Hadapsar | Market | हडपसर मधील भाजी मंडई पूर्ववत होणार! | नागरिक आणि गाळेधारकांना दिलासा

Categories
Breaking News PMC social पुणे

हडपसर मधील भाजी मंडई पूर्ववत होणार!

| नागरिक आणि गाळेधारकांना दिलासा

पुणे | हडपसर मधील चिंतामणी नगरच्या (Cihintanani Nagar, Hadapsar) भाजी मंडई ला (vegetable market) शॉर्ट सर्किट मुळे आग लागली होती. त्यामुळे इथल्या  गाळेधारकांचे खूप नुकसान झाले होते. तेव्हापासून भाजी मंडई बंद आहे. मात्र आता लवकरच मंडई पूर्ववत होणार आहे. त्यासाठीची टेंडर प्रक्रिया (tender process) लवकरच सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Deputy commissioner Madhav jagtap) यांनी दिली.

– 84 लाखाचा खर्च

हडपसर येथील ओटा मार्केटला दि.२१/२/२०२३ रोजी शॉर्टसर्किटमुळे आग लागून मार्केटचे व व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 90 दुकाने यामध्ये जळाली होती. सद्यस्थितीमध्ये मार्कट बंद आहे. त्याभागातील नागरिकांचे गैरसोय होत असल्याने तेथील स्थानिक आमदार चेतन तुपे व माजी सभासद  नाना भानगिरे यांनी उपरोक्त ठिकाणी भेट देऊन ओटा मार्केटचे कामकाज प्रशासनामार्फत त्वरित करणेबाबत सुचविले होते. त्यानुसार अतिक्रमण विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. (PMC Pune)
या कामासाठी 84 लाख 30 हजाराचा खर्च अपेक्षित आहे. सुरुवातीला हे काम महानगरपालिका अधिनियमातील कलम ६७ (३)(क)नुसार करून घेण्याबाबत वित्तीय समिती समोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी हे काम शॉर्ट टेंडर प्रक्रिया करून घेण्याचे आदेश खात्याला दिले. दरम्यान मार्च एन्ड ला हे काम खात्याकडून होऊ शकले नाही. तसेच नवीन बजेट मध्ये यासाठी खात्याला निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे भवन रचना विभागाकडील निधीचे लॉकिंग करून लवकरच टेंडर प्रक्रिया सुरु करणार असल्याचे माधव जगताप यांनी सांगितले. यामुळे येथील गाळेधारक आणि नागरिकाना दिलासा मिळणार आहे. (Pune Municipal Corporation)

Leopard : Hadapsar : हडपसर मधील बिबट्या अखेर जेरबंद 

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

हडपसर मधील बिबट्या अखेर जेरबंद

: वन खाते आणि एका NGO च्या प्रयत्नांना यश

पुणे : गेल्या काही दिवसांपासून फुरसुंगी, हडपसर, भेकराईनगर परिसरात दर्शन देणारा बिबट्या मंगळवारी साडेसतरा नळी परिसरात भर वस्तीत शिरला असून त्याने मॉर्निग वॉकला जात असलेल्या तरुणावर हल्ला करुन जखमी केले होते. या घटनेमुळे हडपसर  परिसरातील साडेसतरा नळी, भोसले वस्ती, गोसावी वस्ती या भागात दहशत निर्माण झाली होती. दरम्यान त्याचा शोध सुरु होता मात्र तो मंगळवारी कुणालाही दिसला नव्हता.  त्यानंतर रात्री  वन खाते आणि एका NGO ने मिळून त्याला पकडले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.