PMC Ward 2 CCTV | सुरक्षेबाबत नागरिकच सजग असणे कौतुकास्पद : पोलिस निरीक्षक संतोष पाटील

Categories
Political social पुणे

PMC Ward 2 CCTV | सुरक्षेबाबत नागरिकच सजग असणे कौतुकास्पद : पोलिस निरीक्षक संतोष पाटील

– प्रभाग क्रमांक २ मध्ये कालवश उद्धवराव शिवाजी वावरे पदपथ नामफलक आणि सीसीटीव्हीचे उद्घाटन

– माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

 

PMC Ward 2 CCTV | प्रभागात सुरक्षा रहावी यासाठी पोलिस यंत्रणा काम करतच आहे. प्रभागातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावले जात आहेत. मात्र नागरिकांनी देखील स्वतः पुढाकार घेऊन सीसीटीव्ही बसविण्याचा घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. नागरिकांनी सुरक्षेसाठी सजग राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी केले.

पुणे महापालिका प्रभाग क्रमांक दोन नागपूर चाळ येथील पदपथाचे कालवश उद्धवराव शिवाजी वावरे नामकरण तसेच सीसीटीव्हीचे उद्घाटन डॉ. बी. एस. पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरिक्षक पाटील बोलत होते.

या वेळी कालवश उध्दव वावरे यांचे चिरंजीव प्रशांत वावरे, अशोक कांबळे, नामदेव घाटगे, मंगेश गोळे, ऍड. भगवान जाधव, सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते, जागृती तरुण मंडळ, मौलाना आझाद रिक्षा स्टँड, व्यापारी, पथारी व्यावसायिक, सुजाता महिला मंडळ, तक्षशिला बुद्धविहार, धम्मज्योती बुद्धविहार, त्रिरत्न बुद्धविहार, हिंदू जागृती मंचचे पदाधिकारी, प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

the karbhari - dr siddharth dhende

डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, रस्त्याचे नामकरण होण्यासाठी महापालिकेत मी ठराव मांडला होता. तो मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले होते. यासाठी प्रभागातील इतर तीन नगरसेवकांकडून या प्रस्तावासाठी पाठिंबा मिळविला. या प्रस्तावाला महापालिका स्तरावर मंजुरी मिळाली. त्याचे नामकरण झाल्यानंतर आज त्याच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले याचा आनंद आहे. कालवश उद्धव वावरे हे पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व नागपूर चाळ प्रभागाचे लोकप्रतिनिधी होते. १९८७ आणि १९९३ अशा दोन वेळेस ते निवडून आले होते. आरपीआय पक्षाच्या राज्याच्या प्रमुख पदावर ते कार्यरत होते. त्यांचे प्रभागाचे योगदान पाहता त्यांचे स्मरण म्हणून हा नामफलक उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला. प्रभागातील जागृती तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची संकल्पना मांडली होती.

PMC Ward no 2 | Dr Siddharth Dhende |  यश फाउंडेशन आणि मनोदय व्यसनमुक्ती संस्थेतर्फे युवकांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन | प्रभाग दोन मध्ये डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा उपक्रम

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Ward no 2 | Dr Siddharth Dhende |  यश फाउंडेशन आणि मनोदय व्यसनमुक्ती संस्थेतर्फे युवकांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

| प्रभाग दोन मध्ये डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा उपक्रम

 

PMC Ward no 2 |Dr Siddharth Dhende | संगणक साक्षरतेतून (Computer Literacy) रोजगार निर्मिती होऊन आर्थिक सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende Pune)  यांनी पुढाकार घेतला आहे. प्रभाग दोन (PMC Ward 2) मध्ये युवकांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र (Free Computer Teaching Center) सुरू करण्यात आले आहे. यश फाउंडेशन आणि मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचा परिसरातील युवकांना फायदा होणार आहे.

प्रभाग दोन मधील नागपूर चाळ येथील यश फाउंडेशनच्या कालवश नटराज गंगावणे समाज मंदिर येथे या केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला होप फाउंडेशनचे नितीन पोळ, वेद कॉम्प्युटर ऍकॅडमीच्या सीमा बैस, एम्पॉवर चॅरिटेबल ट्रस्टचे विनय दवे, प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ व मनोदय संस्थेचे पदाधिकारी तसेच त्या भागातील नागरिक, युवक उपस्थित होते.

तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात न अडकता स्वतःचे शारीरिक आणि मानसिक विकासाबरोबरच कौशल्य विकसित करावे असे मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने डॉ. विष्णू श्रीमंगले यांनी भूमिका मांडली.

पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी तरुण पिढी व्यसनी होऊ नये यासाठी मार्गदर्शन केले. तरुणांना संगणक ज्ञान देवून सक्षम देखील केले जाते जे अनेक पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन केले.
——————————–
: शासकीय योजना राबविण्यासाठी डॉ. धेंडे यांचा पुढाकार

माजी उपमहापौर डाॅ. धेंडे यांच्या माध्यमातून प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून यश फाउंडेशन व महापालिका समाज विकास विभागाच्या माध्यमातुन मोफत संगणकीय प्रशिक्षनाला सुरुवात करण्यात आली आहे. या पूर्वी कोरोनानंतर २५० निराधार कुटुंब यांना रे (RAY) संस्थेच्या वतीने दरमहा १० किलो मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे. तरुण मुलांना जिम, कराटेची सुविधा देण्यात आली. मनपा व शासनाच्या सर्व योजना (आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, शहरी गरिब कार्ड व ईतर ) सर्व आवश्यक कागदपत्र याची सुविधा देण्याचे काम देखील नागपूर चाळ येथील कालवश नटराज गंगावणे समाज मंदीर येथे चालु आहे.
———————————-

यश फाउंडेशनच्या माध्यमातून युवक आणि नागरिक यांच्यासाठी जे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. युवकांच्या विकासाच्या मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने समुपदेशन, जाणीव जागृती बरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काम केले जात आहे. त्यात भर घालून एचपी साऊंड सोलुशन यांच्या मार्फत संगणक डेस्कटॉप उपलब्ध करून दिला आहे. यापुढील काळात तरुण पिढीला मोफत बेसिक आणि प्रगत संगणक ज्ञान उपलब्ध करून कौशल्य विकसित करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला जात आहे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका