eFile | PMC Pune | महापालिकेच्या सर्व खात्यांना  ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणालीची अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

eFile | PMC Pune | महापालिकेच्या सर्व खात्यांना  ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणालीची अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांचे आदेश

eFile | PMC Pune | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) सर्व खात्यांना  ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणालीची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांनी सर्व खात्यांना दिले आहेत. (PMC Pune News)
महाराष्ट्र राज्य शासनाच्या शासकीय कामकाजात संगणकाचा  अधिकाधिक वापर करून शासकीय कामकाज गतिमान व्हावे, कामकाजात सुसूत्रता यावी, दस्तऐवज सुरक्षित व माहिती त्वरेने व जलद गतीने प्राप्त होऊन निर्णय प्रक्रीया सुलभ व्हावी यासाठी सर्व शासकीय विभागामध्ये शासकीय कामकाजात ई- ऑफीस प्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. महापालिकेत ई-ऑफिस संगणकप्रणाली अंमलबजावणी करणेकरिता मास्टर ट्रेनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित मास्टर ट्रेनर यांचेमार्फत सर्व विभागांकडील नोडल ऑफिसर यांना संगणकप्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)

त्यानुसार सर्व  विभागाकडे संगणकप्रणाली अंमलबजावणी करणेकरिता प्रत्येक विभागाकडील संबंधित अधिकाऱ्यांची यादी निश्चित करण्यात यावी व त्यानुसार संगणक प्रणाली  वापराकरिता आवश्यक युजर बनविणेसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागातील मास्टर ट्रेनर यांचेशी संपर्क करण्यात यावा. तसेच प्रत्येक  विभागाकडील नियुक्त करण्यात आलेले नोडल ऑफिसर यांचेमार्फत ई-ऑफिस मंगणकप्रणाली अंमलबजावणी करणेकरिता नियुक्त मास्टर ट्रेनर यांचेशी संपर्क साधून प्रत्येक विभागाकडील कार्यवाही करण्यात यावी. त्यानुसार सर्व खात्यांमध्ये ई-ऑफिस संगणकप्रणाली अंमलबजावणी करणेचे कामकाज त्वरित सुरु करावे. असे आदेश विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत. (PMC Pune)

eFile : PMC : पुणे महानगरपालिकेमध्ये आता ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणाली

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महानगरपालिकेमध्ये आता ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणाली

पुणे : महापालिकेचे कामकाज अधिक कार्यक्षम, प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी पुणे महानगरपालिकेमध्ये सर्व खात्यांमध्ये आता ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व खात्याकडून माहिती मागवण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत.

: 5 दिवसांत माहिती पाठवा : अतिरिक्त आयुक्त

महाराष्ट्र शासनाकडील ई-ऑफिस हा प्रकल्प ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत आहे. प्रशासकीय कामकाजाचे दृष्टीकोनातून ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणालीचा वापर करणे आवश्यक आहे. तदनुषंगाने, पुणे महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र शासनाकडील ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणाली अंमलबजावणी करणेचे प्रयोजन आहे. ई-ऑफिस (eFile) अंमलबजावणीचा उद्देश व उद्दिष्ट, हे शासकीय कामकाज अधिक कार्यक्षम, प्रभावी आणि पारदर्शक करणे हे आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये सर्व खात्यांमध्ये ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तरी, पुणे महानगरपालिकेतील सर्व विभागांनी ई-ऑफिस (eFile) संगणकप्रणाली अंमलबजावणीकरिता आवश्यक असलेली सर्व माहिती हि माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे ५ दिवसाच्या आत पाठविण्यात यावी. असे अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. या माहितीमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांची सगळी माहिती तसेच कार्यालयामध्ये असणारे संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, स्कॅनर आदींची देखील माहिती मागवण्यात आली आहे.