Daund MlA Rahul Kul News | पुणे महापालिकेकडून मुठा उजव्या कालव्यात सोडण्यात येत असलेले सांडपाणी बंद करण्याची मागणी 

Categories
Breaking News PMC Political पुणे

Daund MlA Rahul Kul News | पुणे महापालिकेकडून मुठा उजव्या कालव्यात सोडण्यात येत असलेले सांडपाणी बंद करण्याची मागणी

| दौंड चे आमदार राहुल कुल यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

 

Daund MLA Rahul Kul | पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) खडकवासला नवीन  मुठा उजव्या कालव्यात (Khadakwasla New Mutha River Right canal) सोडण्यात आलेले सांडपाणी (Strom water) तातडीने बंद करण्याची मागणी दौंड चे आमदार राहुल कुल (Daund MLA Rahul Kul) यांनी पुणे जिल्हाधिकारी (Pune Collector) यांच्याकडे केली आहे. याबाबत आमदार कुल यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे.

आमदार  राहुल कुल यांनी काय म्हटले आहे पत्रात?

आमदार कुल यांच्या पत्रानुसार पुणे  महानगरपालिकेकडून वैदूवाडी (हडपसर) परिसरात नवीन मुठा कालव्यात कोणतीही प्रक्रिया न करता पुणे महानगरपालिकेचे विषारी दूषित सांडपाणी सोडण्यात आलेले आहे. या कालव्याच्या पाण्यावर हवेली, दौंड व इंदापुर तालुक्यातील नगरपालिका व विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना तसेच शेती देखील अवलंबून आहे.  थेट सोडण्यात आलेले विषारी दूषित सांडपाणी ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर व शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांवर दुष्परिणाम होत आहे. तसेच जनावरांना त्वचेचे रोग तसेच इतर रोग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. (PMC pune News)

 

तरी, पुणे महानगरपालिकेकडून नवीन  मुठा उजव्या कालव्यात सोडलेले सांडपाणी बंद करणेबाबत आपणाकडून तातडीने  कार्यवाही  व्हावी.  असे आमदार कुल यांनी म्हटले आहे. (Daund MLA Rahul Kul Marathi news)