Dr. Baba Adhaav | डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण देण्याची शिवसेनेची मागणी

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण देण्याची शिवसेनेची मागणी

| महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन

पुणे : “ महात्मा फुलेंच्या विचारांचे कृतीशील वारस,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा.बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा ‘, अशी मागणी पुणे शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केली आहे. आज पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख संजय मोरे,उपप्रमुख डॉ.अमोल देवळेकर यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी समता भूमी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन केले,त्यानंतर ही मागणी केली.यासंदर्भात त्यांनी एक पत्रकही प्रसिद्धीस दिले आहे.गजानन थरकुडे,उत्तम भुजबळ,विशाल धनावडे,पल्लवी जावळे,पृथ्वीराज सुतार,बाळा ओसवाल,अशोक हरणावळ,संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे तसेच राष्ट्रवादी च्या एड. रुपाली पाटील-ठोंबरे उपस्थित होत्या .

‘गेली नऊ दशके अव्याहतपणे फुले विचारांची कास धरून सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे डॅा. बाबा आढाव हे खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंच्या विचारांचे कृतीशील वारस आहेत. फुले जयंती प्रसंगी बाबा आढाव यांच्यासारख्या ऋषितुल्य वक्तित्वाचा सन्मान करणे म्हणजे आपला प्रबोधनकारी वारसा जपणे होय.येणाऱ्या महाराष्ट्र दिनी बाबा आढावांचा ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार देऊन सन्मान व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे.या मागणीचा आदर करत सरकारने त्वरित तशी घोषणा करावी आणि समविचारी सर्व लोकांनी या संदर्भात तशी निवेदने माध्यमातून मुख्यमंत्री व सरकारकडे करावी’, असे या पत्रकात म्हटले आहे.

‘सत्यशोधक’ विचारांचा हा वारसा फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अमुल्य असा ठेवा आहे.महापुरूषांच्या प्रतिमेचा-कार्याचा गुणगौरव तर आपण त्यांच्या जन्मदिनी करतोच परंतू त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणे हिच त्यांच्याप्रति खरी कृतज्ञता ठरेल’, असे या पत्रकात म्हटले आहे.

Mahatma Phule | लेखणीने त्यांच्या दाखवली समतेची वाट, फुलेंच्या कार्याने उगवली परिवर्तनाची नवी पहाट – मोहन जोशी

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

लेखणीने त्यांच्या दाखवली समतेची वाट, फुलेंच्या कार्याने उगवली परिवर्तनाची नवी पहाट – मोहन जोशी

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटी ओ.बी.सी. विभागाच्या वतीने समता भुमी महात्मा फुले वाडा गंज पेठ येथे आयोजित कार्यक्रमात मा.आमदार मोहन (दादा) जोशी व आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले . कार्यक्रमाचेअध्यक्ष स्थानी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे होते.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून वंचित उपेक्षित, मागास वर्गीय समाजाला तसेच स्त्रियांना शिक्षणाचे दारे खुले करून आजच्या समाजाला आधुनिक उंचीवर नेऊन ठेवले आहे.
महात्मा फुले यांच्या दूरदृष्टीमुळेच महिला या आज सर्व क्षेत्रांमध्ये केंद्रबिंदू म्हणून अग्रस्थानी आहेत. त्याचे कार्य हे न विसरणारे अविस्मरणीय कार्य आहे. असे मनोगत मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
यावेळी महात्मा फुले व डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे विविध पुस्तके मा.आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, संजय बालगुडे, बाळासाहेब अमराले, शाबीर खान, आयुब पठाण, सुनिल पंडित, चेतन अग्रवाल, रवि पाटोले, सुरेश कांबळे, राजू देवकर,गणेश साळुंखे, दत्ता मांजरेकर, रुपेश पवार, अक्षय नवगिरे,फैजन अन्सारी, सौरभ अमराळे व पुणे शहर काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन ओ.बी.सी. विभागाचे शहराध्यक्ष प्रशांत सुरसे यांनी केले.