Registered Hawkers : आता नोंदणीकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा  : नियमाचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर होणार कडक कारवाई 

Categories
Breaking News PMC पुणे

आता नोंदणीकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा

: नियमाचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर होणार कडक कारवाई

पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील अवैध फेरीवाल्यावर जोरदार कारवाई सुरु आहे. दरम्यान आता आगामी काळात वैध म्हणजेच नोंदणीकृत व्यावसायिक जे नियमांचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. अतिक्रमण उपायुक्तांनी याबाबतचे आदेश सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व क्षेत्रिय कार्यालय हद्दीमधील रस्ता, पदपथांवर केंद्र शासनाच्या पथविक्रेता अधिनियम-२०१४ चे मधील तरतुदीनुसार तसेच सदर कायद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून बनविण्यात आलेली पथविक्रेता योजना-२०१७ चे मधील तरतुदीनुसार नोंदणीकृत झालेल्या पात्र पथविक्रेत्यांचे मान्य हॉकर्स झोनमध्ये यापूर्वी सर्व संबंधित क्षेत्रिय कार्यालयांकडून रितसर पुनर्वसन करण्यात आलेले आहे. पुनर्वसन झालेल्या ज्या व्यवसायिकांकडे सन १९८८ पूर्वीचे अधिकृत स्थिर/हातगाडी/बैठा व गटई (खोंचा) याप्रकारची व्यवसाय साधने वापरून प्रत्यक्ष मान्य झोनमध्ये मान्य ५४४ फुट मापाच्या जागेत व्यवसाय करणे अपेक्षित आहे. तसेच उपरोक्त कायद्याअंतर्गत ज्या अनधिकृत व्यवसायिकांची संगणकीय नोंदणी करून त्यांना सन २०१४ नंतर फेरीवाला प्रमाणपत्र देण्यात येवून मान्य झोनमध्ये त्यांचे रितसर पुनर्वसन केलेले आहे, अशा व्यवसायिकांनी त्यांचे मान्य जागी फक्त ५X४ फुट मापाच्या जागेत पथारी अथवा खोंचा ठेवूनच व्यवसाय करणे आवश्यक आहे.

तथापि सद्यस्थितीत प्रत्यक्ष जागेवर वारंवार तपासणीत असे आढळून आलेले आहे की, पूर्वीचे अधिकृतव्यवसायिक तसेच सन २०१४ नंतर वरील कायद्याअंतर्गत नोंदणीकृत झालेले व्यवसायिक त्यांना नेमून दिलेल्या झोनमधील मान्य मापाचे जागेत वर नमूद केलेनुसार मान्य व्यवसाय साधनांचा वापर करताना आढळून येत नाही. अनेक व्यवसायिकांनी मान्य व्यवसाय साधने ठेवून व्यवसाय करण्याऐवजी प्रत्यक्ष जागेवर व्यवसाय साधनामध्ये परस्पर बदल करून उदा. १) मान्य बैठा/गटई परवानाधारकांनी बैठा पथारी लावून अथवा खोंचा ठेवून व्यवसाय करण्याऐवजी प्रत्यक्ष जागेवर स्टॉल अथवा छोटी चाके लावलेली हातगाडी किंवा स्थिर हातगाडी लावून व्यवसाय करणे. २) पूर्वीच्या स्थिर हातगाडीधारकाने प्रत्यक्ष जागेवर स्टॉल अथवा छोटी चाके लावलेली हातगाडी सदृश स्टॉल ठेवून व्यवसाय करणे. ३) गटई (खोंचा) ठेवून व्यवसाय करण्याऐवजी प्रत्यक्ष जागेवर स्टॉल किंवा स्थिर हातगाडी लावून व्यवसाय करणे. इत्यादी प्रकारची अनधिकृत व्यवसाय साधने परस्पर ठेवून व्यवसाय करताना आढळून येत आहे. तसेच सदर साधनांमध्ये अनधिकृतपणे वीज, पाणी, ड्रेनेज कनेक्शन घेणे, व्यवसाय जागेवर पक्क्या स्वरुपात व्यवसाय साधनांची उभारणी करणे इत्यादी बाबी देखील अनधिकृतपणे केल्याचे आढळून येत आहे. या सर्व बाबी परवाना अटी, शर्तीचा भंग करणाऱ्या असून अशा व्यवसायिकांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच पथारी/बैठा व्यवसायिकांनी त्यांची व्यवसायाची वेळ संपल्यानंतर त्यांचे सर्व व्यवसाय साहित्य घरी घेवून जावून व्यवसाय जागा रिकामी व स्वच्छ नियमित करून ठेवणे आवश्यक आहे. तसेच पूर्वीच्या स्टॉल किंवा स्थिर हातगाडी व्यवसायधारकांनी मान्य व्यवसाय जागेवर पक्या स्वरूपातील कोणतेही स्ट्रक्चर/ओटा न बनविता त्यांच्या मान्य व्यवसाय साधनावर व्यवसाय करणे आवश्यक आहे.
सध्या सुरु असलेल्या संयुक्त कारवाई मोहिमेअंतर्गत वरीलप्रमाणे अटी, शर्तीचा भंग करणाऱ्या व्यवसायिकांवर या कार्यालयीन दिनांकापासून संबंधित सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी योग्य ते नियोजन करून प्राधान्याने स्वतः उपस्थित राहून कारवाया चालू करावयाच्या आहेत. आपले कार्यालय हद्दीमधील सर्व पुनर्वसन झालेल्या व्यवसायिकांकडून मान्य व्यवसाय साधनांचा वापर करूनच कायम व्यवसाय करीत राहतील, याबाबत सतत नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार  कारवाईचे नियोजन करून केलेल्या कारवाईचा अहवाल दैनंदिनपणे कळविण्यात यावा, असे आदेश अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांनी दिले आहेत.

