Bhondala | Bal Vikas Mandir | बाल विकास मंदिर शाळेत भोंडल्याचे आयोजन

Categories
Breaking News cultural Education social पुणे

Bhondala | Bal Vikas Mandir | बाल विकास मंदिर शाळेत भोंडल्याचे आयोजन

 

Bhondala | Bal Vikas Mandir | नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील म. ए. सो. बाल विकास मंदिर शाळेत आज भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेतील शिक्षिकांनी हत्तीच्या प्रतिकृतीचे पूजन केले. शिक्षिका माधुरी जगताप यांनी विद्यार्थ्यांना भोंडल्याची माहिती दिली. महिला शिक्षिकांनी भोंडल्याची गाणी म्हटली. यावेळी, सर्व विद्यार्थी रंगीत ड्रेस मध्ये शाळेत आले होते. विद्यार्थी, शिक्षिका, पालक यांनी दांडिया खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने घटस्थापनेपासून परिपाठाच्या वेळी देवीच्या विविध रूपांची माहिती महिला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. यात, मंजुषा चोरमले, आशा ढगे, शारदा यादव, शकुंतला आहेरकर, सुरेखा जगताप, शीतल चौधरी, अश्विनी कदम, मीना खोमणे, स्वाती बोरावके यांचा सहभाग होता.

शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. सर्वच विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात आले. या सर्व उपक्रमांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब बडधे यांनी कौतुक केले.

Atharvashirsha Pathan | सासवड येथे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

Categories
Breaking News cultural social पुणे

Atharvashirsha Pathan |  सासवड येथे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

 

Atharvashirsha Pathan | सासवड: येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (Maharashtra Education Society’s) बाल विकास मंदिर शाळेतील (Bal Vikas Mandir School) विद्यार्थ्यांनी *गणेशोत्सवानिमित्त सासवड च्या अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे जाऊन अथर्वशीर्ष पठण केले. (Saswad)

शाळेने, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष, तसेच शाला समितीचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे , संस्थेचे सहसचिव, शाला समितीचे महामात्र मा. सुधीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीच्या उपक्रमासाठी भारतीय भाषांचा अभ्यास या विषयांर्गत संस्कृत विषयाची निवड केली आहे. त्यातील अथर्वशीर्ष पठण हा पहिला उपक्रम शाळेने राबविला. यात, शाळेतील इ. ३ री, ४ थी चे ३०० विद्यार्थी- विद्यार्थिनी, शिक्षक यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी आठ अष्टविनायक गणपतींसाठी आठ वेळा अथर्वशीर्ष पठण केले. यानंतर, गणपतीची सामुदायिक आरती झाली. यावेळी मंडळाचा संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.


  • गणपती मंडळाकडून मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. गणपती मंडळाने विद्यार्थ्यांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती.
    यावेळी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब बडधे, अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण पवार, मंडळाचे कार्यकर्ते, परिसरातील नागरिक यांनी या उपक्रमाचे तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

    याप्रसंगी, शिक्षक सौ. मंजुषा चोरामले, सौ.आशा ढगे, श्री. माणिक शेंडकर, श्री. नरेंद्र महाजन, श्री. दीपक कांदळकर, सौ. शारदा यादव, श्रीमती शीतल चौधरी, श्रीमती मीना खोमणे इ. उपस्थित होते.

August Kranti Din | बाल विकास मंदिर शाळेत क्रांति सप्ताह साजरा

Categories
Breaking News cultural Education social पुणे महाराष्ट्र

August Kranti Din | बाल विकास मंदिर शाळेत क्रांति सप्ताह साजरा

August Kranti Din |  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत १ ते ९ ऑगस्ट दरम्यान क्रांती सप्ताह साजरा करण्यात आला. (August Kranti Din)
 इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना स्मरण करण्याचा दिवस म्हणजे ९ आॅगस्ट, अर्थात क्रांती दिन! (August Kranti Din) स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ आॅगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी बलिदान दिले, समाजपरिवर्तन घडवून आणले, शैक्षणिक क्रांती घडवून आणली अशा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वासुदेव बळवंत फडके, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे, स्वामी विवेकानंद
यांच्या वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी रोज या क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती सांगितली.  यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षक , पालक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी क्रांतिकारकांचे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. आज रोजी भारत माता पूजन करुन या उपक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा क्रांतिवीरांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांसोबत इतर सर्व  विद्यार्थी, शिक्षक यांनी दिल्या. यामुळे संपूर्ण शालेय परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध क्रांतिवीरांच्या  देशकार्याची माहिती मिळाली, विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्माण होण्यास मदत झाली. या उपक्रमाचे मुख्याध्यापिका सौ. मंजुषा चोरामले, पालक यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख सुरेखा जगताप यांनी केले.यावेळी मुख्याध्यापिका सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

School First Day | बाल विकास मंदिर शाळेत नवागतांचे स्वागत

Categories
Breaking News Education पुणे

School First Day | बाल विकास मंदिर शाळेत नवागतांचे स्वागत

School First Day | महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड (Maharashtra Education Society Saswad) येथील बाल विकास मंदिर शाळेत (Bal Vikas Mandir School) नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका , महिला शिक्षकांनी औक्षण करून तसेच पुष्पवृष्टी करून सुमधुर संगीतात स्वागत केले. (School First Day)
यावेळी शाळेत सर्वत्र फुगे लावण्यात आली होती. ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता.  शासनाच्या नियमानुसार पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना  नवीन मोफत पाठ्यपुस्तके वाटप केले, तसेच गोड खाऊ दिला.  यावेळी मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड सर्व शिक्षक उपस्थित होते.
—-
News Title | School First Day |  Welcome Newcomers to Bal Vikas Mandir School

Bal Vikas Mandir School | बाल विकास मंदिर शाळेत क्रीडा शिबिर संपन्न

Categories
Breaking News cultural Education social पुणे

बाल विकास मंदिर शाळेत क्रीडा शिबिर संपन्न

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत ११ ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत उन्हाळी क्रीडा शिबिर, छंद वर्गाचे आयोजन केले होते.

