Pune Helmet Day News | सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना उद्या हेल्मेट वापरणे बंधनकारक | जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

Categories
Breaking News social पुणे

Pune Helmet Day News | सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना उद्या हेल्मेट वापरणे बंधनकारक | जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Pune Helmet Day News | पुणे शहर आणि जिल्ह्यातील (Pune city and Pune district) सर्व शासकीय कार्यालयात (Government offices) दुचाकीवर येणारे शासकीय अधिकारी/कर्मचारी (Employees using Two wheeler) हे नियमितपणे हेल्मेटचा (Helmet) वापर करीत असले तरी, हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी दिनांक २४.०५.२०२३ रोजी लाक्षणीक हेल्मेट दिवस (Symbolic Helmet Day) साजरा करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांतील जे शासकीय अधिकारी / कर्मचारी दुचाकीवरून कार्यालयात येतात. अशा सर्व अधिकारी कर्मचारी यांनी २४.०५.२०२३ रोजी म्हणजे उद्या हेल्मेट परिधान करावे. हेल्मेट घातले नसल्यास कारवाई केली जाईल. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख (Collector Dr Rajesh Deshmukh) यांनी जारी केले आहेत. (Pune Helmet Day News)

जागतिक स्तरावर यावर्षीही दिनांक १५.०५.२०२३ ते २१.०५.२०२३ या कालावधीत Sustainable Transport या विषयासंदर्भात 7 UN Global Road Safety Week 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. भारतात दररोज सुमारे ४११ भारतीयांचा रस्ते अपघातांमध्ये बळी जातो. आपल्यापैकी बहुतांश जण या घटना नेहमीचीच गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतो. बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबांसाठी हा एक मोठा मानसिक व आर्थिक धक्का असतो. यासाठी जागतिक स्तरावर यावर्षीही दिनांक १५.०५.२०२३ ते २१.०५.२०२३ या कालावधीत Sustainable Transport या विषयासंदर्भात 7 UN Global Road Safety Week 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातांप्रती स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसारमाध्यमे तसेच सामान्य नागरिकांचे लक्ष वेधणे व रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे हा या सप्ताहाचा हेतू आहे. केवळ जागरूकता वाढवणे हाच नव्हे तर रस्ते अपघातातील जखमींना वेळेत व योग्य उपचार व मदत मिळवून देणे हेही यात अंतर्भूत आहे. (Pune Helmet Day Marathi News)

वाहन अपघातात दगावणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे ८० टक्के व्यक्ती या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता ८० टक्क्याने वाढते. (Pune News)
मोटार वाहन कायद्यानुसार ४ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करतांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. सबब याद्वारे पुणे जिल्ह्यातील फक्त सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सुचित करण्यात येते की, शासकीय नियमांचे पालन करणे हे शासकीय अधिकारी यांचे आद्यकर्तव्य आहे. जनतेस मार्गदर्शक ठरावे यादृष्टीने तसेच स्वतःच्या व सहप्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी कार्यालयात येताना-जाताना अथवा कोणत्याही अन्य कामासाठी दुचाकी वाहन वापरतांना हेल्मेट
वापरणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर आपल्या शासकीय कार्यालयात दुचाकीवर येणारे शासकीय अधिकारी/कर्मचारी हे नियमितपणे हेल्मेटचा वापर करीत असले तरी, हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी दिनांक २४.०५.२०२३ रोजी लाक्षणीक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी पुणे जिल्ह्यातील फक्त सर्व शासकीय आस्थापनांना आदेशीत करण्यात येते की, जे शासकीय अधिकारी / कर्मचारी दुचाकीवरून कार्यालयात येतात अशा सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दिनांक २४.०५.२०२३ रोजी हेल्मेट परिधान करावे. तसेच सदर बाबत सर्व कार्यालयप्रमुखांनी आपल्या कार्यालयामध्ये दुचाकीवरुन येणारे सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी हेल्मेट परिधान करतील याबाबतच्या सुचना आपल्या स्तरावरुन पारित कराव्यात. दुचाकी वापरतांना हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधीत अधिकारी/कर्मचारी/नागरीक हे मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहतील. असे आदेशात म्हटले आहे. (Pune collector Dr Rajesh Deshmukh)

—-
News Title | Pune Helmet Day News | It is mandatory for all government employees to wear helmet tomorrow Orders of Collector

Rent basis : ताब्यात घेतलेल्या जागा महापालिका सरकारी कार्यालयांना भाडे तत्वावर देणार  : मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाचा निर्णय 

Categories
Breaking News PMC पुणे

ताब्यात घेतलेल्या जागा महापालिका सरकारी कार्यालयांना भाडे तत्वावर देणार

: मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाचा निर्णय

पुणे : महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाच्या वतीने शहरातील व्यवसायिकांना भाडे तत्वावर मिळकती दिल्या जातात. मात्र व्यावसायिकांकडून नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. त्यामुळे महापालिकेने अशा लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच थकबाकी न भरणाऱ्याकडून मिळकत ताब्यात घेतली जात आहे. अशा ताब्यात घेतलेल्या मिळकती आता सरकारी कार्यालयांना भाडे तत्वावर चालवण्यास देण्यात येणार आहेत. त्यानुसार महापालिकेने प्रक्रिया सुरु केली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

: जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु

महापालिका प्रशासनाकडून शहरात अतिक्रमण कारवाई जोरदार पणे सुरु आहे. सोबतच आता मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाकडून देखील कारवाई करण्यात येत आहे. विभागाकडून नियमांचे पालन न करणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे. विभागाने महापालिका मिळकत वाटप नियमावली नुसार जागा आणि गाळे भाडे तत्वावर दिले आहेत. मात्र याचे नाममात्र भाडे असताना देखील संबंधित गाळे धारक महापालिकेचे शुल्क अदा करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे विभागाकडून या लोकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. तरीही या लोकांनी थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार बऱ्याच जागा ताब्यात देखील घेण्यात आल्या आहेत. आता या जागा सरकारी कार्यालयांना चालवण्यास देण्यात येणार आहेत. त्यानुसार महापालिकेने पत्रव्यवहार देखील सुरु केला आहे.

: अडीच कोटी पेक्षा अधिक वसुली

मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून वसुली देखील करण्यात येत आहे. वसूली न देणाऱ्या व्यावसायिकाकडून जागा ताब्यात घेतली जात आहे. मागील आठवड्यात जवळपास अडीच कोटी पेक्षा अधिक वसुली करण्यात आली आहे. यामध्ये आयसीसी टॉवर कडून 1 कोटी 85 लाख, पीएमआरडीए कडून 12 लाख 89 हजार, पाषाण तलाव 5 लाख 65 हजार 500, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी 15 लाख 50 हजार आणि श्री गणेश इंटरप्रायजेस (सीएनजी पंप) 39 लाख एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे. अशी माहिती मालमत्ता व व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली.