुणवत्ता वाढली का? याचा विचार नवीन शैक्षणिक धोरणात अग्रक्रमाने व्हावा. शिक्षकांची रिक्त पदे भरल्यानंतरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करा. कारण नवीन धोरण राबविताना शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ आर एस माळी यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर, ता-जुन्नर येथे दि.१० व ११ फेब्रुवारी २०२३.रोजी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 आणि त्याची अंमलबजावणी” या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रासाठी देशभरातील नामवंत शिक्षण तज्ञ,अभ्यासक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले .N.E.P वर ३०० विद्यार्थ्यांनी दोन दिवसात पोस्टर प्रेझेन्टेशन केले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ.एस.बी. वाळके,डॉ.एम.बी.खंदारे व प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ.वसंत गावडे यांनी दिली. या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन व बीजभाषण प्रमुख पाहुणे डॉ. विजय जोशी (ज्येष्ठ सल्लागार ,रुसा,महाराष्ट्र राज्य) यांनी केले. ते आपल्या बीज भाषणात म्हणाले,”आज आपल्याला नव्या व्यवस्थेची निर्मिती करावी लागेल. इंग्रजी म्हणजे ज्ञान हे अजिबात सत्य नाही.मातृभाषे विषयीचा आदर नवीन धोरणात आहे.व्होकेशनल ट्रेनिंगची आज गरज आहे. जीवन आणि शिक्षण हळूहळू दूर होत गेले. शिक्षणातून येथून पुढे पांढऱ्या कॉलरची फौज तयार होता कामा नये.आजची युवा पिढी प्रचंड स्पर्धेच्या दबावाखालीअसलेली आहे.म्हणून विद्यार्थ्यांना दिशादर्शक शिक्षण देणे गरजेचे आहे.आज आपल्याला कौशल्यप्राप्त मनुष्यबळ निर्माण करावयाचे आहे. चळवळीच्या अग्रभागी मध्यमवर्ग असतो. मध्यमवर्गाला आत्ममग्न परिस्थितीतून बाहेर यावे लागणार आहे.” सदर चर्चासत्रा दरम्यान डॉ. गोपाल गौर बनिक(आसाम)यांनी आपले विचार मांडले.

दुसऱ्या दिवसाच्या सत्रात डॉ.आर. एस.माळी(माजी कुलगुरू,बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव.) म्हणाले,”आज महाविद्यालये,विद्यापीठे यांची संख्या वाढली,पण गुणवत्ता वाढली का?याचा विचार नवीन शैक्षणिक धोरणात अग्रक्रमाने व्हावा. शिक्षकांची रिक्त पदे भरल्यानंतरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करा. कारण नवीन धोरण राबविताना शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे.”डॉ.पंडित विद्यासागर(माजी कुलगुरू,स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड) म्हणाले,”पदवी मिळविल्यानंतर विद्यार्थी जीवन जगण्यास सक्षम व्हावा.गुणवत्ता वाढविण्यासाठी कौशल्य व व्यावसायिक शिक्षण गरजेचे. विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य मिळणार.या सर्वांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल.” डॉ.डी डी.पाटील,डॉ.दीपक माने, डॉ.प्रवीण सप्तर्षी, प्रोफेसर विनय रावळे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.के.डी.सोनवणे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.अमृत बनसोड,भारतातील विविध राज्यांतील अनेक संशोधक,प्राध्यापक,विद्यार्थी, महाविद्यालयाचे कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.एस.एफ. ढाकणे यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.अमोल बिबे यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ.व्ही.एम. शिंदे यांनी मानले.