Bhondala | Bal Vikas Mandir | बाल विकास मंदिर शाळेत भोंडल्याचे आयोजन

Categories
Breaking News cultural Education social पुणे

Bhondala | Bal Vikas Mandir | बाल विकास मंदिर शाळेत भोंडल्याचे आयोजन

 

Bhondala | Bal Vikas Mandir | नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील म. ए. सो. बाल विकास मंदिर शाळेत आज भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेतील शिक्षिकांनी हत्तीच्या प्रतिकृतीचे पूजन केले. शिक्षिका माधुरी जगताप यांनी विद्यार्थ्यांना भोंडल्याची माहिती दिली. महिला शिक्षिकांनी भोंडल्याची गाणी म्हटली. यावेळी, सर्व विद्यार्थी रंगीत ड्रेस मध्ये शाळेत आले होते. विद्यार्थी, शिक्षिका, पालक यांनी दांडिया खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने घटस्थापनेपासून परिपाठाच्या वेळी देवीच्या विविध रूपांची माहिती महिला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. यात, मंजुषा चोरमले, आशा ढगे, शारदा यादव, शकुंतला आहेरकर, सुरेखा जगताप, शीतल चौधरी, अश्विनी कदम, मीना खोमणे, स्वाती बोरावके यांचा सहभाग होता.

शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. सर्वच विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात आले. या सर्व उपक्रमांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब बडधे यांनी कौतुक केले.

SSPU | Navratri | सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) तर्फे नवरात्री उत्साहात साजरी

Categories
Breaking News cultural Education पुणे

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) तर्फे नवरात्री उत्साहात साजरी

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) तर्फे नवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणे सरस्वती पूजन करण्यात आले. हे सरस्वती पूजन एसएसपीयु इमारतीच्या आवारात दि. ०३.१०.२०२२ रोजी करण्यात आले.

एसएसपीयुच्या स्कूल ऑफ ब्युटी अँड वेलनेसच्या विद्यार्थिनींनी यावेळी नवदुर्गा स्वरूपात वेषभूषा धारण केली. ज्यामध्ये कुंडलिनी उर्जेच्या नऊ चक्रांचे प्रतीक आहे. तसेच यामध्ये व्यक्तीचे आरोग्य, समृद्धी आणि मानसिक आरोग्य याचे प्रतिबिंब दर्शविले जाते. यावेळी डॉ. स्वाती मुजुमदार ( प्र- कुलपती- सिंबायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी) यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. सरस्वती पूजनच्या वेळी डॉ. गौरी शिऊरकर (प्रभारी कुलगुरू – सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी) आणि एसएसपीयूचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी गणपतीची आरती, देवीची आरती, श्लोक यांचे गायन करण्यात आले. नवरात्रीच्या निमित्ताने डॉ. स्वाती मुजुमदार यांनी सर्व एसएसपीयुच्या कर्मचारी वर्गाला नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने नवरात्रीचा उत्सव हा खूप आनंदाने, जोशपूर्ण साजरा करण्यात आला आहे.