DA Hike : राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता लागू

Categories
Breaking News Commerce Political social महाराष्ट्र

DA Hike  : राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता लागू

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली आहे. १ जुलै २०२३ पासूनही वाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची वातावरण आहे. (7th pay Commission)

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार १ जुलै २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ वरुन ४६ टक्के करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबरच्या वेतनासह रोखीने देण्यात यावा, असा निर्णय सरकारने घेतला आहे. (Dearness allowance News)

महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्याबाबत विद्यमान तरतुदी आणि कार्यपद्धती त्याचप्रकारे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा, असेही निर्देश सरकारने दिले आहेत.

अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्याबाबतती संबंधित लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.