Ring Road Pune | रिंगरोड साठी 47 हेक्टर वनजमीनीची आवश्यकता | ऑनलाईन प्रस्ताव वन विभागाकडे सादर

Categories
Breaking News social पुणे

Ring Road Pune | रिंगरोड साठी 47 हेक्टर वनजमीनीची आवश्यकता |  ऑनलाईन प्रस्ताव वन विभागाकडे सादर

Ring Road Pune | 65 मी. रुंदीच्या संपुर्ण 88.08 कि.मी. च्या रिंग रोडसाठी (Ring Road) आवश्यक 46.83 हेक्टर वनजमीन संपादनाचा (Forest Land acquisition) प्रस्ताव वनविभागाच्या (Forest department) परिवेष या पोर्टलवर (Pariwesh portal)  रोजी अपलोड करण्यात आला आहे. तसेच हा प्रस्ताव उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग पुणे यांचेकडे देखील सादर करण्यात आला आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप (Deputy Collector Ramdas Jagtap) यांनी दिली. (Ring Road Pune)
जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे महानगर प्राधिकरण (PMRDA) हद्दीतील 110 मी. रुंद रिंगरोडच्या (Ring Road) 128.08 कि.मी. लांबीपैकी मौजे परंदवाडी ता. मावळ ते मौजे सोळू ता.खेड ही 40 कि.मी. लांबीचा रिंगरोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास (MSDC) विकसनासाठी हस्तांतर करण्यात आला आहे. प्राधिकरणाकडील उर्वरित लांबीसाठी रस्त्याची रुंदी 65 मी. करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. त्यांस अनुसरुन महाराष्ट्र शासनाची नगररचना अधिनियमानुसार कलम 20(3) ची अधिसुचना 18/11/2021 रोजी प्रसिद्ध झाली असुन पुढील कार्यवाही नगर रचना विभाग पुणे मार्फत सुरु आहे. त्याप्रमाणे प्राधिकरणाच्या ऑगस्ट 2021 मधील प्रसिद्ध प्रारुप विकास आराखड्यात प्राधिकरणाकडील रिंगरोडची रुंदी 65 मीटर दर्शविण्यात आली आहे.
65 मीटर रुंद रिंगरोड प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल व भूसंपादन प्रस्ताव सल्लागारामार्फत  तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पहिल्या टप्प्यासाठी मौजे सोलू, निरगुडी व वडगांव शिंदे या तीन गावांचे भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आले आहेत. तथापि 65 मी. रुंदीच्या संपुर्ण 88.08 कि.मी. चा रिंग रोडसाठी आवश्यक 46.8363 हेक्टर वनजमीन संपादनाचा प्रस्ताव वनविभागाच्या परिवेष या पोर्टलवर 31/05/2023 रोजी अपलोड करण्यात आला असून प्रस्ताव उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग पुणे यांचेकडे 02/06/2023 रोजी सादर करण्यात आला. असेही जगताप यांनी सांगितले.
—-
संपादित करावयाच्या सुमारे ४७ हेक्टर वनजमिनीसाठी पर्यायी वनेतर क्षेत्र देणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास विनंती करण्यात आली असुन पर्यायी जागेचा तपशील उपलब्ध झालेवर वनविभागासाठी चर्चा करुन पर्यायी जागा देण्यात येईल.
रामदास जगताप, उप जिल्हाधिकारी तथा जन संपर्क अधिकारी, PMRDA
—-
News title | Ring Road Pune |  47 hectares of forest land is required for ring road  Online proposal submitted to Forest Department

Leopard : Hadapsar : हडपसर मधील बिबट्या अखेर जेरबंद 

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

हडपसर मधील बिबट्या अखेर जेरबंद

: वन खाते आणि एका NGO च्या प्रयत्नांना यश

पुणे : गेल्या काही दिवसांपासून फुरसुंगी, हडपसर, भेकराईनगर परिसरात दर्शन देणारा बिबट्या मंगळवारी साडेसतरा नळी परिसरात भर वस्तीत शिरला असून त्याने मॉर्निग वॉकला जात असलेल्या तरुणावर हल्ला करुन जखमी केले होते. या घटनेमुळे हडपसर  परिसरातील साडेसतरा नळी, भोसले वस्ती, गोसावी वस्ती या भागात दहशत निर्माण झाली होती. दरम्यान त्याचा शोध सुरु होता मात्र तो मंगळवारी कुणालाही दिसला नव्हता.  त्यानंतर रात्री  वन खाते आणि एका NGO ने मिळून त्याला पकडले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.