Encroachment : PMC : अतिक्रमण कारवाईत कसूर केल्यास अधिकाऱ्यांवरच होणार कारवाई  : उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश जारी 

Categories
Breaking News PMC पुणे

अतिक्रमण कारवाईत कसूर केल्यास अधिकाऱ्यांवरच होणार कारवाई

: उपायुक्त माधव जगताप यांचे आदेश जारी

पुणे : महापालिका प्रशासनाकडून शहरात जोरदार अतिक्रमण कारवाई सुरु केली आहे. मात्र एकदा कारवाई सुरु केल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण होत आहे. शिवाय अतिक्रमण कारवाई करण्याची वेळ निश्चित करण्यात आलेली असताना देखील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई होत आहे. साहजिकच त्यामुळे कारवाईवर परिणाम होत आहे. त्यामुळे आता कारवाईत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. याबाबतचे आदेश उपायुक्त माधव जगताप यांनी नुकतेच जारी केले आहेत.

: असे आहेत आदेश

शहरामधील रस्ते पदपथावरील अनधिकृत अतिक्रमणे काढणे बाबतची कारवाई आयुक्तांच्या  आदेशानुसार संपूर्ण शहरामध्ये सुरु आहे. सदर कारवाई केल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमणे झाल्याचे दिसून येते. सदर झालेल्या अतिक्रमानंबाबत नागरिकांच्या तक्रारीमध्ये सातत्याने वाढ
होत आहे. त्याचप्रमाणे महापालिका फक्त समाधानापुर्ती कारवाई करत असल्याचे नागरिकांचे आरोप आहे. यामुळे ज्या भागामध्ये कारवाई केली जाईल त्या भागामध्ये पुन्हा सातत्याने अतिक्रमणाची कारवाई करून पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शहरामध्ये विविध ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड बॅनर उभे करण्यात आलेले असून
त्याबरोबरच इलेक्ट्रिक बॉक्स यावर देखील पत्रके चिटकविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे फ्लेक्स उभे करण्यासाठी बांबूचे स्ट्रक्चर उभे केले जाते या सर्व गोष्टी काढून टाकून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही होणे आवश्यक आहे. ज्या रस्त्यावर अतिक्रमणाची कारवाई होईल त्या रस्त्यावरील या सर्व गोष्टीबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी याबाबतची दक्षता संबंधित आकाशचिन्ह परवाना निरीक्षक यांनी घ्यावी.
अतिक्रमण कारवाई सुरु करण्याची वेळ सकाळी १०.०० वाजता निश्चित करण्यात आलेली आहे. तथापि, कारवाई वेळेत सुरु होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. बऱ्याच वेळा बांधकाम. आकाशचिन्ह, अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने कारवाई
सुरु होणेस उशीर होतो. त्याचप्रमाणे आवश्यक असणारे यंत्रसामग्री देखील वेळेवर पोहचत नसल्याने कारवाईस उशीर होतो. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईच्या ठिकाणी कारवाईसाठी 15 मिनिटे आधी पोहचून वेळेवर कारवाई सुरु होईल याची दक्षता घ्यावी. महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी अहवालामध्ये कारवाई सुरु होणेस उशीर झाल्याचे कारणांमध्ये संबंधीत अधिकाऱ्याचे नाव नमूद केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

BOT : Rasta Peth Vegetable Market : रास्ता पेठेतील मंडईचा प्रश्न अकरा वर्षानंतर मार्गी

Categories
Breaking News PMC social पुणे

रास्ता पेठेतील मंडईचा प्रश्न अकरा वर्षानंतर मार्गी

– पुणे पालिकेने कारवाई करत ताब्यात घेतली जागा

पुणे : महानगरपालिकेच्या वतीने रास्ता पेठेत बांधण्यात येत असलेल्या नवीन भाजी मंडईचा मार्ग अकरा वर्षानंतर मोकळा झाला आहे. या भागात असलेले बांधकाम पालिकेने काढून टाकले आहे. न्यायालयाने केलेल्या सूचना आणि महानगर पालिका आयुक्तांना असलेल्या अधिकाराचा वापर करत मंडई विभागाने कारवाई करत ही जागा ताब्यात घेतली आहे.

