Bhondala | Bal Vikas Mandir | बाल विकास मंदिर शाळेत भोंडल्याचे आयोजन

Categories
Breaking News cultural Education social पुणे

Bhondala | Bal Vikas Mandir | बाल विकास मंदिर शाळेत भोंडल्याचे आयोजन

 

Bhondala | Bal Vikas Mandir | नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील म. ए. सो. बाल विकास मंदिर शाळेत आज भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेतील शिक्षिकांनी हत्तीच्या प्रतिकृतीचे पूजन केले. शिक्षिका माधुरी जगताप यांनी विद्यार्थ्यांना भोंडल्याची माहिती दिली. महिला शिक्षिकांनी भोंडल्याची गाणी म्हटली. यावेळी, सर्व विद्यार्थी रंगीत ड्रेस मध्ये शाळेत आले होते. विद्यार्थी, शिक्षिका, पालक यांनी दांडिया खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने घटस्थापनेपासून परिपाठाच्या वेळी देवीच्या विविध रूपांची माहिती महिला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. यात, मंजुषा चोरमले, आशा ढगे, शारदा यादव, शकुंतला आहेरकर, सुरेखा जगताप, शीतल चौधरी, अश्विनी कदम, मीना खोमणे, स्वाती बोरावके यांचा सहभाग होता.

शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. सर्वच विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात आले. या सर्व उपक्रमांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब बडधे यांनी कौतुक केले.

Atharvashirsha Pathan | सासवड येथे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

Categories
Breaking News cultural social पुणे

Atharvashirsha Pathan |  सासवड येथे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

 

Atharvashirsha Pathan | सासवड: येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (Maharashtra Education Society’s) बाल विकास मंदिर शाळेतील (Bal Vikas Mandir School) विद्यार्थ्यांनी *गणेशोत्सवानिमित्त सासवड च्या अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे जाऊन अथर्वशीर्ष पठण केले. (Saswad)

शाळेने, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष, तसेच शाला समितीचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे , संस्थेचे सहसचिव, शाला समितीचे महामात्र मा. सुधीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीच्या उपक्रमासाठी भारतीय भाषांचा अभ्यास या विषयांर्गत संस्कृत विषयाची निवड केली आहे. त्यातील अथर्वशीर्ष पठण हा पहिला उपक्रम शाळेने राबविला. यात, शाळेतील इ. ३ री, ४ थी चे ३०० विद्यार्थी- विद्यार्थिनी, शिक्षक यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी आठ अष्टविनायक गणपतींसाठी आठ वेळा अथर्वशीर्ष पठण केले. यानंतर, गणपतीची सामुदायिक आरती झाली. यावेळी मंडळाचा संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.


  • गणपती मंडळाकडून मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. गणपती मंडळाने विद्यार्थ्यांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती.
    यावेळी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब बडधे, अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण पवार, मंडळाचे कार्यकर्ते, परिसरातील नागरिक यांनी या उपक्रमाचे तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

    याप्रसंगी, शिक्षक सौ. मंजुषा चोरामले, सौ.आशा ढगे, श्री. माणिक शेंडकर, श्री. नरेंद्र महाजन, श्री. दीपक कांदळकर, सौ. शारदा यादव, श्रीमती शीतल चौधरी, श्रीमती मीना खोमणे इ. उपस्थित होते.

School First Day | बाल विकास मंदिर शाळेत नवागतांचे स्वागत

Categories
Breaking News Education पुणे

School First Day | बाल विकास मंदिर शाळेत नवागतांचे स्वागत

School First Day | महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड (Maharashtra Education Society Saswad) येथील बाल विकास मंदिर शाळेत (Bal Vikas Mandir School) नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका , महिला शिक्षकांनी औक्षण करून तसेच पुष्पवृष्टी करून सुमधुर संगीतात स्वागत केले. (School First Day)
यावेळी शाळेत सर्वत्र फुगे लावण्यात आली होती. ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता.  शासनाच्या नियमानुसार पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना  नवीन मोफत पाठ्यपुस्तके वाटप केले, तसेच गोड खाऊ दिला.  यावेळी मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड सर्व शिक्षक उपस्थित होते.
—-
News Title | School First Day |  Welcome Newcomers to Bal Vikas Mandir School

Abasaheb Garware College : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा

Categories
Breaking News Education पुणे

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा

पुणे : कर्वे रस्त्यावरील म.ए.सो.च्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. म.ए.सो. अंतर्गत स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळालेले हे दुसरे महाविद्यालय आहे अशी माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट श्री. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी आज (सोमवार, दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी) पत्रकार परिषदेत दिली. संस्थेचे सचिव प्रा. डॉ. भरत व्हनकटे, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. बी. बुचडे यावेळी उपस्थित होते.

