Tag: pune symbolic helmet day
Pune Helmet Day | PMC Pune | पुणे महापालिकेच्या 250 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हेल्मेट न घातल्याने कारवाई | उद्याही कारवाई मात्र ती तीव्र असणार!
पुणे शहर आणि जिल्ह्यातील (Pune city and Pune district) सर्व शासकीय कार्यालयात (Government offices) दुचाकीवर येणारे शासकीय अधिकारी/कर्मचारी (Employees using Two wheeler) हे नियमितपणे हेल्मेटचा (Helmet) वापर करीत असले तरी, हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी दिनांक २४.०५.२०२३ रोजी लाक्षणीक हेल्मेट दिवस (Symbolic Helmet Day) साजरा करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांतील जे शासकीय अधिकारी / कर्मचारी दुचाकीवरून कार्यालयात येतात. अशा सर्व अधिकारी कर्मचारी यांनी २४.०५.२०२३ रोजी म्हणजे उद्या हेल्मेट परिधान करावे. हेल्मेट घातले नसल्यास कारवाई केली जाईल. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख (Collector Dr Rajesh Deshmukh) यांनी जारी केले होते. (Pune municipal corporation news)
Pune Helmet Day News | It is mandatory for all government employees to wear helmet tomorrow | Orders of Pune Collectors
Pune Helmet Day News | सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना उद्या हेल्मेट वापरणे बंधनकारक | जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जागतिक स्तरावर यावर्षीही दिनांक १५.०५.२०२३ ते २१.०५.२०२३ या कालावधीत Sustainable Transport या विषयासंदर्भात 7 UN Global Road Safety Week 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. भारतात दररोज सुमारे ४११ भारतीयांचा रस्ते अपघातांमध्ये बळी जातो. आपल्यापैकी बहुतांश जण या घटना नेहमीचीच गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतो. बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबांसाठी हा एक मोठा मानसिक व आर्थिक धक्का असतो. यासाठी जागतिक स्तरावर यावर्षीही दिनांक १५.०५.२०२३ ते २१.०५.२०२३ या कालावधीत Sustainable Transport या विषयासंदर्भात 7 UN Global Road Safety Week 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातांप्रती स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसारमाध्यमे तसेच सामान्य नागरिकांचे लक्ष वेधणे व रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे हा या सप्ताहाचा हेतू आहे. केवळ जागरूकता वाढवणे हाच नव्हे तर रस्ते अपघातातील जखमींना वेळेत व योग्य उपचार व मदत मिळवून देणे हेही यात अंतर्भूत आहे. (Pune Helmet Day Marathi News)
वापरणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर आपल्या शासकीय कार्यालयात दुचाकीवर येणारे शासकीय अधिकारी/कर्मचारी हे नियमितपणे हेल्मेटचा वापर करीत असले तरी, हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी दिनांक २४.०५.२०२३ रोजी लाक्षणीक हेल्मेट दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी पुणे जिल्ह्यातील फक्त सर्व शासकीय आस्थापनांना आदेशीत करण्यात येते की, जे शासकीय अधिकारी / कर्मचारी दुचाकीवरून कार्यालयात येतात अशा सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दिनांक २४.०५.२०२३ रोजी हेल्मेट परिधान करावे. तसेच सदर बाबत सर्व कार्यालयप्रमुखांनी आपल्या कार्यालयामध्ये दुचाकीवरुन येणारे सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी हेल्मेट परिधान करतील याबाबतच्या सुचना आपल्या स्तरावरुन पारित कराव्यात. दुचाकी वापरतांना हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधीत अधिकारी/कर्मचारी/नागरीक हे मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहतील. असे आदेशात म्हटले आहे. (Pune collector Dr Rajesh Deshmukh)