यात लंगडी, गोल खो-खो , डॉजबॉल, एरोबिक्स व्यायाम प्रकार यासोबत विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. तसेच छंद वर्गात विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला, हस्ताक्षर यांचा देखील समावेश केला होता.

या शिबिरात विद्यार्थ्यांना खेळाचे मार्गदर्शन कु. अर्पिता जगताप, कु. सुरुची जगताप यांनी केले. चित्रकलेसाठी  माधुरी जगताप यांनी तर हस्ताक्षरसाठी  दीपक कांदळकर यांनी मार्गदर्शन केले.


आज रोजी या क्रीडा शिबिराचा समारोप समारंभ पार पडला. याप्रसंगी वाघिरे कॉलेज , सासवड येथील आर्मी एन. सी.सी. चे मेजर श्री.दीपक जांभळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. श्री. जांभळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे, व्यायामाचे महत्त्व सांगितले. आहार कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले. जांभळे हे शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने शाळेच्या आठवणी त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितल्या. विद्यार्थ्यांसोबत सायकलिंग करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच त्यांनी केलेल्या सायकल प्रवासाचे अनुभव सांगितले. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी जांभळे यांना विविध प्रश्न विचारले. विशेष म्हणजे छंदवर्गात विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, बनवलेल्या वस्तू यांचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले होते.

यावेळी पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे , सर्व शिक्षक उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका  प्रतिभा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय मंजुषा चोरामले यांनी करुन दिला. माणिक शेंडकर, नरेंद्र महाजन,  माधुरी जगताप,  अश्विनी कदम यांनी प्रशस्तीपत्र देतेवेळी सहभागी विद्यार्थ्यांची नावे घोषित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दीपक कांदळकर यांनी केले. आभार आशा ढगे यांनी मानले.

Sports Camp | बाल विकास मंदिर शाळेत क्रीडा शिबिराचे आयोजन

Categories
Breaking News Education पुणे

बाल विकास मंदिर शाळेत क्रीडा शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत उन्हाळी क्रीडा शिबिर, छंद वर्गाचे आयोजन केले आहे. आज रोजी या क्रीडा शिबिराचे उद्घाटन पुरंदर ज्युनियर कॉलेज सासवड येथील क्रीडा शिक्षक   निलेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

दिनांक ११-४-२०२३ ते २८-४-२०२३ या दरम्यान हे शिबिर होणार आहे. यात विविध लंगडी, खोखो , डॉजबॉल यासोबत विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. तसेच छंद वर्गात विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विविध कलांना वाव देण्यासाठी चित्रकला, हस्ताक्षर यांचा देखील समावेश केला आहे. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड, क्रीडा मार्गदर्शक कु. अर्पिता जगताप, कु. सुरुची जगताप, चित्रकला मार्गदर्शक माधुरी जगताप, हस्ताक्षर मार्गदर्शक दीपक कांदळकर सर्व शिक्षक उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय सौ मंजुषा चोरामले यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा यादव यांनी केले. आभार नरेंद्र महाजन यांनी मानले.

Bal Vikas Mandir | बाल विकास मंदिर शाळेत व्याख्यान

Categories
Education पुणे

बाल विकास मंदिर शाळेत व्याख्यान

श्रावणी शुक्रवार निमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत महिला पालकांसाठी स्नेह मेळावा आयोजित केला होता. उपस्थित पालकांचे हळदी कुंकू लावून स्वागत केले.
यावेळी, खेळाडू कांचन भुजबळ यांचे खेळ व क्रीडा या विषयावर व्याख्यान झाले.
यावेळी, मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड, सर्व महिला शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होत. पाहुण्यांचा परिचय, सौ. मंजुषा चोरामले यांनी करून दिला , सूत्रसंचालन सौ. शकुंतला आहेरकर यांनी केले, आभार सौ. शारदा यादव यांनी मानले.

Bal Vikas Mandir School | बाल विकास मंदिर शाळेत पर्यावरण संवर्धन उपक्रम

Categories
Breaking News Education पुणे

बाल विकास मंदिर शाळेत पर्यावरण संवर्धन उपक्रम

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत पर्यावरण संवर्धन उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी, इ. १ ली च्या विद्यार्थ्यानी कुंडीत रोपं लावून आणली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड यांनी कुंडीतील रोपांचे पूजन केले. यानिमित्ताने इ. २ ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थांनी पर्यावरण संवर्धन या विषयावर सुंदर चित्रे काढली. या उपक्रमाचे व चित्रकला स्पर्धेचे नियोजन सहा. शिक्षिका सौ. शकुंतला आहेरकर व चित्रकला शिक्षिका श्रीमती माधुरी जगताप यांनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शाळेत दीपपूजन

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत दीप अमावस्या निमित्त दीपपूजन करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यानी विविध प्रकारचे दिवे, फुले पूजनासाठी आणले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड, शिक्षिका, विद्यार्थी यांनी दीपपूजन केले. इ. 3 री तील चि. वेदांत पांडुरंग सूर्यवंशी ह्या विद्यार्थ्याने दीप अमावस्येविषयी माहिती सांगितली. कु. प्रांजल सूर्यकांत खैरनार ह्या विद्यार्थिनीने कथा सांगितली. तसेच , इ.3 री च्या गगन वर्गातील विद्यार्थ्यांनी शुभंकरोती म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख सौ शकुंतला आहेरकर यांनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.