रास्ता पेठ येथे पालिकेची जुनी भाजी मंडई आहे. येथील गाळे पालिकेने भाडे तत्वावर चालविण्यासाठी दिलेले आहेत. या जागेवर पालिकेच्या माध्यमातून नवीन अद्यावत अशी भाजी मंडई उभारली जाणार आहे. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा ‘ (बीओटी) तत्वावर हे काम केले जाणार असून याबाबतचा ठराव २०११ मध्ये मान्य करण्यात आला आहे. मात्र या मंडई मधील १० गाळेधारकांनी यावर आक्षेप घेत त्याला विरोध केला होता. याबाबत लघुवाद न्यायालयात दावा देखील दाखल करण्यात आला होता. या भागातील काही मंडळींनी याला विरोध केल्याने वर्षानुवर्ष हा प्रश्न प्रलंबित होता. या जागेत नव्याने मंडई उभारली जाणार असल्याने पार्किंग, जीना, लिफ्ट तसेच बांधकाम करताना आजूबाजूला आवश्यक ती जागा सोडावी लागणार असल्याने या गाळाधारकांना नऊ चौरस फुटांच्या ऐवजी सात फुटाचा गाळा देण्याची तयारी पालिकेने दाखविली होती. मात्र याला देखील गाळा धारकांनी विरोध केल्याने हा प्रकल्प रखडला होता.

ही जागा पालिकेच्या मालकीची असून पालिकेने ती भाडेतत्वावर दिलेली आहे. येथे पालिकेला नवीन मंडई उभारायची आहे. त्यासाठी भाडेकरू यांच्याकडून जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेने संबंधितांना नोटीस दिली होती. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ८१ ब (१) (क) या नियमानुसार ही नोटीस देण्यात आली होती. योग्य ती प्रक्रिया राबवून ही जागा ताब्यात घ्यावी, यामध्ये कोणालाही बेदखल करू नये, अशा सूचना याबाबत दाखल करण्यात आलेल्या दाव्यावर सुनावणी करताना लघुवाद न्यायालयाने केल्या होत्या. त्याचे पालन करून आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याची माहिती मंडई विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. या गालाधारकांचे तात्पुरते पुनर्वसन देखील केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गेल्या अनेक वर्षापासून हा विषय प्रलंबित होता. या ठिकाणी मंडई विभागा मार्फत बीओटी तत्त्वावर नवीन अद्यावत मंडईचे बांधकाम करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आवश्यक त्या सूचनांची पूर्तता करून गाळे ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

– माधव जगताप, उपायुक्त, पुणे महानगपालिका

Unattended Vehicles : PMC : अतिक्रमण विभागाने 538 बेवारस गाड्या केल्या जप्त! : बेवारस गाड्यावर जोरदार कारवाई

Categories
Breaking News PMC पुणे

अतिक्रमण विभागाने 538 बेवारस गाड्या केल्या जप्त!

: बेवारस गाड्यावर जोरदार कारवाई

पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरात बंद पडीक गाड्यांवर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. नोटीस सात दिवसांनंतर सदरच्या गाड्या जप्त करून उचलण्यात येत आहेत. त्यानुसार 7 डिसेंबर ते 25 जानेवारी पर्यंत 538 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर 1445 नोटीस देण्यात आल्या आहेत. अशी माहिती अतिक्रण विभागाकडून देण्यात आली.

: 1445 नोटीस दिल्या

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ च्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये रस्ता पदपथावरील ना दुरुस्त,बंद, बेवारस, वाहनांवर आयुक्त ,माधव जगताप  अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग यांचे नियंत्रणाखाली कारवाई  कारवाई चालू आहे. या कारवाई मध्ये 25 जानेवारी अखेर दुचाकी-606, तीनचाकी-302, चारचाकी-533, चारचाकी च्या पुढे -४ अशा एकूण 1445 वाहनांना नोटीस देण्यात आली व एकूण 538 वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामुळे जागा रिकामी होऊन स्वच्छ झाली आहे. असे अतिक्रमण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.