शिक्षणाचे माहेर घर म्हणून पुण्याची ओळख ही अनेक शैक्षणिक संस्थांमुळे आहे. यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मोठे योगदान आहे. १८६० मध्ये आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, श्री. वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी स्थापन केलेली पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन नंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (MES) म्हणून ओळखली जाऊ लागली. सन १८९६ मध्ये संस्थेने महाराष्ट्र कॉलेज सुरू केले होते. या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी स्वातंत्र्याच्या मागणीसाठी विद्रोही भाषणे केल्याने हे महाविद्यालय इंग्रज सरकारच्या रोषाला पात्र ठरले आणि त्यानंतर बंद पडले. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पदार्पण करताना एम.ई.एस. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स १९४५ साली सुरू करण्यात आले, जणू हा महाराष्ट्र कॉलेजचा पुनर्जन्मच! हेच कॉलेज आज मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. हे महाविद्यालय महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राष्ट्रीय विचारांशी व चारित्र्यवान नागरिक आणि सशक्त राष्ट्र निर्माण करण्याच्या मूल्यांशी सुसंगत आहे. गेली १६१ वर्ष ‘मएसो’चे कार्य याची साक्ष देते, या मध्ये मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाने गेली ७५ वर्षे योगदान दिले आहे. मागील वर्षी हे महाविद्यालयाचे हीरक महोत्सवी वर्ष होते.

१९४५ साली स्थापन झालेल्या मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये आता २५ पदवीधर शिक्षण विभाग आहेत ज्यामध्ये १८ पदव्युत्तर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त विज्ञान आणि कला विद्याशाखेतील ०७ संशोधन केंद्रे आहेत. महाविद्यालयात ५० पेक्षा जास्त अभ्यासक्रम शिकवले जातात.
महाविद्यालयाला तीन वेळा NAAC द्वारे प्रमाणित करण्यात आले आहे. चालू वर्षात वरिष्ठ महाविद्यालयातील सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात अद्ययावत वर्ग आणि प्रयोगशाळा आहेत. महाविद्यालयात ग्रंथालय आणि क्रीडाविषयक पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत. महाविद्यालयात अनेक विद्यार्थीकेंद्रित उपक्रमही राबवले जातात. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय मूल्ये रुजवणे, त्यांना राष्ट्रीय विकासात योगदान देण्यास सक्षम बनवणे, त्यांच्यामध्ये जागतिक दर्जाची क्षमता विकसित करणे, त्यांना सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक बनवण्यासाठी कार्य करत असते.
ऑगस्ट २०२० मध्ये महाविद्यालयाने स्वायत्त दर्जा मिळवण्याचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर केला होता. कोविडच्या परिस्थितीमुळे सप्टेंबर २०२१ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाला भेट दिली. प्रत्यक्ष पाहणीनंतर, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा देण्याची शिफारस केली.

नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन स्वायत्ततेत कौशल्य आधारित शिक्षणावर भर देणारे अभ्यासक्रम सुरू करण्याची महाविद्यालयाची इच्छा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपारिक अभ्यासक्रमांद्वारे ज्ञान मिळू शकेल तसेच त्यांची रोजगारक्षमताही वाढेल. स्वायत्ततेअंतर्गत, भविष्यात व्यापक संधी असणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचा महाविद्यालयाचा प्रस्ताव आहे. डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच नॅनोसायन्सेस आणि नॅनोटेक्नॉलॉजी यासारख्या विषयांमध्ये नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. नवीन स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज आणि सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स सुरू करण्याचीही महाविद्यालयाची इच्छा आहे. चांगले नेते आणि प्रशासक विकसित करण्यासाठी आणि जागतिक समस्यांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून हे अभ्यासक्रम विकसित करण्याची योजना आहे.